महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकिय सेवा
प्रकल्पाची ओळख
सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत, गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना सुसज्ज रुग्णवाहीकेत प्राथमिक उपचार करुन रुग्णास नजीकच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्याबाबतची ही योजना आहे. यामध्ये रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरूपाचे आजाराचे रुग्ण, बाळंतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नवजात अर्भकाशी संबंधीत आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, गंभीर आजारामध्ये हृदय रुग्ण, सर्पदंश, अपघात, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार इत्यादीचा समावेश असतो.
- सदर सेवा ही Toll Free no. ‘108’ मार्फत कुठल्याही मोबाईल/ लँडलाईन फोनद्वारे उपलब्ध करून घेता येते. तसेच ही सेवा संपुर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते.
- सेवेचे सनियंत्रण औंध उरो रुग्णालय, पुणे येथिल मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (Emergency Response Centre, ERC) मधील कर्मचा-यांमार्फत केले जाते. यामध्ये Call Takers आणि डॉक्टर्स (Consultant) यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.
- या प्रकल्पांतर्गत आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासामध्ये (Golden Hour) तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते.
- तातडीने सेवा पुरविण्यासाठी सर्व रुग्णवाहीकामध्ये अत्याधुनिक Computer technology integration, voice logger system, GIS (Geographic Information System), GPS (Geographic Position System) AVLT (Automatic Vehicle Location System) & Mobile Communication System (MCS) इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे.
- अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आलेले असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित वाहनचालकांमार्फत रुग्णवाहिकेमध्ये २४x ७ सेवा पुरविण्यात येते.
- रुग्णवाहीकांमध्ये Ambulance cot, Scoop Strecher, Bi-Phasic Defibrillator cum Cardiac Monitor with Recorder (For ALS only), Transport Ventilator (For ALS only), Pulse Oximeter (For BLS only), Suction Pump (Manual & Electronic) Oxygen delivary system] इत्यादी वैद्यकीय उपकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
- २४ तास तातडीची रुग्णालयपूर्व व रुग्णालयीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयांबरोबर समन्वय करण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्टये :
- आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तास (Golden Hour) मध्ये वैद्यकीय उपचार देणे.
- २४ तास मोफत तातडीची रुग्णालयपूर्व व रुग्णालयीन वैद्यकीय सेवा १०८ टोल फ्री नंबर वरुन देणे.
- सर्व संबंधित विभागाशी तातडीचा समन्वय साधणे.
रुग्णवाहीका संख्या :
- एकूण ९३७ रुग्णवाहिका (२३३ ALS व ७०४ BLS )
मध्यवर्ती नियंत्रण कक्ष (संपर्क कक्ष)
- मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उरो रुग्णालय, औंध पुणे येथे उभारण्यात आलेले आहे.
- आपतग्रस्तास तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे सेवा देण्यासाठी रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की GPS/GPRS व अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बसविण्यात आलेली असुन त्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास जोडण्यात आलेले आहेत.
प्रशिक्षण
- रुग्णवाहीकांमधील डॉक्टर व वाहन चालक व संपर्क कक्षातील कर्मचा-यांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
- प्रशिक्षणासाठीचे Module Algorithm शासनाच्या तज्ञांच्या मान्यतेने देण्यात आलेले आहे.
- शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आपत्कालीन वैदयकीय सेवा कार्यशाळा/परिषद (चर्चासत्र) याद्वारे आधुनिक पध्दतीच्या व नवनवीन चांगले आणि उत्तम प्रकारे आपत्कालीन परिस्थिती हातळण्याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येते.
डॉक्टर
- शैक्षणिक अर्हता : बीएएमएस/बीयुएमएस
- प्रशिक्षण : ALS(Advance Life Support) BLS (Basic Life
Support)
- प्रशिक्षण कालावधी : 18 दिवस
प्रतिक्षित वाहनचालक
- शैक्षणिक अर्हता : शासन मान्यतेनुसार वाहन चालकांचा जड
वाहनचालविण्याचा परवाना
- प्रशिक्षण : बेसिक लाईफ सपोर्ट, आपत्कालीन व्यवस्थापन,
रुग्णवाहिका चालविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण इ.
- प्रशिक्षण कालावधी : ७ दिवस
कॉल असिस्टंट
- शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखा पदवीधर
- प्रशिक्षण : कॉल हॅडलिंग
- प्रशिक्षण कालावधी : ३ दिवस
वर्तमान स्थिती:
रुग्णवाहिकांची जिल्हानिहाय तैनाती पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हानिहाय रुग्णवाहिका संख्या | |||
जिल्हा | ALS | BLS | एकूण |
अहमदनगर | ९ | ३१ | ४० |
अकोला | ४ | १२ | १६ |
अमरावती | ६ | २५ | ३१ |
औरंगाबाद | ८ | २३ | ३१ |
बीड | ५ | १४ | १९ |
भंडारा | ३ | ८ | ११ |
बुलढाणा | ५ | १८ | २३ |
चंद्रपूर | ७ | १६ | २३ |
धुळे | ४ | १४ | १८ |
गडचिरोली | २ | ८ | १० |
गोंदिया | ३ | १२ | १५ |
हिंगोली | ३ | ९ | १२ |
जळगाव | ९ | २६ | ३५ |
जालना | ४ | ११ | १५ |
कोल्हापूर | ८ | २८ | ३६ |
लातूर | ५ | १५ | २० |
मुंबई | २६ | ६५ | ९१ |
नागपूर | ९ | ३१ | ४० |
नांदेड | ६ | १९ | २५ |
नंदुरबार | ३ | ११ | १४ |
नाशिक | ११ | ३५ | ४६ |
उस्मानाबाद | ४ | ११ | १५ |
पालघर | ६ | २३ | २९ |
परभणी | ४ | ९ | १३ |
पुणे | २४ | ५८ | ८२ |
रायगड | ४ | १९ | २३ |
रत्नागिरी | ४ | १३ | १७ |
सांगली | ५ | १९ | २४ |
सातारा | ६ | २६ | ३२ |
सिंधुदुर्ग | ३ | ९ | १२ |
सोलापूर | १० | २५ | ३५ |
ठाणे | १२ | २७ | ३९ |
वर्धा | ३ | ८ | ११ |
वाशिम | ३ | ८ | ११ |
यवतमाळ | ५ | १८ | २३ |
एकूण | २३३ | ७०४ | ९३७ |
लाभार्थी:
व्यक्ती
फायदे:
आपदग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तास (Golden Hour) मध्ये वैद्यकीय उपचार देणे
अर्ज कसा करावा
२४ तास मोफत तातडीची रुग्णालयपूर्व व रुग्णालयीन वैद्यकीय सेवा १०८ टोल फ्री नंबर वरुन देणे.