बंद

    राष्ट्रीय आरोग्य अभियान-मनुष्यबळ

    • तारीख : 15/03/2025 -

    प्रस्तावना:

    आरोग्य संस्थास्तरावरील कार्यप्रणाली सुरळीतपणे पार पडण्यासाठी मानवी संसाधन (मनुष्यबळ) अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात याचा मुख्य उद्देश म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व स्तरांवर सक्षम आरोग्य यंत्रणा निर्माण करणे व आरोग्य सेवा सुधारण्याकरिता योग्य मनुष्यबळ उपलब्ध करणे.

    उद्दिष्टे:

    • राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध आरोग्य संस्थास्‍तरावर आरोग्य संबंधी उद्दिष्टांची पूर्तता करणे. सक्षम आरोग्य यंत्रणा साध्य करण्यासाठी योग्य कौशल्यपूर्ण मानवी संसाधन (मनुष्यबळ) प्रदान करणे.
    • तांत्रिक व अतांत्रिक मनुष्‍यबळ उपलब्‍ध करुन देणे

    राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती % (भौतिक)

    • राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रात विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी मुलाखतीद्वारे (थेट मुलाखत) पदभरती केली जाते. आणि या संवर्गातील पदांव्यतिरिक्त इतर सर्व संवर्गातील पदांवर उमेदवारांची गुणांकन प्रक्रियेद्वारे नियुक्ती केली जाते.
    • NRHM,NUHM, 15th Finance, CHO ची एकूण पदभरतीची सद्यस्थिती – माहे मार्च २०२५ अखेरपर्यंत
     
    क्र बाबी भौतिक स्थिती मंजूर पदे भौतिक स्थिती भरलेली पदे भौतिक स्थिती रिक्‍त पदे भौतिक स्थिती टक्‍केवारी (भरलेल्‍या पदांची )
    1

    राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान

    38111 29731 8380 78%
    2

    राष्‍ट्रीय नागरी आरोग्‍य अभियान

    21065 11799 9266 56%
    3

    समुदाय आरोग्य अधिकारी

    9886 7397 2489 75%

    एकूण नियुक्‍ती

    69062

    48927

    20135

    71%

     

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन