राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
प्रस्तावना
तंबाखू सेवनामुळे बरेच असंसर्गजन्य रोग निर्माण होतात. उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, इत्यादी. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियत्रण कार्यक्रम सन २०१६-१७ पासून ३४ जिल्हात राबविण्यात येत आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो.
तंबाखू सेवनाच्या आकडेवारीमध्ये एन. एफ. एच. एस. यांच्या सर्वेक्षणानुसार सन २००५-०६ (NFHS-3) ते २०१५-१६ (NFHS-4) मध्ये घट आढळून आली आहे. सन २००५-०६ मध्ये स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण १०.५ % वरून २०१५-१६ मध्ये ५.८% वर तर सन २००५-०६ मध्ये पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण ४८.३% वरून सन २०१५-१६ मध्ये ३६.६% एवढी घट दिसून आलेली आहे.
सन २०२६-१७ GATS – २ च्या अहवालानुसार राज्यात ६% पुरुष व १.४ महिला असे ३.८% प्रौढ व्यक्ती धुररहित (Smoke) तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात.
31.7% पुरुष व 16.6% महिला असे एकूण 24.4% प्रौढव्यक्ती धुरविरहित (Smokeless or chowing tobacco) तंबाखूचे सेवन करतात.
सन २००९ -१० GATS – 1 व सन २०१६ – १७ GATS – २ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात धूर रहित (smoking) तंबाखू सेवनाचे प्रमाण २.८% इतके तर धूरविरहीत (Smoking ओर Chowing tobacco तंबाखू सेवनाचे प्रमाण ३.२% ने घटले आहे. तसेच तंबाखूच्या कोणत्याही प्रकारचा तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण ही ४.८% टक्क्यांनी म्हणजेच सन २००९-१० GATS – 1 च्या सर्वेमध्ये आढलळलेल्या ३१.४% वरुण ते GATS – २ च्या सर्वेमध्ये २६.६% इतकी घट झाली आहे.
या कार्यक्रमाची प्रमुख उदिदष्टे:-
- तंबाखूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायदयाविषयी मोठया प्रमाणावर जनजागृती करणे
- सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य कायदा 2003 व त्या अंतर्गत कलमे :-
- कलम 4 – सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी.
- कलम ५ – सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहीरातीवर बंदी.
- कलम ६ अ – १८ वर्षाखालील मुलामुलिंना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी.
- कलम ६ ब – शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी.
- कलम ७ – तंबाखूजन्य पदार्थाच्या पॅकेटवर वैधानिक ईशारा छापणे.
प्रमुख घडामोडी
- राज्य नियंत्रण समिती (तंबाखू नियंत्रण कायदा – ५ कलम करिता) (शासन निर्णय क्रं. व्यसन २००८ /प्र.क्र. २४५/ आ – ५, दि. १ ऑक्टोबर २००८) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची समिती करण्यात आलेली आहे.
- जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तंबाखू नियंत्रण समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे व त्या समितीच्या त्रैमासिक बैठक होत आहे.
- सुपारी सेवनाने कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाच्या (FDA) नोटिफिकेशन दि. १५/७/२०२० नुसार राज्यात तंबाखू, स्वादिष्ट /सुगंधित सुपारी यावर प्रतिबंध करण्यात आले आहे.
- दिनांक १/७/२०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. तंबाखू /प्र. क्र. २३३/आ – ५, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंध अधिनियम २०१५.
- अधिसूचना ३/४/२०१८ नुसार सिगारेट व तंबाखू उत्पादनावरील वेष्टन, पॅकिंग तसेच तंबाखूने कॅन्सर होतो, तंबाखू जीव घेणा आहे, आजच सोडा ह्या प्रकारे नवीन सूचना जरी करण्यात आल्या आहेत.
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. कोरोना – २०२०/ प्र. क्र. ११० /आ – ५, महाराष्ट्र राज्यात तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास/ थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्याबाबत दिनांक २९.५.२०२०.
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यशासनाच्या दि. २४.९.२०२० रोजी च्या परीपत्रकानुसार कोटपा कायदा २००३ कलम ७ (२) ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी बिडी, सिगारेट, यासारखे उत्पादने पाकिटाशिवाय तथा वैधानिक चेतावणी शिवाय विक्री करण्यावर पूर्णता बंदी आहे.
- तंबाखू सेवन मुक्ती करीता (National Tobacco Quit Line) तयार करण्यात आलेली असून त्याचा टोल फ्री क्रमांक हा 1800-11-2356 आहे.
- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परीपत्रक क्रं. संकीर्ण – २०२०/ प्र.क्र.२३४ /एस. डी.- ४, मंत्रालय मुंबई, दि. १० फेब्रूवारी २०२१ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत.
- महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रं तनिका-२०१५ .प्र.क्र. १७७ /आ – ५, मंत्रालय मुंबई, दिनांक ३० मे २०२३ – सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य चेतावणी देण्याबाबत.
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तनिका-२१२३/प्र.क्र-८१/आ-5, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत दि. १० जुलै २०२३.
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तनिका-२१२३/प्र.क्र-८5/आ-5, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायद्याच्या, 2003 (COTPA) प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करणेबाबत दि. १० जुलै २०२३.
- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तंबाखू/बैठक-२०२४-प्र.क्र-६६/आ.५-, अनुसार सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण याचे विनियमन) कायदा, २००३ आणि FCTC Article ५.३ चा आढावा, प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करिता स्थापित राज्यस्तरीय समन्वय समितीच्या कार्यकक्षेचा विस्तार आणि जिल्हास्तरीय समन्वय समिती संरचना व कार्यकक्षेचा विस्तार करणेबाबत दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
- कार्यक्रम तपशील:-
अ.क्र. | सन | राज्यातील तंबाखुमुक्त आरोग्य संस्थांची संख्या | राज्यातील तंबाखु मुक्त शाळांची संख्या |
1 | 2020 – 2021 | 400 | 1,932 |
2 | 2021 – 2022 | 2434 | 5241 |
3 | 2022 – 2023 | 9672 | 32496 |
4 | 2023 – 2024 | 12094 | 38203 |
5 | एप्रिल – डिसेंबर 2024 | 12९५२ | 45127 |
तंबाखू मुक्ती केंद्रामार्फत करण्यात आलेली कार्यवाही :-
अ.क्र. | सन | राज्यातील तंबाखुमुक्त केंद्राची संख्या | नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या | पैकी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सोडलेल्यांची संख्या |
1 | 2020 – 2021 | 41 | 1,24,792 | 3,978 |
2 | 2021 – 2022 | 230 | 2,43,760 | 5,911 |
3 | 2022 – 2023 | 404 | 4,00,340 | 9304 |
4 | 2023 – 2024 | 410 | 3,96,826 | 8673 |
5 | एप्रिल – डिसेंबर 2024 | 416 | 3,14,456 | 7,197 |
कोटपा कायदा २००३ अंतर्गत कार्यवाहीचा अहवाल –
(तपशील – राज्यातील आरोग्य संस्था, जिल्हयातील अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग)
अ.क्र. | वर्ग | तपशील | कलम ४ | कलम ५ | कलम ६ (अ) | कलम ६ (ब) | कलम ७ |
1 | 2020 – 2021 | 90,67,325 | 50,700 | 2,52,934 | 4,48,767 | 2,55,93,021 | 3,54,12,747 |
2 | 2021 – 2022 | 1,14,45,148 | 55,434 | 7,07,135 | 5,16,174 | 3,68,62,911 | 5,38,27,443 |
3 | 2022 – 2023 | 73,79,879 | 3,09,712 | 6,66,898 | 50,48,149 | 1,32,74,479 | 2,66,79,117 |
4 | 2023 – 2024 | 49,62,884 | 90,316 | 10,96,504 | 21,45,575 | 5,80,950 | 88,76,229 |
५ | एप्रिल – डिसेंबर 2024 | 2434000 | ८३७०० | 665351 | 1048856 | 768794 | 5000701 |
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online