बंद

    राष्‍ट्रीय आयुष अभियान

    • तारीख : 16/04/2025 -

    राष्‍ट्रीय  आयुष अभियान

     

    सन १९९५ मध्‍ये आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय, केंद्र शासन नवी दिल्‍ली यांच्‍या अधिपत्‍याखालील “भारतीय चिकित्‍सा पध्‍दती व होमिओपॅथी” हा विभाग, कार्यरत करण्‍यात आला. सन २००३ मध्‍ये त्‍या विभागाचे “आयुष” (AYUSH-Ayurved, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy) असे नामांतर करण्‍यात आले. आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिध्‍द आणि होमिओपॅथी यांचे संक्षिप्‍त रुप “आयुष” आहे.

    सार्वजनिक आरोग्‍यामध्‍ये आयुष २००५ मध्‍ये भारतात आणि सन २००८-०९ मध्‍ये महाराष्‍ट्रात राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान अंतर्गत आयुष मुख्‍य प्रवाहात आणण्‍यात आले. स्‍वतंत्र आयुष मंत्रालयाची स्‍थापना झाल्‍यानंतर सन २०१४-१५ मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यात राष्‍ट्रीय आयुष अभियान सुरु करण्‍यात आले.

    कार्यक्रमाचा उद्देशः-

    • आयुष मुख्‍य प्रवाहात आणणे व स्‍थानिक चिकित्‍सा पध्‍दतीचे राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य अभियान अंतर्गत पुनरुज्‍जीवन करणे.
    • आयुष वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणे.
    • आशा आणि आरोग्‍य सेवक/सेविका यांचा आयुष कार्यक्रमामध्‍ये सहभाग करुन घेणे.
    • आयुष चिकित्‍सा पध्‍दती बाबत जनेतत विश्‍वास निर्माण करणे (प्रसिध्‍दी).
    • आयुष चिकित्‍सा पध्‍दतीत सेवा देण्‍यात सुधारणा करणे.
    • आयुष संस्‍थांचे बळकटीकरण करणे.
    • राष्‍ट्रीय कार्यक्रमासोबतच आयुष कार्यक्रम राबविणे.
    • रुग्‍णांना त्‍यांच्‍या गरजेनुसार आवश्‍यक उपचार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी मॉडर्न मेडीसीन रुग्‍णालयात आयुष चिकित्‍सा पध्‍दती सुरु करणे.
    • प्रत्‍यक्ष अनुभव घेतलेले व तपासणी केलेले औषधांचा वापर करणे.
    • आयुष वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण देणे.
    • आयुष संस्‍थांचा वापर आरोग्‍य शिक्षण व जनतेशी संबंधित कार्यक्रमासाठी करणे.
    • जिल्‍हा रुग्‍णालय/उपजिल्‍हा रुग्‍णालय/ग्रामीण रुग्‍णालय या ठिकाणी आयुष मधील विशेष सेवा उपलब्‍ध करुन देणे. उदा. पंचकर्म, क्षारसुत्र, होमिओपॅथी, युनानी, योगा निसर्गोपचार व जेरियाट्रीक केअर

     

    राष्‍ट्रीय आयुष अभियानाची राज्‍यस्‍तरावर अंमलबजावणी

    राष्‍ट्रीय आयुष अभियान अंतर्गत मंजूर मनुष्‍यबळ-

    • राज्‍य कार्यक्रम व्‍यवस्‍थापन कक्ष (राज्‍यस्‍तर) (SPMU)

    राज्‍यस्‍तरावर आयुषसाठी केंद्र शासनाकडून प्राप्‍त निधीतून स्‍वतंत्र “राज्‍य कार्यक्रम व्‍यवस्‍थापन कक्षाची”             स्‍थापना करण्‍यात आलेली आहे. सदर कक्षामध्‍ये खालील मनुष्‍यबळ मंजूर आहे.

    • राज्‍य कार्यक्रम व्‍यवस्‍थापक-१
    • आयुष सल्‍लागार- २
    • राज्‍य वित्‍त व्‍यवस्‍थापक-१
    • लेखा व्‍यवस्‍थापक- १
    • एचआयएमएस व्‍यवस्‍थापक- १
    • डेटा एन्‍ट्री ऑपरेटर- १

     

    • जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापन कक्ष (जिल्‍हा स्‍तर) (DPMU)-

    जिल्‍हास्‍तरावर केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून आयुषसाठी एक स्वतंत्र “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष” स्थापन करण्यात आले आहे. सदर कक्षाकरिता खालील मनुष्यबळ मंजूर आहे.

    १) जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक (आयुष)- १

    २) डेटा एन्‍ट्री ऑपरेटर (आयुष)- १

     

    • जिल्‍हा आयुष कक्ष (District AYUSH Cell)

    ३4 जिल्‍हयांमध्‍ये जिल्‍हास्‍तरावर “जिल्‍हा आयुष कक्ष” स्‍थापन करण्‍यात आले आहेत. जिल्‍हा स्‍तरावर दरमहा आयुष वैद्यकीय अधिकारी यांची राष्‍ट्रीय आयुष अभियानाच्‍या प्रभावी अंमलबजावणी व केलेल्‍या कामाबाबत आढावा बैठक आयोजित करुन जिल्‍हयातील संस्‍थांमधील माहिती संकलीत केली जाते व एकत्रित राज्‍य स्‍तरावर पाठविली जाते. सदर कक्षात संगणक, प्रिंटर व फर्निचर इ. सुविधा पुरविण्‍यात आलेल्‍या आहेत. प्रत्‍येक जिल्‍हा कक्षात खालील अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

    • जिल्‍हा आयुष अधिकारी- १
    • सहाय्यक जिल्‍हा आयुष अधिकारी- १

     

    • जिल्‍हा रुग्‍णालय स्‍तर-

    राज्‍यामध्‍ये एकूण २३ जिल्‍हा रुग्‍णालयांमध्‍ये “आयुष विंग” मार्फत आयुष सेवा दिल्‍या जातात. यासाठी प्रत्‍येक जिल्‍हा रुग्‍णालयात खालीलप्रमाणे मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे.

    • आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी-पदव्‍युत्‍तर १, पदवीधर १
    • होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी- पदव्‍युत्‍तर १, पदवीधर १
    • युनानी वैद्यकीय अधिकारी- पदव्‍युत्‍तर १, पदवीधर १
    • औषध निर्माण अधिकारी- १
    • योग व निसर्गोपचार तज्ञ- १
    • मसाजिस्‍ट कम अटेन्‍डण्‍ट- १ पुरुष व १ स्‍त्री

     

    • स्‍त्री रुग्‍णालय स्‍तर-

    राज्‍यातील 8 स्‍त्री रुग्‍णालयांमध्‍ये (ठाणे, जालना, लातूर, बीड, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया)             लाभ घेणा-या स्‍त्री रुग्‍ण व गरोदर माता यांच्‍यासाठी स्‍वतंत्र आयुष सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या             आहेत. यासाठी प्रत्‍येक स्‍त्री रुग्‍णालयात खालील मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे.

    • आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी- पदव्‍युत्‍तर/पदवीधर १ (स्‍त्री)
    • योगा व निसर्गोपचार तज्ञ- १ (स्‍त्री)
    • मसाजिस्‍ट कम अटेन्‍डण्‍ट- १ (स्‍त्री)

     

    • उपजिल्‍हा/ग्रामीण रुग्‍णालय स्‍तर-

    एकूण ७७ उ‍पजिल्‍हा रुग्‍णालये व १५३ ग्रामीण रुग्‍णालये येथे लोकांच्‍या मागणीनुसार आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी यापैकी एक किंवा अधिक पध्‍दतीच्‍या तज्ञांद्वारा बाह्यरुग्‍ण व आंतररुग्‍ण सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. या रुग्‍णालयांमध्‍ये खालीलप्रमाणे मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे.

    • आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी- पदवीधर १
    • होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी- पदवीधर १
    • युनानी वैद्यकीय अधिकारी- पदवीधर १

     

    • आयुष औषधी पुरवठा- केंद्र शासनाच्‍या आयुष विभागातर्फे प्राप्‍त निधीतून राज्‍यातील उपरोक्‍त संस्‍थांना आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी औषधांचा पुरवठा करण्‍यात येतो.

     

    • अतिरिक्‍त गतीविधी- माहिती, शिक्षण, संपर्क (IEC) तसेच आरोग्‍य पर्यवेक्षण व राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमामध्‍ये आयुष वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग घेण्‍यात येतो. जिल्‍हा आयुष अधिकारी व सहाय्यक जिल्‍हा आयुष अधिकारी यांच्‍या मार्फत आरोग्‍य संस्‍थांना वेळोवेळी संनियंत्रण भेट देऊन राष्‍ट्रीय आयुष अभियानाच्‍या प्रभावी अंमलबजावणीबाबत पाहणी करण्‍यात येते व केलेल्‍या कामाचा आढावा घेण्‍यात येतो.

    तक्‍ता क्र.१ : आयुष सेवा देणा-या आरोग्‍य संस्‍था

    अ.क्र. संस्‍थेचे नांव राज्‍यातील एकुण संस्‍था २०२२-२३ २०२४-२५
    1. जिल्‍हा रुग्‍णालय ५१२ २३ २३
    2. जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय
    3. उपजिल्‍हा रुग्‍णालय ७७ ७७
    4. ग्रामीण रुग्‍णालय १५३ १५३
      एकूण रुगालये २६१ २६१
    5. आयुष आरोग्‍यवर्धिनी केंद्र ३९० २९४ ३८६
      एकुण ९०२ ५५५ ६४७

     

    तक्‍ता क्र.2 : राष्‍ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत मंजूर एकात्मिक आयुष रुग्‍णालये

    अ.क्र. जिल्‍हयाचे नांव खाटांची संख्‍या मंजूर वर्ष सद्यस्थिती
    1. अहमदनगर ३० २०१७-१८ कार्यान्वित
    2. पुणे ३० कार्यान्वित
    3. नंदुरबार ३० कार्यान्वित
    4. सिंधुदुर्ग ३०  
    5. ठाणे ५० २०२३-२४ बांधकाम प्रगतीपथावर
    6. जालना ५० बांधकाम प्रगतीपथावर
    7. धाराशिव ५० बांधकाम प्रगतीपथावर
    8. नागपूर ५० बांधकाम प्रगतीपथावर
    9. जळगांव ३० बांधकाम प्रगतीपथावर
    10. बुलडाणा ५० २०२४-२५

     

     
    11. छत्रपती संभाजी नगर ५०
    12. गोंदिया ५०
    13. गडचिरोली ३०
    14. वर्धा ३०

     

    तक्‍ता क्र. 3 : आरोग्‍य संस्‍थानिहाय आयुष मनुष्‍यबळ

    संस्‍थेचा प्रकार आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार औषध निर्माता मसाजिस्‍ट कम अटेन्‍डण्‍ट जिल्‍हा आयुष अधिकारी
    जिल्‍हा रुग्‍णालय ४२ ४६ ४५ २३ २३ ४६
    स्‍त्री रुग्‍णालय
    उपजिल्‍हा/ग्रामीण रुग्‍णालये २०० १७८ ९७
    प्राथमिक आरोग्‍य केंद्र २०
    जिल्‍हा आयुष कक्ष ३४
    एकुण २७० २२६ १४२ ३१ २३ ५४ ३४

     

     

    तक्‍ता क्र.4 : आयुष कार्यक्रमांतर्गत रुग्‍णांना बाह्यरुग्‍ण, आंतररुग्‍ण सेवा, पंचकर्म, क्षारसुत्र व इलाज-बीद-तदबीर इतर विविध प्रकारच्‍या उपलब्‍ध आरोग्‍य सेवांचा तपशील खालीलप्रमाणे

    वर्ष आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार एकुण
    सामान्‍य पंचकर्म सामान्‍य ईलाज-बीद-तदबीर
    सेवा बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण बाह्य  रुग्‍ण आंतर रुग्‍ण
    २०२०-२१ 814044 25066 40597 2917 893749 26406 446239 19960 29250 5454 51069 14922 2335795 111017
    2021-22 1061901 30467 59180 8087 1108586 24272 577588 13968 37979 6901 76308 21977 2887189 91382
    2022-23 1506572 22778 107588 5609 1564875 16048 833895 9366 66290 4424 125275 19950 4297034 79461
    2023-24 1767259 32330 119717 14020 1750767 27667 952613 17874 69435 5878 118052 23702 4777843 121471
    2024-25 2051985 28263 131400 17925 1928477 20270 1141298 12780 89446 5692 129425 12314 5534903 97244

     

    राष्‍ट्रीय  आयुष अभियाना अंतर्गत राबविण्‍यात येणारे उपक्रम

    • राष्‍ट्रीय आयुर्वेद दिवस-

    दरवर्षी धन्‍वंतरी जयंती दिवशी राष्‍ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्‍यात येतो. त्‍या अनुषंगाने आयुष संस्‍था तसेच आयुष आरोग्‍यवर्धिनी केंद्र येथे व्‍याख्‍याने/शिबीरे आयोजित करण्‍यात येतात.

    • जागतिक योग दिन-

    दरवर्षी 21 जून रोजी जिल्‍हा व राज्‍यपातळीवर जागतिक योग दिन साजरा करण्‍यात येतो. त्‍या अनुषंगाने माहे जून मध्‍ये प्रख्‍यात योग संस्‍थांमार्फत जिल्‍हयांमध्‍ये विविध व्‍याख्‍याने, शिबीरे व सामुहिक योगाभ्‍यास आयोजित करण्‍यात येतात.

    • जागतिक होमिओपॅथी दिवस-

    दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा करण्‍यात येतो. त्‍या अनुषंगाने राज्‍यातील २६१ संस्‍थांमध्‍ये होमिओपॅथी तज्ञांमार्फत व्‍याख्‍याने आयोजित करण्‍यात येतात.

    • जागतिक युनानी दिवस-

    दरवर्षी 1१ फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिवस साजरा करण्‍यात येतो. त्‍या अनुषंगाने राज्‍यातील २६१ संस्‍थांमध्‍ये युनानी तज्ञांमार्फत व्‍याख्‍याने आयोजित करण्‍यात येतात.

     

    • विशेष मोहिम-

    देश का प्रकृती परीक्षण या अभियाना अंतर्गत दिनांक २६ नोव्‍हेंबर २०२४ ते २५ डिसेंबर २०२४ या    कालावधीत राज्‍यातील सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या सर्व आरोग्‍य संस्‍थांमधील आयुर्वेदीक डॉक्‍टर्स,             वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांचेमार्फत देशातील नागरिकांचे    प्रकृती परीक्षण करण्‍यात आले.

    • सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1,17,706 नागरिक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परीक्षण करण्‍यात आले.
    • राज्यातील सर्व विभागांच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात ३८,८९,८३१ नागरिक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकृती परीक्षण करण्‍यात आले.
    • सचिव, भारतीय चिक‍ित्‍सा पध्‍दती राष्‍ट्रीय आयोग यांचे दिनांक २७ डिसेंबर २०२४ च्‍या पत्रानुसार दिनांक 26 नोव्‍हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 202४ या कालावधीत देशभरात 1,29,51,099 प्रकृती परीक्षण करण्‍यात आले. त्यापैकी महाराष्ट्र राज्याने देशात सर्वात अधिक म्‍हणजे 38,89,831 प्रकृती परीक्षण केले आहे.
    • प्रकृती परीक्षण अभियानामध्‍ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकाचे ठरले आहे.

     

     

    लाभार्थी:

    नागरीक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन