प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम-जननी सुरक्षा योजना
जननी सुरक्षा योजना
केंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी आणि महानगरपालीका भागात जननी सुरक्षा योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास देय आहे. सदरचा लाभ देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
योजनेचे निकष :
- जननी सुरक्षा योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास देय आहे. जननी सुरक्षा योजनेचा लाभ देण्याकरीता गर्भवती माता ही दारिद्रय रेषेखालील, अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या कुटूंबातील असणे आवश्यक आहे.
- ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या गर्भवती मातेची प्रसुती ग्रामीण अथवा शहरी भागात झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.७००/- याप्रमाणे लाभ देण्यात येतो.
- शहरी भागातील रहिवासी असणाऱ्या गर्भवती मातेची प्रसुती ग्रामीण अथवा शहरी भागात झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु. ६००/- याप्रमाणे लाभ देण्यात येतो.
- ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु. ५००/- याप्रमाणे लाभ देण्यात येतो.
- गर्भवती मातेस प्रसूती दरम्यान जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत तातडीची सिझेरीयन शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाल्यास अशा गर्भवती मातेस रु.१५००/ लाभ देण्यात येतो. सदरची रक्कम गर्भवती मातेस केलेल्या खर्चाच्या पावत्या सादर केल्यानंतर देण्यात येते.
आर्थिक मार्गदर्शक सूचना :
- हा लाभ प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थीच्या आधार कार्ड संलग्न बॅंक खात्यात जमा केला जातो.
कार्यपध्दती :
- जननी सुरक्षा योजनेस पात्र लाभार्थीच्या गरोदरपणाची नोंद झाल्यानंतर लगेचच लाभार्थीचे बॅंक खाते व आधार नंबर नसेल तर बॅंक खाते उघडण्यास व आधार कार्डसाठी आशा कार्यकर्ती व आरोग्य सेविका मदत करतात.
- जर ग्रामीण भागात आशा कार्यकर्तीने जे.एस.वाय. लाभार्थीच्या प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या पूर्ण करून घेतल्या असतील तर ‘आशा’ला रु. ३००/- व लिंक वर्करने जर शहरी भागातील रहिवासी लाभार्थीच्या सर्व प्रसूतीपूर्व तपासण्या पूर्ण करून घेतल्या असतील तर ‘लिंक वर्कर’ला रु . २००/- देण्यात येतात.
- आशा व लिंक वर्करचे जे.एस.वाय. लाभार्थीचे संस्थात्मक प्रसूतीचे मानधन हे लाभार्थीची प्रसूती फक्त शासकीय आरोग्य संस्थेत करण्यात आल्यासच व आशा/लिंक वर्करने लाभार्थीसह थांबल्यासच ग्रामीण भागात आशाला रु.300/- व शहरी भागात लिंक वर्करला रु.200/- देण्यात येतात.
- जननी सुरक्षा योजनेस पात्र लाभार्थीची प्रसूती शासकीय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यानंतर त्याची नोंद लगेचच आरसीएच पोर्टलवर घेण्यात येते. जननी सुरक्षा योजनेचा लाभ डीबीटीमार्फत देण्यात येतो.
कार्यक्रमाची सद्यस्थिती:-
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत झालेले काम:-
वर्ष | लाभार्थींची संख्या | ||
वार्षिक अपेक्षित पातळी | साध्य | ‚ | |
2019-20 | 421991 | 271471 | 64 |
2020-21 | ४७६६४१ | २५१५५५ | ५३ |
2021-22 | ४७६६४१ | 208639 | ४४ |
2022-23 | ४०९३०४ | 415424 | १०१ |
2023-24 | ४१४५३५ | 401925 | ९७ |
2024-25 माहे फेब्रुवारी २०२५ अखेर | 425674 | 348379 | 82 |
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online