बंद

    प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान(पी.एम.एस.एम.ए.)

    • तारीख : 17/04/2025 -

    प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान(पी.एम.एस.एम.ए.)

    प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्हास्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एका नोडल ऑफिसरची नेमणुक करण्यात आलेली आहे. सदर अभियानास संस्थास्तरावर प्रसिद् धी करण्यात येते.

    सदरअभियान राबविण्याकरीता शहरी व ग्रामीण भागातील खालील तक्त्यात नमुद सरकारी आरोग्य संस्था निवडुन मॅपिंग करण्यात आले आहे.

     

    ग्रामीण भाग प्रा.आ.केंद्रे, ग्रामीणरुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये.
    शहरी भाग अर्बन डिस्पेंसरीज, हेल्थपोस्ट, मॅटर्निटी होम्स व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये

     

     

    सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान खालीलप्रमाणे राबविण्यात येते

    १) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्याकरीता संस्थांस्तरावर करण्यात येणारी तयारी

    • वैद्यकिय अधिकारी/ संस्थाप्रमुख यांना अभियानासाठी लागणारी सर्व साहित्य सामुग्री देण्यात आलेली आहे.
    • वैद्यकिय अधिकारी / आरोग्य सेविका / एलएचव्ही / स्टाफनर्स/ आशा यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत.
    • अभियानाच्या दिवशी सर्व आरोग्य कर्मचारी आरोग्य संस्थेत हजर राहतात.
    • संस्थेमधील स्वच्छतागृह व इतर ठिकाणी संपूर्ण स्वच्छता असल्याची खात्री केली जाते.
    • लाभार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था केली जाते.
    • लाभार्थ्यांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करुन दिले जातात.
    • प्रसिध्दी साहीत्य संस्थेच्या दर्शनी भागावर, प्रतिक्षा कक्षात तपासणी कक्षात व प्रसुती कक्षात लावलेले असल्याची खात्री केली जाते.
    • तपासणी, समुपदेशन, प्रयोगशाळा चाचण्या व औषध वाटपासाठी वेगवेगळया खोल्या असल्याची खात्री केली जाते.
    • जर सरकारी संस्थेमध्ये खाजगी स्त्रीरोग तज्ञ विनामुल्य सेवा देत असतील तर अभियानाच्या अगोदर त्यांच्याशी संपर्कात राहणे व अशा खाजगी डॉक्टरांची प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभि्ांयान अंतर्गत निवड करुन जिल्हास्तरावर अंबलबजावणी केली जाते.
    • राज्यातील आरएमएनसीएच+ए भागीदारांची प्रसिध्दी साहित्य तयार करण्यासाठी व सपोर्टीव्ह सुपरव्हीजनसाठी मदत घेतली जाते.

     

    2) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानष् अंतर्गत खालील सेवा देण्यात येतातः

    • मोफत प्रयोग शाळा चाचण्या
    • लाभार्थीचा वैद्यकीय पुर्वइतिहास घेऊन तपासणी करुन व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीहीजोखीमनसल्याची खात्रीकरण्यात येते.
    • प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थींचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासतात.
    • शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी संदर्भीत केले जाते आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात. सर्व लाभार्थ्याला एमसीपी कार्ड देण्यात येते.
    • सर्व गरोदर मातांचे गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एक सोनोग्राफी करण्यात येते.
    • अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी,गरोदरपणातील धोक्याची लक्षणे ,बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळया व कॅल्शियमच्या गोळयांचे सेवनाचे महत्व, संस्थात्मक प्रसुती, संदर्भ सेवा, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमअंतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसुतीपश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार, संस्थात्मक प्रसुती व प्रसुतीपश्चात कुटूंबनियोजन बाबत समुपदेशन केले जाते.

     

    • प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)सहभाग :
    • शासकीय संस्था वगळता अजून एखादी खाजगी संस्था स्वेच्छेने विनामूल्य सेवा सदर अभियानाच्या दिवसाच्या दिवशी देण्यास तयार असल्यास त्यांना या अभियानामध्ये समाविष्ट करुन घेतले जाते व त्यांच्या मार्फत वर नमुद केलेल्या सेवा त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये देण्यात येतात. अभियानादरम्यान खाजगी संस्थांनी शोधलेल्या अतिजोखमीच्या मातांना शासकिय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ चिठ्ठीसहीत संदर्भित केले जाते.
    • प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत झालेले काम
    वर्ष प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत तपासण्यात आलेल्या एकूण गरोदर मातांची संख्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांपैकी पहिल्यांदा तपासणी झालेल्या गरोदर मातांची संख्या अतीजोखमीच्या आढळलेल्या गरोदर मातांची संख्या सोनोग्राफी करण्यात आलेल्या एकूण गरोदर मातांची संख्या
    June 16 to Mar 17 783815 346808 34593 108933
    2017-18 824309 389650 30805 181894
    2018-19 703588 348193 24075 222647
    2019-20 301779 147897 31573 97260
    2020-21 73290 31439 9390 25870
    2021-22 73764 34103 8296 29934
    2022-23 290911 134261 41722 97799
    2023-24 280508 120683 46344 94275
    2024-25

    (Upto Nov 24)

    199550 80442 65004 44676

     

     

     

     

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online