बंद

    हिवताप ,हत्तीरोग व जलजन्य रोग

    • तारीख : 16/04/2025 -

      इन्फ्लुएंजा ए एच १  एन १

    दिनांक 1 जानेवारी ते २१  एप्रिल 2025 अखेर

    संक्षिप्त टिपणी

    तपशिल 2021 2022 2023 2024 २१  एप्रिल 2025
    एकुण तपासण्‍यात आलेले रुग्‍ण 1106268 1369347 1809600 2415082 ७०२३१७
    ऑसेलटॅमिवीर  दिलेले संशयित फ्लू रुग्ण 11888 22756 9733 6125 १०१५
    स्वाइन फ्लू बाधित रुग्ण 387 3714 1231 2351 १३१
    एकुण रुग्‍ण 2 215 32 72

     

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ सदयस्थिती (दिनांक 1 जानेवारी ते २१  एप्रिल 2025 अखेर

    तपशिल प्रगतीपर
    एकुण तपासण्‍यात आलेले रुग्‍ण ७०२३१७
    ऑसेलटॅमिवीर  दिलेले संशयित फ्लू रुग्ण १०१५
    स्वाइन फ्लू बाधित रुग्ण १३१
    सध्‍या रुग्‍णालयात भरती असलेले रुग्‍ण
    घरी सोडण्‍यात आलेले रुग्‍ण 1२३
    व्‍हेंटीलेटरवर असलेले रुग्‍ण 0
    एकुण मृत्‍यु

     

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ व एच ३ एन २ जिल्‍हा /मनपा निहाय माहिती  तपशिल खालीलप्रमाणे

    अ.क्र. जिल्‍हा / मनपा एकुण रुग्‍ण मृत्‍यु अ.क्र. जिल्‍हा / मनपा एकुण रुग्‍ण मृत्‍यु
    1 बृहनमुंबई मनपा २२ 0 16 पुणे मनपा २७ 0
    2 ठाणे मनपा 10 0 17 पुणे 0 0
    3 कल्‍याण मनपा 0 0 18 ससुन हॉस्‍पीटल 0 0
    4 नवी मुंबई 0 0 19 कोल्‍हापुर 1२ 0
    5 मिरा भाईंदर 0 0 20 सांगली 0 0
    6 भिवंडी 0 0 21 नाशिक 5
    7 वसई विरार 0 0 22 सातारा 1 0
    8 ठाणे 0 0 23 अहिल्‍यानगर 1 0
    9 रायगड 0 0 24 छ.संभाजीनगर १५ 0
    10 पालघर 0 0 25 बीड 0 0
    11 पिंपरी चिंचवड 0 0 26 अकोला 0 0
    12 अमरावती 0 0 27 जळगांव 0 0
    13 बुलडाणा 0 0 28 यवतमाळ 0 0
    14 सोलापुर 1४ 0 29 नागपुर 22 0
    15 जालना 2 0 30 परभणी 0 0
    एकुण 1३१

     

    इन्फ्लुएंजा लसीकरण  मोहिम

    महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2024 पासून अति जोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फ्लुएंजा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहितील गरोदर माता सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे.

    खालील प्रमाणे वितरित करण्यात आले आहे

    अ.क्र आरोग्‍य मंडळ वितरित करण्‍यात आलेली लस झालेले लसीकरण
    1 पुणे 13000 373
    2 ठाणे 11500 4400
    3 कोल्‍हापुर 2000 1915
    4 नाशिक 2000 1900
    5 छ.संभाजीनगर 2000 1987
    6 लातुर 2000 1826
    7 अकोला 2000 2000
    8 नागपुर 11000 10022
    एकुण 45500 24423

     

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ रुग्‍णोपचार  वेबिनार –

    दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील सर्व डॉक्टर्स साठी इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ रुग्‍णोपचार  वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाइन प्रशिक्षणास राज्यातील सर्व जिल्ह्यातील रुग्णालय स्तरावरील डॉक्टर्स उपस्थित होते  यावेळी बी जे वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील तज्ञ डॉक्टरांनी सर्वांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरासन केले

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ मृत्‍युचे नियमित डेथ ऑडिट –

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ मुळे  होणाऱ्या मृत्यूचे नियमित डेथ  ऑडिट जिल्हा /मनपा आणि विभागीय स्तरावर करण्यात येते. यामधून झालेली मृत्यूची कारणे शोधून सर्वेक्षण रुग्णोपचार, संदर्भसेवा, क्षमता,  संवर्धन या संदर्भात आवश्यक कृती योजना आखण्यात येते.

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज असून राज्यात या आजारावरील ऑसेलटॅमिवीर औषधे आणि इतर साधन सामग्री पुरेच्या प्रमाणात उपलब्ध आहे. राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयात इन्फ्लुएंजा ए एच १  एन १  उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.

     

    इन्फ्लुएंजा ए एच १  एन १ प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मुख्यत्वे खालील उपाय योजना राबविण्यात येत आहेत.

    • फल्‍यू सदृश्य रुग्णाचे नियमित सर्वेक्षण .
    • फल्‍यू सदृश्य रुग्णावर वर्गीकरणानुसार विना विलंब उपचार.
    • राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षाची स्थापना.
    • उपचार सुविधा असणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना स्वाइन फ्लू उपचाराची मान्यता .
    • ऑसेलटॅमिवीर औषधे आणि इतर साधन सामग्री पुरेसा साठा उपलब्ध
    • दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहितील गरोदर माता सोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रतिबंधक लसीकरण .
    • महाराष्ट्र साथरोग प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची स्थापना
    • अन्न व औषध विभागामार्फत सर्व खाजगी औषध दुकानांमध्ये ऑसेलटॅमिवीर उपलब्ध ठेवण्यासाठी अंतरविभागीय समन्वय
    • शासकीय आणि खासगी डॉक्टरांच्या स्वाईन फ्लू कार्यशाळा .व जनतेचे आरोग्‍य शिक्षण

     

     लेप्टोस्पायरोसिस

    महाराष्ट्रात कोकण विभागातील सागर किनारपट्ट्यालगतच्या भागात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण विशेष करून आढळतात. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळतात. किनारपट्टी लगतच्या मुंबई आणि इतर शहरी भागातही पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे लेप्टो रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसते. याशिवाय भाताचे पीक घेणाऱ्या भागात तुरळक स्वरूपात लेप्टो रुग्ण आढळून येतात.

     

    लेप्टोस्पायरोसिस लागण आणि मृत्‍यु

    अ. क्र जिल्‍हा /मनपा 2021 2022 2023 2024 २१ एप्रिल २५  
    लागण मृत्‍यु लागण मृत्‍यु लागण मृत्‍यु लागण मृत्‍यु लागण मृत्‍यु  
    1 ठाणे 6 1 16 0 6 0 7 0 0 0  
    2 रायगड 64 0 114 11 47 4 17 1 25 0  
    3 पालघर 0 0 0 0 0 0 9 0 0 0  
    4 सिंधुदुर्ग 31 0 1 0 1 1 11 2 0 0  
    5 रत्‍नागिरी 0 0 0 0 0 0 0 0 0 0  
    6 पुणे 0 0 0 0 0 0 0 0 0 0  
    7 बृहनमुंबई मनपा 224 4 277 5 1383 0 790 22 5२ 0  
    8 ठाणे मनपा 4 2 23 0 18 2 58 0 1 0  
    9 पनवेल मनपा 0 0 8 0 0 0 0 0 0 0  
    10 मिरा भाईदर 0 0 3 0 0 0 0 0 1 0  
    11 पुणे मनपा 0 0 0 0 0 0 58 0 0 0  
    12 पिंपरी चिंचवड 3 1 1 0 0 0 0 0 0 0  
    13 कल्‍याण 14 1 5 2 21 1 1 0 0 0  
    14 सांगली 0 0 0 0 0 0 0 0 0 0  
    14 कोल्‍हापुर 1 1 0 0 0 0 0 0 0 0  
    15 वर्धा 0 0 10 0 0 0 0 0 0 0  
    16 अमरावती 0 0 0 0 2 0 0 0 0 0  
    17 जळगांव 0 0 0 0 6 0 0 0 0 0  
    18 सातारा 0 0 0 0 0 0 1 0 0 0  
    19 चंद्रपुर 0 0 0 0 0 0 1 1 0 0  
    20 नागपुर 0 0 0 0 0 0 0 0 10 0  
    एकुण राज्‍य 347 10 458 18 1484 8 953 26 ८९ 0  

     

    लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना-

    • सर्वेक्षण- लेप्‍टो प्रभावी पाचही जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आरोग्य कर्मचाऱ्यांचा आठवडी गृहभेटीचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यानुसार नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.
    • सर्व आरोग्य संस्थांमध्ये लेप्टो निदानाची व्यवस्था- संशयित लेप्‍टो रुग्णाचे निदान विनाविलंब होऊन त्याला उपचार वेळेवर सुरू व्हावा याकरिता लेप्‍टो प्रभावित जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रॅपिड डायग्नोस्टिक किटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालय व निवडक उपजिल्हा रुग्णालयात एलायझा चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    • औषधसाठा व उपचार सुविधा- सर्व लेप्‍टो प्रभावित जिल्ह्यामध्ये लेप्टो उपचारासाठी आवश्यक अशी सर्व औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कॅप्सूल डॉक्सीसायक्लिन हे लेप्‍टो आजारावरील प्रभावी औषध उपलब्ध आहे.
    • सर्व लेप्‍टो प्रभावित जिल्ह्यामध्ये रक्त घटक विलगीकरण सुविधा (ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट ) रक्तपेढ्यामध्ये उपलब्ध आहे.
    • प्रशिक्षण- लेप्‍टो  प्रभावित जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकरिता लेप्टो प्रभावित व नियंत्रणा संदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे.
    • अंतर विभागीय समन्वय- लेप्‍टोच्या प्रभावी नियंत्रणासाठी कृषी, पशुसंवर्धन तसेच नगर विकास विभागाचे नियमित समन्वय ठेवण्यात येतो.
    • आरोग्य शिक्षण व जनजागृती- लेप्टोस्पायरोसिस टाळण्यासाठी सर्वसामान्य जनतेने काय दक्षता घ्यावी यासंदर्भातील संदेश, हस्तपत्रिका, भिंतीवरील  म्‍हनी, बॅनर,  होल्डिंग अशा अनेक माध्यमातून देण्यात येत आहेत. याकरिता आकाशवाणी व दूरदर्शन माध्यमाचा ही वापर केला जात आहे.

    जलजन्‍य आजार – साथउद्रेक परिस्थिती   ( दि. २१ एप्रिल २०२५ अखेर )

     

    रोगाचे नांव 2022 2023 2024 २१ एप्रिल 2025 २०२५ मधील उद्रेक जिल्‍हयाची नांवे
    ला मृ ला मृ ला मृ ला मृ
    कॉलरा 26 1104 20 2 5 1 18 1028 4 1 1 0 अकोला-१
    गॅस्ट्रो 3 78 0 0 0 0 12 669 4 3 32 0 अमरावती ३ , १
    अतिसार 25 2354 5 15 1185 0 27 1474 6 2 130 0 पुणे १ नागपुर १
    काविळ 4 256 0 2 23 0 18 827 1 3 96 1 कोल्‍हापुर २, सांगली १
    विषमज्‍वर 0 0 0 0 0 0 0 0 0 1 22 0 अकोला-१
    एकुण 58 3792 25 19 1213 1 75 3998 15 10 281 1 Ongoing outbreak 4

      

    प्रतिबंधात्‍मक व नियंत्रणात्‍मक उपाययोजना

    • जोखमीच्या गावाची यादी तयार करणे.
    • वर्षातून दोन वेळा हिरवे पिवळे व लाल कार्ड बाबत सर्वेक्षण करण्यात येते. जोखमीच्या नसलेल्या गावांना हिरव्या रंगाचे कार्ड देण्यात येते . मध्यम जोखमीच्या गावांना पिवळ्या रंगाचे कार्ड देण्यात येते जोखमीच्या ग्रामपंचायतींना लाल रंगाचे कार्ड देवुन साथरोग प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची सूचना देण्यात येते.
    • पाणीपुरवठ्याच्या पाईप मधील गळत्या शोधणे व दुरुस्त्या करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
    • सार्वजनिक विहिरी कुपनलिकेच्या पाण्याची जिल्हा राज्य आरोग्य प्रयोगशाळे मार्फत नियमित तपासणी करण्यात येते.
    • साथरोग नियंत्रणासाठी औषधाचा व इतर साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात येतो.
    • पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत संनियंत्रण करण्यात येते.
    • रुग्ण सर्वेक्षण करणे साथरोगाच्या नियंत्रणासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण नियमित चालू असते. नेहमीच सर्वेक्षण हे तुरळक रुग्‍ण  व सहवासित  शोधणे यासाठी देखील उपयोगी ठरते.
    • सर्व साथीच्या आजाराच्या रुग्णांवर तसेच सहवासीतावर उपचार करण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी उपचार व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात येते.
    • गाव पातळीवरील जल सुरक्षकाचे पुनर्प्रशिक्षण घेण्यात आले आहेत.
    • सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
    • सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

     

    स्‍क्रब टायफस

    स्क्रब टायफस  हा एका  विशिष्ट प्रकारच्या रिकेटशिया  प्रकारच्या जिवाणूपासून पसरवणारा आजार आहे हा आजार अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया ,जपान, ब्रह्मदेश आणि भारतात आढळतो. भारतातील हिमाचल प्रदेशांमध्ये या आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आढळतात

    स्‍क्रब टायफस प्रसार झुडूपामध्ये वस्ती करणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या किटकाने माईट चावल्यामुळे माणसास हा आजार होतो.

    स्‍क्रब टायफस अधिशयन कालावधी  १ ते ३ आठवडे

    लक्षणे –

    • ज्‍या ठिकाणी किटक चावतो त्‍या जागी छोटासा अल्‍सर तयार होतो.त्‍याला इंशार असे म्‍हणतात.
    • ताप, डोकेदुखी, अंगदुखी , लिंफ, नोड सुजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश उठणे .
    • गुंतागुंत- न्‍युमोनिया, मेंदूज्‍वरसदृश्य लक्षणे, मायोकार्डायटिस इ. गंभीर रुग्णामध्ये मृत्यूचे प्रमाण 30%
    • निदान- शीघ्र निदान चाचणी अथवा एलायझा मार्फत निदान केले जाते. वेल-फेलिक्स चाचणी देखील निधनासाठी वापरली जाते.
    • उपचार- स्क्रब टायफस आणि एकूणच रिकेटशियन तापामध्ये टेट्रासायक्लीन क्लोरॅमफेनिकॉल  डॉक्सीसायक्लिन ही औषधे परिणामकारक ठरतात.

    प्रतिबंध व उपचार

    • माईट नियंत्रणासाठी किटकनाशकाचा वापर
    • झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाहेचे पायघोळ कपडे वापरणे.
    • कपडे अंथरून पांघरूणावर कीटकनाशकाच्या औषधाचा वापर करणे.
    • खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे
    • झाडाझुडपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत

    स्‍क्रब टायफस  राज्‍याची सदयस्थिती ( २१ एप्रिल २०२५)

    वर्ष 2021 2022 2023 2024 २१ एप्रिल २०२५
    रुग्‍ण 5 307 196 130 15
    मृत्‍यु 1 2 1 1 0

     

    हिवताप

    सन २०२० पासून राज्याची वर्षनिहाय हिवताप परिस्थिती

     

    वर्ष हिवताप रुग्ण पी.एफ.रुग्ण हिवतापाने मृत्यू पी.एफ %
    २०२० १२९०९ ६५७६ १२ ५०.९३
    २०२१ १९३०३ ११८६२ १४ ६१.४१
    २०२२ १५४५१ ८९८३ २६ ५८.१५
    २०२३ १६१५९ ६२९७ १९ ३८.९३
    २०२४ २१०७८ ८८३२ २६ ४१.८९
    २०२५

    (१ जाने. ते २१ एप्रिल अखेर)

    २७२६ १०३४ ३७.९३

     

    राज्यात सर्वाधिक हिवताप रुग्ण असलेले जिल्हे आणि मनपा पुढीलप्रमाणे –

    जिल्हा २०२४

     (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

     (२१ एप्रिल पर्यंत)

    मनपा २०२४

     (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

     (२१ एप्रिल पर्यंत)

      दूषित रुग्ण पी. एफ. मृत्यू दूषित रुग्ण पी. एफ. मृत्यू   दूषित रुग्ण पी. एफ. मृत्यू दूषित रुग्ण पी. एफ. मृत्यू
    गडचिरोली १०४१ ८१८ ७८१ ६१६ बृहन्मुंबई १३२७ ४४६ १४१३ ३३१
    रायगड ६६ १२१ १७ पनवेल ९३ १२९
    गोंदिया १९ १० १२ ठाणे ४१ १४ ७३ १२
    सिधुदुर्ग ११ कल्याण ४२ ३५
    सातारा १० मिरा भाईंदर १९ ३२
    रत्नागिरी नवी मुंबई १९
    पालघर पिं.चिं.

    मनपा

    कोल्हापूर पुणे मनपा

    केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अधिन राहून राज्यामध्ये राबविण्यात येणा-या विविध हिवताप विरोधी उपाययोजना खालीलप्रमाणे.

    (अ) सर्वेक्षण – नवीन हिवताप रुग्ण शाधण्यासाठी राज्यातील सर्व पाडा, वाडया, वस्ती, गांवपातळीवर आरोग्य कर्मचा-यांमार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण.आरोग्य संस्थेमार्फत अप्रत्यक्ष ताप रुग्ण सर्वेक्षण व रक्त नमुने संकलन केले जाते.

    • आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन कोड नंबर प्रमाणे किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
    • आशास्वयंसेवक स्थानिक स्तरावर किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग.

    (ब) प्रयोगशाळा  –

    • राज्यातील प्रत्येक आदिवासी प्रा.आ. केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहे.
    • बिगर आदिवासी क्षेत्रात २ ते ३ प्रा. आ. केंद्रासाठी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहे.
    • जिल्हा व ग्रामिण रुग्णालय स्तरावरही प्रयोग शाळा तंत्रज्ञ उपलब्ध आहे.
    • नविन पदाच्या आढाव्यामध्ये प्रत्येक प्रा.आ.केंद्राच्या ठिकाणी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजुर.
    • दुर्गम व अतिदुर्गम भागात हिवतापाच्या तात्काळ निदानासाठी रॅपिड डायग्नोस्टीक टेस्ट किटचा पुरवठा शासनामार्फत केला जातो.
    • पी.फॅल्सीफेरम या गंभीर स्वरुपाच्या हिवतापाचे शीघ्र निदान व उपचारासाठी आशा कार्यकर्तीना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

    क) डास नियंत्रणासाठी उपाययोजना :-

    • किटकनाशक फवारणी :- राज्यातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गांवामध्ये सिंथेटिक प्रायारेथ्राईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्यात येते.
    वर्ष फवारलेली लोकसंख्या (लाखात)
    २०१९ १३.६१
    २०२० ९६.६३
    २०२१ ९७.१९
    २०२२ ९७.५१
    २०२३ ९६
    २०२४ ९६.२६
    २०२५

    अळीनाशक फवारणी :- नागरी हिवताप योजनेंतर्गत राज्यातील निवडक १५ शहरांमध्ये (मुंबईसह) तसेच १६ हत्तीरोग नियंत्रण पथकामार्पुत डासोत्पत्तीस्थांनांवर टेमिफॉस, बी.टी.आय.  या अळीनाशकांची फवारणी करण्यात येते. राज्यात नागरी हिवताप योजनेत समाविष्ट असलेली १५ शहरे पुढीलप्रमाणे – औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, धुळे, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, अहमदनगर, पंढरपूर, सोलापूर, अकोला, पुणे व मुंबई.

    • जीवशास्त्रीय उपाययोजनाः– किटकनाशकांमुळे होणा-या प्रदूषणाचा विचार करुन राज्यामध्ये योग्य डासोत्पत्तीस्थानांमध्ये डास अळीभक्षक गप्पीमासे सोडण्यात येतात. सदर उपाययोजना ग्रामीण तसेच शहरी भागातही आहे. राज्यात गप्पीमासे पैदास केंद्रांची निर्मिती केली असून योग्य डासोत्पत्ती स्थानांत मासे सोडण्यात आले आहेत.
    • किटकनाशक भारीत मच्छरदाण्या :-राज्यात विविध माध्यमाव्दारे किटकनाशक भारीत मच्छरदाण्यांचे हिवताप समस्याग्रस्त भागात वाटप करण्यात आले, त्यापैकी गडचिरोली जिल्हयातील हिवताप समस्याग्र्रस्त भागामध्ये मच्छरदाण्या वाटप करण्यात आल्या.
    • किटकशास्त्रीय सर्वेक्षण:- नियमित सर्वेक्षणअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत १०ः घरामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते.

    (इ) मुल्यमापन व संनियत्रण :-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम योग्य रितीने राबविला जावा या करिता राज्य / जिल्हा / तालुका / प्रा.आ.केंद्र स्तरावरुन क्षेत्रीय भेटी व्दारे मुल्यमापन व संनियत्रण केले जाते.

    (ई) आरोग्य शिक्षण :-

    • हिवताप प्रतिरोध महिना जून :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये हिवताप कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी जून मध्ये हिवताप प्रतिरोध महिना विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.
    • गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवामध्ये जनतेमध्ये किटकजन्य आजारांविषया जनजागृती करण्यात येते.
    • विविध उपक्रम – पदयात्रा, ग्रामसभा, प्रभातफेऱ्या, कार्यशाळा, प्रशिक्षण,विविध माध्यमाद्वारे प्रसिध्दी (वृत्तपत्रे, हस्तपत्रिका, भित्तीपत्रिका, भिंतीवरच्या म्हणी, आकाशवाणी, दूरदर्शन, केबल टि.व्ही इ.)

     

    डेंगी ताप

    डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. सदर रोगाचा प्रसार डेंग्यू विषाणु दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू तापाचे ३ प्रकार आहेत.

    १) डेंग्यू ताप

    २) रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप

    ३) डेंग्यू शॉक सिंड्रोम.

    डेंग्यू ताप हा फल्यू सारखा आजार आहे. रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप व डेंग्यू शॉक सिड्रोंम हा तीव्र प्रकारचा रोग आहे यामध्ये मृत्यूही होण्याची शक्यता असते.

    डेंगी तापाच्या साथीच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना राबविण्यांत येतात.

    • ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा यांचेमार्फत केले जाते.
    • डेंगी तापाच्या निष्कर्षासाठी ताप रुग्णांचे रक्तनमुने घेऊन संशयित रुग्णांना पुर्ण गृहितोपचार दिला जातो.
    • तपासणीअंती आढळून येणा-या हिवताप रुग्णांना समुळ व पुर्ण कालावधीचा उपचारदिला जातो.
    • रक्तनमुने तपासणीअंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन.आय.व्ही. पुणे / राज्यातील निवडक ४३ सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविले जातात.
    • एडिस एजिप्ताय डासांचे नमुनेही विषाणुंचा प्रकार ओळखण्यासाठी एन.आय.व्ही.पुणे कडे तपासणीसाठी पाठविले जातात.
    • उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.
    • घरातील व परिसरातील डासअळया आढळून आलेले पाण्याच्या साठयांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायम पाणीसाठयात गप्पीमासे सोडले जातात.
    • जनतेस डेंगी तापा विषयक खालील बाबींचे आरोग्य शिक्षण दिले जाते.
    • पाणी साठवणूकीच्या भांडयांची झाकणे घटट् बसविणे. आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस ठरवून त्या दिवशी पाणी साठवणूकीची भांडी रिकामी करुन,घासून-पुसून पुन्हा पाणी भरण्यासाठी वापरणे.
    • घरातील व परिसरातील निरुपयोगी वस्तु उदा. फुटके पिंप, टायर, भांडी, कुंडया इत्यादी वस्तुंची विल्हेवाट लावणे.
    • प्रशिक्षण :- नवीन डेंग्यू व्यवस्थापन उपचार पध्दतीतप्रशिक्षकांचे प्रशिक्षण भीषक (फिजीशियन), बालरोग तज्ञ यांना देण्यात आले. या प्रशिक्षकांनी त्यांचे विभागातील वैद्यकिय अधिकारी व रुग्णालयीन कर्मचारी यांना प्रशिक्षित केले आहे.
    • राष्ट्रीय डेंग्यू दिन (१६ मे ) साजरा करण्यात आला.
    • डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येत आहे.
    • शालेय डेंग्यू जागृती मोहिम – माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वी च्या मुलांमध्ये डेंग्यू प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात माहे ऑगस्ट मध्ये शालेय डेंग्यू जागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
    • डेंगी/चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी राज्यात ४३ सेंटीनल सेंटर्स स्थापन केलेली आहेत.

    सन २०२० पासून डेंगी ताप माहिती खालीलप्रमाणे.-

     

    वर्ष तपासलेले रक्तजल नमुने डेंगी विषाणू युक्त मृत्यू
    २०२० ४५०२६ ३३५६ १०
    २०२१ ११०७६२ १२७२० ४२
    २०२२ ८५९६१ ८५७८ २७
    २०२३ १३४१०८ १९०३४ ५५
    २०२४ १५२३९७ १९३८५ ४०
    २०२५ (२१ एप्रिल अखेर) २२६०२ १३७३

     

    राज्यात सर्वाधिक डेंग्यू रुग्ण असलेले जिल्हे आणि मनपा पुढीलप्रमाणे –

    जिल्हा २०२४

    (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

    (२१ एप्रिल पर्यंत)

    मनपा २०२४

    (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

    (२१ एप्रिल पर्यंत)

      रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू   रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
    पालघर १६४ ९६ बृहन्मुंबई २७९ २६२
    पुणे ३१ ८४ नाशिक ७१ १०२
    अकोला ६५ ७१ अकोला ३६ ७९
    सिंधुदुर्ग ६४ मालेगाव ५६
    नाशिक २० ४१ कोल्हापूर ४२ २८
    वर्धा ३८ ३६ लातूर २०
    कोल्हापूर १०५ ३२ कल्याण २० १९
    यवतमाळ १६ ३२ पनवेल मनपा ३३ १८
    नंदुरबार ३० ठाणे २० १६
    नागपूर ३० सांगली मिरज ४० १५
    सातारा २८ पुणे मनपा १०
    ठाणे २१ २० छ. संभाजीनगर १३
    चंद्रपूर ४६ १८ मिरा भार्झ्ंदर
    गडचिरोली २३ १७ वसई विरार
    अहमदनगर १५ सोलापूर २१
    सांगली २९ १३ अमरावती ११

     

     

    चिकुनगुन्या

    चिकुनगुन्या विषाणुचा प्रसार एडीस एजिप्टाय या डासांपासून होतो. या विषाणू तापाची लक्षणे ताप, डोकेदुखी, उलटी,मळमळ, अंगावर चट्टे उमटणे व सांध्यातून हाडे वळणे इत्यादी आहेत.

     

    सन २०२० पासून चिकुनगुन्या तापाबाबतची सद्यस्थिती-

    वर्ष तपासलेले रक्तजल नमुने चिकुनगुन्या विषाणू युक्त मृत्यू
    २०२० ४२२९ ७८२
    २०२१ १९३६३ २५२६
    २०२२ १४७५८ १०८७
    २०२३ ३०८९२ १७०२
    २०२४ ५७४५३ ५८५४
    २०२५ (२१ एप्रिल अखेर) १०६२५ ६५८

     

     

    राज्यात सर्वाधिक चिकुनगुन्या रुग्ण असलेले जिल्हे आणि मनपा पुढीलप्रमाणे –

     

    जिल्हा २०२४

    (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

    (२१ एप्रिल पर्यंत)

    मनपा २०२४

    (२१ एप्रिल पर्यंत)

    २०२५

    (२१ एप्रिल पर्यंत)

      रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू   रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
    पुणे ३७ ६५ बृहन्मुंबई २० ९४
    अकोला ३३ ५५ अकोला ४४ ७०
    सिंधुदुर्ग ४४ सांगली मिरज ३८ २०
    ठाणे ३४ नाशिक १३ १८
    पालघर २६ ३४ ठाणे ११
    कोल्हापूर ४४ २७ कोल्हापूर १५ १०
    सांगली ३७ २३ नवी मुंबई
    सातारा १७ पुणे मनपा
    वर्धा १५ सोलापूर

     

    जॅपनिज एन्सेफेलाईटिस (मेंदुज्वर)

    सन २०२० पासून ए.ई.एस./ जे.ई / चंडिपुरा रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे

    वर्ष जे. ई. चंडिपुरा ए.ई.एस. झिका एकुण
      रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू रुग्ण मृत्यू
    २०२० १२ १४
    २०२१
    २०२२
    २०२३ १८ २४
    २०२४ १४० १४५
    २०२५ (२१ एप्रिल अखेर)

     

    जे.ई (मेंदूज्वर) प्रतिबंधात्मक उपाययोजना-

    राज्यात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूर, भंडारा, गडचिरोली व अमरावती मनपा तसेच

    मराठवाडयातील लातूर व बीड हे जिल्हे जे.ई. साठी संवेदनशील असून या जिल्हयामध्ये जे.ई. आजाराच्या

    प्रतिबंधासाठी दरवर्षी नियमित लसीकरण मोहिम राबविण्यात येते.

    • आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी,जलद ताप सर्वेक्षण, ताप रुग्णांचे रक्तनमुने घेवून सर्व रुग्णांना हिवतापाचा गृहितोपचार देणे.
    • रक्तनमुने तपासणीअंती हिवताप नसल्याचे आढळल्यास, संशयित जे.ई ताप रुग्णांचे रक्तजलनमुने घेऊन एन.आय.व्ही व निवडक सेंटीनल सेंटर येथे विषाणू परिक्षणासाठी पाठविणे.
    • किटकशास्त्रीय सर्वेक्षण.
    • उद्रेकग्रस्त परीसरात धुरफवारणी.
    • परिसर स्वच्छते विषयी जनतेस आरोग्य शिक्षण व डुकरांच्या संख्येवर नियंत्रण.
    • नैसर्गिक डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेणे, व डासोत्पत्ती स्थानात डासअळीभक्षक गप्पी मासे सोडणे.
    • जे.ई. आजाराच्या निदानासाठी राज्यात ५ सेंटीनल सेंटर्स स्थापन केलेली आहेत

    हत्तीरोग

    अ) राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम –

    राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम राज्यात १९५७ पासुन सुरु झाला.

    राज्यातील १८ जिल्हे हत्तीरोग प्रभावित आहेत. जिल्हे-चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, नंदरूबार, सोलापूर, अकोला, जळगांव, ठाणे व पालघर. हत्तीरोग हा आजार वूचेरीया बँक्रोप्टाय व ब्रूगियामलायी नावाच्या परजीवीमुळे होतो. हा परजीवी क्युलेक्स डास चावल्यामुळे मानवी शरीरात प्रवेश करतो.

    ब) हत्तीरोग लक्षणे –

    या आजारात सुरुवातीच्या काळात ताप व अंगदुखी आढळते.

    हत्तीरोगाचे परजीवी लसिका वाहिन्या व ग्रंथीमध्ये अडथळा निर्माण करतात, त्यामुळे काही वर्षांनंतर रुग्णांच्या हाता-पायावर सुज येते तसेच पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला सुज येते.

    या आजारामुळे रुग्णाचा मृत्यु होत नाही तथापि पायाला/ अंडाशयाला प्रचंड सुज आल्याने त्याचे  सामाजिक, भावनिक आणि आर्थिक जीवन धोक्यात येते.

    क्) हत्तीरोग-प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना –

    १) हत्तीरोग सर्वेक्षण – दरवर्षी दिनांक १६ ते ३१ ऑगष्ट या कालावधीत राज्यातील हत्तीपाय आणि अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. राज्यात सन २०२० पासून हत्तीरोग रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

    वर्ष हत्तीपाय रुग्णांची संख्या अंडाशयवृध्दी रुग्णांची संख्या एकूण
    १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२० ३१२५८ ११९२९ ४३१८७
    १६ ते ३१ ऑगस्ट २०२१ २९४४९ ७८३७ ३७८२९
    १६ ते ३१ ऑगस्ट २०२२ ३०३३४ ७२५६ ३७५९३
    १६ ते ३१ ऑगस्ट २०२३ ३०८९४ ५२२९ ३६१२३
    १६ ते ३१ ऑगस्ट २०२४ २८४७५ २८७९ ३१३५४

    २) हत्तीरोग बाधित रुग्णांना उपचार – मागील ३ वर्षातील हत्तीरोग सर्व्हेक्षणासाठी तपासणी केलेल्या रक्तनमूने आणि नव्याने हत्तीरोग दूषित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. –

    वर्ष तपासणी केलेले रक्तनमूने हत्तीरोग दुषितरुग्ण संख्या
    २०२० ८१०८६५ ६४८
    २०२१ १४९४७७० ४१४
    २०२२ ११७५६४० ५६३
    २०२३ ११३५९३३ ३७५
    २०२४ १२७८०९० ३२४
    २०२५ ( मार्च अखेर) ११६८५५ ३०

     

    ३) हत्तीपाय झालेल्या रुग्णांची नियमित निगा (विकृती व्यवस्थापन) –

    मागील वर्षात (डिसेंबर २०२२ अखेर) राज्यातील २४,६९७ हत्तीपाय रुग्णांना विकृती व्यवस्थापन किट पुरविण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे.

    ४) अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) झालेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया –

    हत्तीरोगामुळे अंडाशयवृध्दी (हायड्रोसील) झालेल्या रुग्णांना शोधून त्यांची हायड्रोसील शस्त्रक्रिया करण्यात येते. राज्यातील सन २०२० पासून शस्त्रक्रिया विषयक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

     

      

    वर्ष हायड्रोसील शस्त्रक्रिया संख्या
    २०२० २११५
    २०२१ ४०३३
    २०२२ ३२८२
    २०२३ ३२९८
    २०२४ २०८४
    २०२५ (मार्च अखेर) ३०५

     

    ५) हत्तीरोग प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम (MDA- Mass Drug Administration) एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम –

    • या मोहिमेत हत्तीरोग प्रभावित कार्यक्षेत्रातील २ वर्षावरील सर्वांना हेट्राझान, अल्बेंडॅझोल, आयव्हरमेक्टिनही औषधे खाऊ घातली जातात.
    • या औषधांमुळे रक्तातील हत्तीरोग जंतू मारले जाऊन हत्तीरोग प्रसार रोखण्यास मदत होते.
    • सन २०२२ मध्ये ५ जिल्हयात (ठाणे, पालघर, नंदुरबार, नागपूर,यवतमाळ) एम.डी.ए.कार्यक्रम राबविण्यात आला आहे.सन २०२३ मध्ये ४ जिल्हयात (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर आणि भंडारा) एम.डी.ए. कार्यक्रम राबविण्यात आला आहे.

    केंद्र शासनाने एम.डी.ए. कार्यक्रम ७ दिवसामध्ये पुर्ण करणेबाबतच्या सुचना दिल्या असताना सर्व लाभार्थी पर्यत लाभ पोहोचण्याच्या दृष्टीकोनातुन सदर कार्यक्रम २१ दिवस यशस्वीरित्या राबवुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना औषधोपचार दिलेला आहे

    ६)  संसर्ग पडताळणी सर्वेक्षण (TAS – Transmission Assesment Survey).-

    • ज्या जिल्हयात MDA च्या ५ फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत, त्या भागातील हत्तीरोग संसर्ग / प्रसार प्रमाण कमी झाले आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी हा सर्व्हे करण्यात येतो.
    • या सर्व्हेमध्ये ६ व ७ वर्षेवयोगटातील २००० मुलांचे सर्वेक्षण करण्यात येते.
    • त्यातील १८ पेक्षा कमी मुले हत्तीरोग बाधित आढळली तर टास सर्वे यशस्वीपणे पार पडला असे गृहित धरण्यात येते.
    • याप्रकारे ३ सर्व्हे यश्स्वीरित्या पार पडल्यानंतर तो जिल्हा हत्तीरोग मुक्त झाला असे घोषित करण्यात येते.

    ७) हत्तीरोग प्रतिबंध व नियंत्रणाबाबत जनतेचे प्रबोधन

    ड) हत्तीरोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यातील यंत्रणा –

    हत्तीरोग सर्वेक्षण पथके – ६

    हत्तीरोग नियंत्रण पथके –  १६

    हत्तीरोग रात्रचिकित्सालये – ३४

    इ) हत्तीरोग नियंत्रणात राज्याने केलेली कामगिरी-

    १) राज्यातील १८ हत्तीरोग प्रभावित जिल्हयांपैकी एकूण ८ जिल्हयांनी टास ३ हा टप्पा पूर्ण केला असून त्यामुळे हे जिल्हे हत्तीरोग मुक्त झाले आहेत. (सिंधूदुर्ग, अकोला, जळगांव, अमरावती, वर्धा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद).

    २) मागील ३ वर्षात हायड्रोसील रुग्णांची संख्या ११९२९ वरुन ७२५६ वर आली आहे.

    लाभार्थी:

    नागरीक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन