बंद

    पॅलिएटिव्‍ह केअर कार्यक्रम (उपशमन/परिहार सेवा)

    • तारीख : 17/04/2025 -

    पॅलिएटिव्‍ह केअर कार्यक्रम

    (उपशमन/परिहार सेवा)

     

    दिर्घ काळापासून किंवा मोठया आजाराने त्रस्‍त रुग्‍णांचे जीवनमान सुधारण्‍यासाठी, तसेच कुटुंबियांचे त्रास कमी करण्‍यासाठी घेतलेली काळजी म्‍हणजे पॅलिएटिव्‍ह केअर. दिर्घ काळ असणारे व शारिरीक अपंगत्‍व आणणा-या व्‍याधी त्रासदायक असतात. शारिरीक समस्‍यांसोबतच सामाजिक, भावनिक, आर्थिक आणि अध्‍यात्मिक त्रासांना सुध्‍दा सामोरे जावे लागते. पॅलिएटिव्‍ह केअर हे वैद्यकीय शास्‍त्रातील असे क्षेत्र आहे जे दुर्धर आजारावर इलाज करीत नसून, या रुग्‍णांचे जीवनमान सुधारण्‍याचा प्रयत्‍न करते. वेदना व इतर लक्षणापासून आराम पुरविण्‍याबरोबरच यामध्‍ये मानसिक वेदनांपासून मुक्‍ती देण्‍यासाठी प्रयत्‍न केला जातो. दिवसेंदिवस दुर्धर आजारांच्‍या रुग्‍ण संख्‍येमध्‍ये वाढ होत आहे.    UNICEF INDIA नुसार भारतामध्‍ये पॅलिएटिव्‍ह केअरची आवश्‍यकता असलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या अंदाजे १ कोटी आहे. महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये सन २०१२ मध्‍ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. सन २०१३-१४ मध्‍ये अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, वर्धा व वाशिम आणि सन २०१४-१५ सातारा व नंदुरबार या जिल्‍हयांमध्‍ये कार्यक्रम राबविण्‍यास सुरुवात केली आहे. सन २०१८-१९ च्‍या मंजुर पीआयपीमध्‍ये आणखी ९ जिल्‍हयांचा या कार्यक्रमात समावेश करण्‍यात आला आहे. (सिंधुदूर्ग, पुणे,नाशिक, परभणी, जालना, पालघर, रत्‍नागिरी, नांदेड आणि उस्‍मानाबाद). सन २०२१-२२ च्‍या अंमलबजावणी कृती आराखडयामध्‍ये नागपूर, औरंगाबाद, जळगांव, लातूर, बीड, हिंगोली, ठाणे व अहमदनगर या ८ जिल्‍हयांचा समावेश करण्‍यात आला. सन २०२२-२३ च्‍या प्रकल्‍प अंमलबजावणी कृती आराखडयामध्‍ये अकोला, बुलढाणा, यवतमाळ, कोल्‍हापुर, सांगली, रायगड, गोंदिया, धुळे, सोलापुर, या ९ जिल्‍हयांचा समावेश करण्‍यात आला आहे. पॅलिएटिव्‍ह केअर कार्यक्रमामध्‍ये मुख्‍यतः आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍यात व कधीच बरे न होणा-या रुग्‍णांचा समावेश होतो.

    या रुग्‍णांना उपचारात्‍मक चिकित्‍सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्‍साच उपयुक्‍त असते. पॅलिएटिव्‍ह केअर कॅन्‍सर, पक्षाघात, HIV/AIDS औषधींने न बरे होणारे क्षयरोग, मतिमंद मुले, वृध्‍दपकाळाने अपंगत्‍व आलेले किडनी विकार, लिव्‍हर विकारग्रस्‍त इ. रुग्‍णांना दिली जाते. राज्‍यामध्‍ये सदर कार्यक्रमांतर्गत राज्‍य स्‍तरावर स्‍टेट पॅलिएटिव्‍ह केअर सेल कार्यान्वित करण्‍यात आलेला आहे.

    तसेच १७ जिल्‍हयांमध्‍ये जिल्‍हा स्‍तरावर पॅलिएटिव्‍ह केअर क्लिनिक जिल्‍हा रुग्‍णालयामध्‍ये सुरु करण्‍यात आलेले आहेत. त्‍यापैकी ८ जिल्‍हयांत आवश्‍यक प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकारी १ व ४ नर्सेस व १ मल्‍टी टास्‍क वर्करची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये NCD कार्यक्रमांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आठवडयातील निश्चित केलेल्‍या २ दिवशीय जिल्‍हा रुग्‍णालयातील बाहय रुग्‍ण विभागात रुग्‍णांची तपासणी करणे तसेच आंतरुग्‍णांना सेवा देणे व उर्वरीत निवडलेल्‍या तालुक्‍यातील रुग्‍णांना गृहभेटी मार्फत सेवा देणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

    राज्‍यातील पॅलिएटिव्‍ह कार्यक्रमांतर्गत समाविष्‍ठ जिल्‍हयांतील जिल्‍हा रुग्‍णालयामध्‍ये रुग्‍णांसाठी १० खाटा राखीव ठेवून त्‍यासाठी लागणा-या खर्चाची तरतुद करण्‍यात आलेली आहे.

     

     

    पॅलिएटिव्‍ह केअर प्रकल्‍पाची उदिदृष्‍टे –

    • जिल्‍हा रुग्‍णालय/उपजिल्‍हा रुग्‍णालय तथा प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावर पॅलिएटिव्‍ह केअरचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी व परिचारीकांना देऊन एकात्‍मिक आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करुन देणे.
    • दीर्घ व गंभीर आजाराचे रुग्‍ण ASHA/ANM व क्षेत्रीय कर्मचा-यांच्‍या मदतीने शोधून आरोग्‍य सेवा देणे. अशा रुग्‍णांना व त्‍यांच्‍या नातेवाईकांना योग्‍य सल्‍ला व मार्गदर्शन करणे.
    • पॅलिएटिव्‍ह केअर कार्यक्रमांतर्गत आवश्‍यक असणारी औषधे जिल्‍हा / उपजिल्‍हा स्‍तरावर उपलब्‍ध करुन देणे.
    • कार्यक्रमाबद्दल जनसामान्‍यांमध्‍ये जनजागृती करणे.

     

    पॅलिएटिव्‍ह केअर कार्यक्रमांतर्गत जिल्‍हे

     

    अ.क्र. सन २०१३-१४ मध्‍ये मंजुरी मिळालेली जिल्‍हे अ.क्र. सन २०१८-१९ मध्‍ये मंजुरी मिळालेली जिल्‍हे अ.क्र. सन २०२० २१  मध्‍ये मंजुरी मिळालेली जिल्‍हे अ.क्र. सन २०2223 मध्‍ये मंजुरी मिळालेली जिल्‍हे
    नाशिक १० पुणे १८ नागपुर २६ अकोला
    पालघर ११ उस्‍मानाबाद १९ औरंगाबाद २७ बुलढाणा
    अमरावती १२ परभणी २० ठाणे २८ यवतमाळ
    भंडारा १३ सिंधुदूर्ग २१ अहमदनगर २९ कोल्‍हापुर
    चंद्रपुर १४ नांदेड २२ लातुर ३० सांगली
    गडचिरोली १५ जालना २३ जळगांव ३१ रायगड
    वर्धा १६ रत्‍नागिरी २४ बीड ३२ गोंदिया
    वाशिम १७ नंदुरबार २५ हिंगोली ३३ धुळे
    सातारा         ३४ सोलापुर

     

    २०१३-१४ पासून गाव पातळीवर तथा शहरी भागात आशा मार्फत रुग्‍णांना दुःखशामक सेवा देण्‍यात येत आहेत आणि रुग्‍णांच्‍या आजाराबाबतचा पाठपुरावा करत आहे. मेडिकल स्‍टाफची कार्यक्षमता वाढवण्‍यात राज्‍यस्‍तरावरुन प्रशिक्षण देण्‍यात येत आहे.

    मनुष्‍यबळ –

    • एक वैद्यकीय अधिकारी
    • एक सामाजिक कार्यकर्ता / मल्‍टी टास्‍क वर्कर
    • अधिपरीचारीका
    • आशा

    पुरविण्‍यात येणाया सुविधा –

    • OPD/IPD आणि Home Visit
    • समुपदेशन
    • मोर्फीन आणि इतर औषधांचा पुरवठा
    • आशासाठी ड्रेसिंग कीट

    पुढील वाटचाल –

    • वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, मल्टिटास्क वर्कर व आशा यांना प्रशिक्षित करणे.
    NPPC- मनुष्‍यबळ माहीती
    अनु क्र जिल्‍हा मेडिकल ऑफीसर/फीजिशियन नर्स /GNM मल्‍टी टास्‍क वर्कर /सोशल वर्कर
    मंजूर रिक्‍त भरलेले मंजूर रिक्‍त भरलेले मंजूर रिक्‍त भरलेले
    एकूण ३४ १० २४ ८६ ४२ ४० ३४ २६

     

    भौतिक अहवाल –

    अनु.क्र. Health Professionals Total no. in the
    district (Dec. 2024)
    Total no. of new patients seen in the OPD 56186
    Total No of patients admitted in IPD 19081
    Total no. of follow – up cases seen in the OPD 258.58
    Total no of new patients seen in the home based care 3722
    Total no of follow-up cases seen in the home based care 14612

     

    NPPC आर्थिक माहिती

     

    Sr. No Year PIP (Rs. In Lakhs) Expenditure %
    2022 – 23 63.47 12.31 19.39
    2023 – 24 62.02 २९.१७        ४७.०४
    २०२४- २५ 33.65 7.26 21.57

     

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online