बंद

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)

    • तारीख : 15/04/2025 -

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM)

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) हा भारत सरकारचा राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत २०१३ मध्ये सुरु केलेला एक प्रमुख कार्यक्रम आहे.शहरी गरीब आणि शहरी लोकसंख्येतील इतर शहरी गरीब आणि शहरी लोकसंख्येतील इतर असुरक्षित घटकांना दर्जेदार आणि परवडणा-या आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश देऊन त्यांची आरोग्य स्थिती सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महाराष्ट्रः-

    १५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील ३९७ शहरे आणि शहरांमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान राबविण्यात येत आहे. यामधील शहरे, १ मेट्रो सिटी, २८ महानगरपालिका,३६१ नगरपालिका आणि ७ कटकमंडळे सामाविष्ट आहेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान ५.०३ कोटी (२०११ च्या जनगणनेनुसार) शहरी लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरवते,जी एकूण लोकसंख्येच्या ४५ टक्के आहे.

    कार्येः

    नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे , नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे , नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि पॉलिक्लिनिकची स्थापना आणि बळकटीकरण.

    • डॉक्टरपरिचारिका आणि सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांसह आरोग्य सेवा प्रदात्यांची भर्ती आणि प्रशिक्षण घेणे.
    • माता, आणि बाल आरोग्य, कुटुंब नियोजन आणि किशोरवयीन आरोग्यासाठी कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
    • स्क्रीनिंग, लवकर ओळख आणि व्यवस्थापनासह एनसीडी प्रतिबंध आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करणे.
    • संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांचे बळकटीकरण करणे.
    • आशा, रुग्ण कल्याण समिती आणि महिला आरोग्य समितीच्या माध्यमातुन सामुदायिक सहभाग घेणे.
    • आरोग्य सुविधांद्वावरे बाहयरुग्ण शिबिरे उपक्रम राबविणे.
    • मजवुत गुणवत्ता आश्रवासन यंत्रणेची अंमलबजावणी करणे.

     

    भारत सरकाराच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान प्रकल्प अंमलबजावणी आराखडा सन २०२३-२४ करीता महाराष्ट्र राज्याला रु.६९१३९.०१ लक्ष बजेट मंजुर करण्यात आले होते, आणि नागरी आरोग्य अभियान, प्रकल्प अंमलबजावणी आराखडा सन२०२४-२५ करीता रु.९६५४८.७० लक्ष मंजुर आहेत. आणि जानेवारी २०२५ पर्यंत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निधीचा वापर महाराष्ट्र राज्यात वितरित प्रकल्प अंमलवजावणी आराखडयाच्या तुलनेत १०६.८८ टक्के आहे.

    सुविधा प्रकार लक्षांक साध्य
    UPHC (नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र) ८१८ 809
    UHWCAAM(नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर) आणि HBT आपला दवाखाना 2232 1433
    UCHC (नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र) 44 40
    Polyclinic  (पॉलिक्लिनिक) 248 216

     

     

    हा कार्यक्रम राज्य कार्यक्रम व्यवस्थापन युनिट आणि शहर कार्यक्रम व्यवस्थापन युनिट मार्फत राबविण्यात येतो.

    महत्त्वाच्या आरोग्य सेवा वितरण संवर्गाचे तपशिल (UPHC+UCHC स्तर )

    अ.क्र. सवंर्ग मंजुर पदे भरलेले पदे रिक्त पदे टक्केवारी
    1 विशेषतज्ञ 138 49 89 35.51
    2 वैदयकीय अधिकारी एमबीबीएस 1328 680 648 51.20
    3 स्टार्फ नर्स 1507 1174 333 77.90
    4 एएनएम 3580 2928 652 81.79
    5 लॅब टेक्नीशियन 680 518 162 76.18
    6 फार्मासिस्ट 636 550 86 86.48
    एकुण 7869 5899 1970 74.97

     

     UHWC AAM स्तरावरील मानव संसाधनाचे तपशीलः फेब्रुवारी २०२५ पर्यंत

    अ.क्र. संवर्गाचे नाव मंजुर पदे भरलेले पदे रिक्त पदे
    1 वैदयकीय अधिकारी 2232 1032 1200
    2 स्टार्फ नर्स 2232 898 1334
    3 आरोग्य सेवक 2232 697 1535
    4 सफाई कर्मचारी 2232 920 1312
    5 सुरक्षा रक्षक 2232 898 1334
    एकुण 11160 4445 6715

     

    मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती (आशा)

    • आशा या शहरी झोपडपट्टी समुदायांना आरोग्य सुविधांशी जोडणारे महत्त्वाचे फ्रंटलाइन कामगार म्हणुन काम करतात.
    • ते त्यांच्या नियुक्त सेवा क्षेत्रात आरोग्य सेवांची मागणी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
    • प्रत्येक आशा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रासाठी जबाबदार असेल, विशेषतः १०००-२५०० लाभार्थ्यांना (अंदाजे २००-५०० कुटुंबाना) सेवा देते.
    • आशांना रु.३००० चे निश्चित प्रोत्साहन भत्ता आणि रु.१०,००० प्रति महिना राज्य प्रोत्साहन दिले जाते. तिला विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ३६ प्रकारच्या निर्देशकांविरुध्द कामगिरी- आधारीत प्रोत्साहन देखिल मिळते.

    सन२०२४-२५ नुसार महिला आरोग्य समिती (MAS) स्थिती

    • प्रत्येक ५०० लोकसंख्येसाठी किंवा १०० कुटुंबांसाठी एक महिला आरोग्य समिती (MAS) स्थापन केली जाते.
    • आशा डा च्या सदस्य सचिव म्हणून काम पाहतात.
    • MAS समुदाय- आधारित समवयस्क शिक्षण गट म्हणुन कार्य करतात.

    MAS च्या प्रमुख भुमिकाः

    • समुदाय एकत्रीकरण
    • समुदाय निरीक्षण
    • आरोग्य सेवांचे संदर्भ
    • प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणे.
    • ओळखल्या गेलेल्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश सुलभ करणे.
    • सामुदायिक आरोग्य उपक्रमांसाठी मिळलेल्या अनुदानाचे व्यवस्थापन करणे.

     

    महिला आरोग्य समिती(MAS) स्थिती फेब्रुवारी २०२५ पर्यंत

    महिला आरोग्य समिती उद्दिष्टे २०२४-२५ महिला आरोग्य समितीची स्थापना केलेली संख्या
    10952 8599

     

     बाहयरुग्ण शिबिर स्थितीः

    • बाहयरुग्ण शिबिरेः असुरक्षित लोकसंख्येला तज्ञ सेवा, निदान सेवा आणि औषधे प्रदान करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातात
    • बजेटः रु.१०००० प्रत्येक शिबिरासाठी
    • लक्षांकः प्रति नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वार्षिक २ शिबिरे

     

    शहरी आरोग्य पोषण दिनः

    • लक्ष्यित लोकसंख्येला प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आरोग्य सेविकेद्वारे UHNDS आयोजित केले जाते.

     

    • RMNCH+A सेवांसह NCDs वर लक्ष केंद्रित केले जाते.
    • लक्षः प्रति नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वार्षिक 120 UHND

     

    बाहयरुग्ण शिबिरेः फेब्रुवारी २०२५ पर्यंत

    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव   प्राधान्य /वितरित प्रकल्प अंमलवजावणी आराखडानुसार उद्दिष्टे साध्य फेब्रुवारी २०२५  पर्यंत टक्केवारी
    1 बाहयरुग्ण शिबिरे 1334 958 71.81
    2 UHND 79560 54045 67.93

     

    रुग्ण कल्याण समिती व अबंधित निधीः

    • रुग्ण कल्याण समिती ही शहरी भागात सामुदायिक सहभागासाठी एक सोपी परंतु प्रभावी व्यवस्थापन रचना आहे.
    • निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखालील ही समिती सोसायटी नोंदणी कायदा १८६० अंतर्गत नोंदणीकृत आहे.
    • ही समिती सुविधा स्तरावर आरोग्य सेवांच्या नियोजनात गुंतलेली असते आणि कामगिरीचे निरिक्षण करते.
    • (Untied fund) अबंधित निधी : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता किंमत रु.१.७५ लक्ष आहे आणि नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राकरीता रु.२.५० लक्ष आहे.
    • दिलेला निधी खालील कामांसाठी वापरायचा आहे.
    • औषध,उपरकणे,ड्रेसिंग मटेरियल/बॅंडेज/कापुस खरेदी.
    • संस्थेची किरकोळ दुरुस्ती.
    • स्वच्छ ड्रेनेज, शौचालयाची सोय.
    • रुग्णांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
    • रुग्णांसाठी वसण्याची व्यवस्था करणे.
    • फर्निचर दरवाजा/खिडक्या (सुतारकाम) दुरुस्ती करणे.
    • इतर नाविन्यपुर्ण योजनांसाठी निधी (आउटडोअर मेडिकल कॅम्प)

    रुग्ण कल्याण समिती नोंदणी स्थिती फेब्रुवारी २०२५ पर्यंत

    अ.क्र. संस्थाचे प्रकार रुग्ण कल्याण समिती स्थिती
    एकुण उद्दिष्ट एकुण नोंदणीकृत संस्था मिटींग उद्दिष्ट घेतलेल्या बैठकांची स्थिती
    1 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिका 725 313 2504 1015
    2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,नगरपालिका 93 75 600 370
    3 नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, 44 24 192 186
    एकुण 862 412 3296 1571

    भारत सरकराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, राज्यात रुग्णकल्याण समितीऐवजी जन आरोग्य समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

    JSSK रेफरल ट्रान्सपोर्ट (मुंबई:-

    राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत संदर्भ वाहतुक कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत,मुंबई आणि MMRDA परिसरात प्रसुतीनंतर माता, नवजात बालक आणि आजारी अर्भकांना (० ते १ वर्षे) त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी मोफत वाहन सेवा दिली जाते.

     

    भौतिक साध्यः-

    JSSK ड्रॉप बॅक अहवाल FY- २०२४-२०२५ एप्रिल-२४ ते फेब्रुवारी -२५
    मुंबई महानगरपालिका
    अ.क्र. आर्थिक वर्ष गर्भवती महिलांना मोफत ड्रॉप बॅक आजारी मुलांना मोफत ड्रॉप बॅक (०१ वर्षे) JSSK लाभार्थांना दिलेल्या ड्रॉप बॅक सेवेची संख्या
    1 एप्रिल-२४ ते फेब्रुवारी -२५ 24533 43633 75722

     

    IHIP & HMIS (मुख्य) पोर्टल अंतर्गत शहरी सुविधा आधारित अहवाल स्थितीः

    • एचएमआयएस ही एक माहिती प्रणाली आहे जी विशेषतः आरोग्य कार्यक्रमांचे व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
    • NUHM अंतर्गत पोर्टलवर सुविधा आधारित अहवाल देणे १ नोव्हेंबर २०१५ पासुन सुरु झाले जे सध्या १०० टक्के पर्यंत वाढले आहे.

     

    मंजुर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा सन २०२४-२५ करीता खर्च फेब्रुवारी २०२५ पर्यंत

    Sr.No Budget Head   TOTAL
    Approved PIP for FY 2024-25 Distributed PIP for FY- 2024-25 after prioritization Exp upto February  against prioritization –  2024 Expenditure % against on prioritization
    127 Development and operations of Health and wellness centres-urban 6496.89 1601.56 415.05 25.92
    128 Wellness activities at HWCs-urban 1377.36 500.36 521.37 104.20
        129 Teleconsultation facilities at HWCs-Urban 99.83 0.00 0.00 0.00
    130 Asha 8530.7 2835.00 4417.19 155.81
    131 MAS 1175.26 45.00 45.99 102.20
    132 JAS 4.32 2.16 0.59 27.44
    133 RKS 3.07 1.02 0.78 76.55
    134 Outreach activities 707.51 310.58 267.83 86.24
    135 Mapping of Slums and Vulnerable population 60 0.00 0.00 0.00
    136 Other community Engagement Components 0 0.00 0.00 0.00
    137 Urban PHC’s 1308.3 287.89 227.77 79.12
    138 Urban CHC’s and Maternity Homes 1125 0.00 21.69 0.00
    139 Quality Assurance Implementation & Mera aspataal 897.18 148.55 13.29 8.94
    140 Kayakalp 562.78 230.79 65.03 28.18
    141 Swachh swasth Sarvatra 0 0.00 0.00 0.00
    142 Remuneration for all NUHM HR 65175.1 23014.24 25251.44 109.72
    143 Incentives(Allowance, Incentives,staff welfarefund) 6026.4 327.32 495.01 151.23
    144 Incentives Under CPHC 902.4 360.00 65.73 18.26
    145 Cost for HR Recruitment and Outstanding 425.15 270.00 211.51 78.34
    146 Planning and Programm Management 322 117.54 50.64 43.08
    147 PPP 0 0.00 0.00 0.00
    148 State Specific programme innovation and interventions 15.11 6.53 188.50 2887.81
    149 United Fund 1334.35 243.65 127.54 52.34
    TOTAL 96548.70 30302.19 32386.93 106.88

     

     

     

     

     

     

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online