राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम (NPPCF)
प्रस्तावना –
फ्लोरोसिस आजाराचे मुख्यत्वे ३ प्रकार आहेत ( हाडांचा फ्लोरोसीस, दंत फ्लोरोसीस व अन्य प्रकारचे फ्लोरोसीस ) हा आजार द्रवपदार्थ, अन्नपदार्थ, औद्योगिक प्रदूषण इत्यादीं स्त्रोतामार्फत जास्त प्रमाणात फ्लोराइड घटकाच्या दीर्घकालीन सेवनामुळे होतो. या हानीकारक परिणामांचे स्वरूप कायमचे आणि अपरिवर्तनीय असते, ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो.
फ्लोराइडचे प्रमुख स्रोत –
फ्लोराइडचा मुख्य स्रोत पाणी, अन्न, औषधे आणि औद्योगिक प्रदूषण आहे. भारतीय मानके Bureau of Indian Standards (BIS) नुसार पाण्यात फ्लोराइडचे 1.5 ppm च्या मर्यादेपर्यंत प्रमाण असावे.
- फ्लोरीन हा नैसर्गिकपणे उपलब्ध असतो, जो फ्लोराइडसारख्या संयुगांमध्ये आढळतो.
- फ्लोराईड हाडांच्या खनिजकरणासाठी आणि दातांच्या ( एनॅमल्स ) निर्मितीसाठी आवश्यक आहे.
- फ्लोराईडच्या कमतरतेमुळे दातांचे विकार होऊ शकतात.
- शरीरात हाडांमध्ये आणि दातांमध्ये फ्लोराइडचे प्रमाण 96% असते.
- पाण्यात फ्लोराइडचे 5 ते 0.8 मिग्रॅ/लीटर प्रमाण असले तरी ते आरोग्यासाठी आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये फ्लोरोसिसचे आजाराचे प्रमाण आढळले आहे, यात यवतमाळ, वाशीम, नांदेड, बीड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्हयांचा समावेश आहे. फ्लोराइडच्या अधिक प्रमाणामुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये फ्लोरोसिस आजार असलेले काही जिल्हे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे हलके, मध्यम आणि तीव्र फ्लोरोसिसच्या क्षेत्रांमध्ये वर्गीकृत केले गेले आहेत.
फ्लोरोसिस मुळे दात आणि हाडांच्या संरचनेत बदल होतात, जे कालांतराने अपरिवर्तनीय होतात. त्यामुळे फ्लोरोसिसचे व्यवस्थापन हे प्राधान्याने प्रतिबंध, आरोग्यवर्धन, विकृती सुधारणा आणि पुनर्वसनावर निर्धारीत करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाची उद्दीष्टे –
राष्ट्रीय फ्लोरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दीष्टे खालीलप्रमाणे आहेत:
- पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील फ्लोरोसिस घटकाची माहिती संकलित करणे, त्याचे मुल्यमापन करणे.
- फ्लोरोसिस घटकाचे अधिक प्रमाण आढळुन आलेल्या जिल्हयांमध्ये फ्लोरोसिस आजार प्रतिबंधाकरीता सर्वांगीण व्यवस्थापन करणे.
- कार्यक्रमांतर्गत फ्लोरोसिस आजाराच्या प्रतिबंध, निदान आणि व्यवस्थापनासाठी स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा बळकटीकरण व आवश्यक पायाभुत सुविधा क्षमता विकसीत करणे.
महाराष्ट्र राज्यामध्ये NPPCF चे कार्यान्वयन-
NPPCF कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात 2009-2010 पासून सुरु करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचा समावेश दुस-या टप्प्यात केद्रशासन स्तरावरुन करण्यात आला.
कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रण जबाबदारी –
उपसंचालक, मौखिक आरोग्य, आरोग्य सेवा यांना NPPCF कार्यक्रम समन्वयासाठी राज्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १ जिल्हा सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे.
फ्लोरोसिसच्या प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे
लघवीच्या नमुन्यांची तपासणी
- a) नमुना संकलन
15 मि.लि. स्पॉट लघवी नमुना 25 मि.लि. प्लास्टिक स्क्रू कॅप बाटल्यांमध्ये घेण्यात यावा.
ii. 1-2 थेंब टोल्युएन (AR ग्रेड) घाला.
iii. योग्यपणे लेबल करा.
- b) नमुन्यांची वाहतूक
लघवी नमुना एक आठवड्याच्या आत जिल्हा प्रयोगशाळेत पाठवावा.
ii. नमुना विशिष्ट तापमानात खोलीमध्ये ठेवण्यात येते.
iii. प्राप्त अहवाल राज्य नोडल अधिकाऱ्याला जिल्हयांमार्फत पाठवण्यात यावा.
- प्रारंभिक शोध
फ्लोरोसिस प्रकरणांची पुष्टी करण्यासाठी खालील निकष वापरले जातात:
i. जास्त फ्लोराइड असलेले लघवी नमुना (>1 मिग्रॅ/लीटर) असलेली संशयित प्रकरणे.
ii. हाताच्या हाडांमध्ये इंटेरॉसियस मेंब्रेन कॅल्सिफिकेशन असलेली संशयित प्रकरणे, एक्स-रेद्वारे प्रमाणित.
आरोग्य शिक्षण
फ्लोरोसिस आजाराशी संबंधित आहार विषयक सुचना यादी खालील प्रमाणे आहे.
याचे सेवन करावे . | सेवन करु नये . |
ü कॅल्शियम समृद्ध अन्न
ü दूध ü दूध उत्पादने ü हिरव्या पालेभाज्या ü व्हिटॅमिन C समृद्ध अन्न ü लोह युक्त् अन्न ü आंबट फळे ü केळी, पेरू, वांगी |
x काळा चहा x काळा/रॉक मीठ x तंबाखू x सुपारी x फ्लोरिडेटेड टूथपेस्ट
|
उपचार
• वैद्यकीय उपचार: या आजाराकरीता कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत; पण उपचार म्हणून व्हिटॅमिन
C & D, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम व आहार सुधारणे हे उपचार देण्यात येतात.
• विकृतीचे उपचार : ऑर्थोसिस, विविध प्रकारचे शूज ( दुरूस्ती करण्यासाठी ), फिजिओथेरपी.
2024-25 साठी NPPCF अंतर्गत 7 जिल्हे:
- नागपूर
- नांदेड
- चंद्रपूर
- बीड
- लातूर
- वाशीम
- यवतमाळ
लाभार्थी:
व्यक्ती
फायदे:
देशातील फ्लोरोसिस प्रकरणे रोखणे आणि नियंत्रित करणे.
अर्ज कसा करावा
विकृतींवर उपचार: ऑर्थोसेस, सर्जिकल शूज, फिजिओथेरपी, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया.