प्रशिक्षण व क्षमता विकास
प्रशिक्षण व क्षमता विकास
परिचय
शासन निर्णय क्रमांक पी.एच.आय. १०५९/ बी.डी. दिनांक ९/१२/१९५९ अन्वये सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर ची स्थापना झाली. सुरवातीला स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) या संवर्गाचे सर्टिफीकेट अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येत होते. पदव्युत्तर अभ्यासक्रम डी.पी.एच. वैद्यकिय पदवी, पदवीका शिक्षणासाठी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जात होता. सध्या सदर संस्थेचे श्रेणीवर्धन शासन निर्णय क्रमांक २०१५-२०१५/प्र.क्र.२५८/आरोग्य-३ दिनांक २४ मे २०१६ अन्वये राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर म्हणून करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य संस्था हि ISO-९००१.१५ नामांकित आहे तसेच महाराष्ट्र मेडिकल कॉन्सील, मुंबई द्वारा संलग्न असून प्रशिक्षणार्थ्यांना क्रेडिट पांईट दिल्या जातात.
सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची तांत्रित दृष्टया अंमलबजावणी यशस्वीपणे करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत सर्व स्तरावरील आरोग्य अधिकारी व कर्मचारी हयांचे प्रशिक्षण संस्थेव्दारे दिल्या जाते. प्रशिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य प्रशिक्षणातून कर्तव्यपूर्ती आहे.
महाराष्ट्रातील ७ आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र, ३४ जिल्हा प्रशिक्षण केंद्र, २८ रुग्णालय प्रशिक्षण केंद्र आणि ७ तालुका प्रशिक्षण केंद्राकरीता तांत्रीक मार्गदर्शन उदा.प्रशिक्षण, नियोजन, आयोजन, अंमलबजावणी, सर्वेक्षण, इ. संस्थेव्दारे केल्या जाते.
राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था मार्फत विविध प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT), आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथील शाखा सदस्य, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात येवून संवाद कौशल्य, समुपदेशन कौशल्य, विकास कार्यशाळा, सेमीनार इ. नियमितपणे आयोजित होतात. (वर्ष २००६-२००७ पासून ASHA TOT, IMNCI TOT, Basic TOT, ARSH TOT, RTI/STI, Nursing TOT, BeMOC, SAB TOT, Quality Assurance Training, CHO TOT.)
राज्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत वैद्यकीय सेवा देत असतांना त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्याच्या हेतूने Continuing Medical Education (CMEs) राज्य आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था, नागपूर व आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र (सर्व) यांच्या स्तरावर CMEs चे नियोजन करण्यात येत आहे.
ICMR तर्फे मान्यता प्राप्त Institutes Ethics Committee मार्फत राज्यातील विविध शोध प्रबंधांना मान्यता देण्यांत येते.
प्रशिक्षणांचे गुणवत्तात्मक निरीक्षण खालीलप्रमाणे केले जाते.
१) प्रशिक्षणाचे आणि प्रशिक्षणाबाबत माहिती (Feedback)
२) प्रशिक्षणपूर्व व प्रशिक्षण पश्चात प्रशिक्षणाचे मुल्यमापन
३) प्रशिक्षणार्थ्यांना क्षेत्रीय भेटीचे आयोजन
४) प्रशिक्षणार्थ्यांचे कौशल्य, ज्ञान प्रत्यक्ष नियंत्रण / प्रश्नोत्तरे
५) क्षेत्रभेट प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष माहिती देणे.
ध्येय:
1) प्रशिक्षण धोरण तयार करणे.
2) प्रशिक्षण डिझाइन आणि वापरात असलेल्या सामग्रीचे सतत पुनरावलोकन.
3) विविध प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण साहित्य आणि मॉड्यूल विकसित करणे.
4) मूल्यमापन, पाठपुरावा आणि देखरेख प्रणालीचा विकास.
5) प्रशिक्षण संस्थांमधील संबंधांचा विकास.
6) सर्व परिधीय प्रशिक्षण संस्थांच्या प्रगतीचे पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि देखरेख.
7) वेळच्या प्रशिक्षणाच्या गरजेनुसार मनुष्यबळ विकसित करणे.
8) एकात्मिक प्रशिक्षण योजना विकसित करण्यासाठी सर्व स्तरांवर क्षमता निर्माण करून प्रशिक्षण व्यवस्थापन मजबूत करणे.
उद्दिष्टे:
1) दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे आरोग्य क्षेत्रात मानव संसाधनाची क्षमता निर्माण करणे.
2) परिधीय प्रशिक्षण संस्थांचे पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करणे.
3) परिधीय प्रशिक्षण संस्थांना तांत्रिक सहाय्य प्रदान करणे प्रशिक्षण कौशल्य सुधारणे.
4) प्रभावी प्रशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षकांची टीम विकसित करणे.
5) नैदानिक कौशल्य-आधारित प्रशिक्षण प्रदान करणे आणि समन्वयित करणे.
6) आरोग्य आणि कुटुंब कल्याणासाठी अनुकूल वातावरण आणि सकारात्मक विचार निर्माण करणे.
7) आरोग्यामध्ये कार्यरत आणि उपयोजित संशोधनाशी संबंधित उपक्रम हाती घेणे आणि विविध प्रशिक्षण पद्धती विकसित करणे.
प्रशिक्षण कार्यक्रमांचे तपशीलः
१.तांत्रिक प्रशिक्षणः
अ.क्र. | प्रशिक्षणाचे विषय | प्रशिक्षणाची आकडेवारी |
१ | माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रशिक्षण | १६ |
२ | बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रशिक्षण | २२ |
३ | एकूण फलन दर कमी करण्यासाठी प्रशिक्षण | १५ |
४ | NHM अंतर्गत विशेष कार्यक्रमः आशा, आयुष, किशोर आरोग्य, सिकलसेल, ऑनिमिया, PRI सदस्य प्रशिक्षण, टेलिमेडिसीन इ. | ४४ |
५ | राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम (NHP) अंतर्गत टयुबरक्युलोसिस, मलेरिया, फाइलेरिया, अंधत्व नियंत्रण, NPCDCS इ. | २३ |
प्रशासकिय प्रशिक्षणः
अ.क्र. | प्रशिक्षणाचे विषय | प्रशिक्षणाची आकडेवारी |
१ | लिपिक व पर्यवेक्षक प्रशिक्षण | ४५ दिवस |
२ | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) प्रशिक्षण | १ वर्ष |
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण केंद्र/रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र/ तालुका प्रशिक्षण केंद्र
अ. क्र. | आरोग्य आणि कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्र |
जिल्हा प्रशिक्षण केंद्र | रुग्णालय प्रशिक्षण केंद्रे | तालुका प्रशिक्षण केंद्रे |
१ | नागपूर | नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली (6) | वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली (5) | नागभीड- जि. चंद्रपूर,
आल्लापल्ली- जि. गडचिरोली (2) |
२ | अमरावती | अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा (5) | अमरावती, अकोला, बुलढाणा (3) | चिखलदरा, आणि धारणी – जिल्हा.अमरावती, (2) |
3 | नाशिक | नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार (5) | नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार (5) | कळवण – जिल्हा नाशिक,
अक्कलकुवा – जिल्हा.नंदुरबार(2) |
४ | पुणे | पुणे, सातारा, सोलापूर (3) | पुणे, सातारा (2) | – |
५ | छ. शंभाजीनगर | छ. शंभाजीनगर, बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड (8) | छ. शंभाजीनगर, बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली (७) | – |
६ | कोल्हापूर | कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी (4) | कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी (3) | – |
७ | ठाणे | ठाणे, रायगड, पालघर (3) | ठाणे, पालघर, रायगड, (3) | विक्रमगड – जि. ठाणे, (१) |
७ | ३४ | २८ | ७ |
प्रशिक्षण संस्था
अ.क्र. | प्रशिक्षण संस्था/SIHFW/HFWTCs | संस्थेचे प्रमुख | पद | पत्ता | मोबाईल नंबर | ईमेल आयडी |
1 | राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था , नागपूर | डॉ.अजय के. डवले | संचालक | दिक्षाभूमीजवळ, माटाकचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ, नागपूर | 9823405675 | phinagpur2012@gmail.com |
2 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , पुणे | डॉ.सुहास कोरे | प्राचार्य | जिल्हा रुग्णालय व छाती रुग्णालयाजवळ, औंध, पुणे | 9307795660 | hfwtcpune@yahoo.com |
3 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , नागपूर | डॉ.श्रीराम गोगुलवार | प्राचार्य | दिक्षाभूमीजवळ, माटाकचेरी परिसर, श्रद्धानंद पेठ, नागपूर | 9422153260 | hfwtc.2007@rediffmail.com |
4 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , अमरावती | डॉ.सौंदळे | प्राचार्य | सुंदरलाल चौक, शायरोग कार्यालय, अमरावती | 8275178348 | hfwtcamt@gmail.com |
5 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , नाशिक | डॉ.दावल साळवे | प्राचार्य | सिव्हिल हॉस्पिटल परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक | 9604526144 | hfwtcnsk@rediffmail.com |
6 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , छत्रपती संभाजीनगर | डॉ.संतोष कडले | प्राचार्य | सिडको क्रमांक 5, पाणीपुरवठा टाकीजवळ, औरंगाबाद | 9423397544 | hfwtcabd@rediffmail.com |
7 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , कोल्हापूर | डॉ.योगेश साळे | प्राचार्य | शेंडा पार्क, राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय परिसर, कोल्हापूर | 7719986661 | hfwtc_kop@hotmail.com |
8 | आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र , ठाणे | डॉ.शुमा राठोड | प्राचार्य | नवीन HFWTC (स्थापनाधीन), मानसिक रुग्णालयासमोर, DDHS, ठाणे | 9323516777 | hfwtcthane@yahoo.com |
नवीन उपक्रमः
१) संस्थेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) मान्यता प्राप्त करणे.
२) प्रत्येक जिल्ह्रयात जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्र (DHTC) स्थापन करणे, जे DTC आणि HTC यांचे एकत्रीकरण असेल.
३) ई.र्लनिग आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रम (ECHO कार्यक्रम) व्हिडिओ कॅान्फरन्सिगद्वारे आयोजित करणे.
४) विविध आरोग्य समस्यांवर सतत वैद्यकीय शिक्षण (CME) आयोजित करणे.
५) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसोबत (ICMR) संस्थात्मक नैतिकता समिती स्थापन करणे.
६) राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था (NIHFW) मार्फत दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमासाठी उपग्रह केंद्र स्थापन करणे.
७) सार्वजनिक आरोग्य विभागासाठी राज्य प्रशिक्षण धोरणाचे दस्तऐवजीकरण तयार करणे.
८) NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण धोरणाचे दस्तऐवजीकरण तयार करणे.
९) महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्रयांमध्ये प्रीमान्सून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
१०) नव्याने नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रशासनिक टप्प्यातील आरंभीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे.
लाभार्थी:
Employee
फायदे:
To build the Capacity of Human Resource in health sector through quality training.
अर्ज कसा करावा
Public Health Institute, Nagpur