बंद

    टेलिमेडिसिन

    • तारीख : 13/03/2025 -

    टेलिमेडिसीन

    • प्रस्‍तावना –

    राज्‍यातील ग्रामीण व आदिवासी जनतेसाठी विशेषज्ञमार्फत वैद्यकीय सेवा देण्‍यासाठी टेलिमेडिसीन ही वैद्यकीय क्षेञात झपाटयाने विकसित होत असलेली यंञणा आहे. विशेषत: यामध्‍ये टेलिफोन,इंटरनेट किंवा इतर संपर्काव्‍दारे वैद्यकीय आदान प्रदान करणे शक्‍य होते. वैद्यकीय सल्‍लयासाठी आणि कधी कधी दुर्गम भागातील आजारी रूग्‍णांचे निदान करण्‍यासाठी या सुविधेचा उपयोग होतो.

    • कार्यक्रमांतर्गत महत्‍वपूर्ण योजना व झालेले कार्य –

    • टेलिमेडिसीन सुविधव्‍दारे ग्रामीण भागातील रूग्‍णांना तज्ञ सल्‍ला देता येतो.
    • व्हिडिओ कॉन्‍स्‍फरसिंगव्‍दारे तज्ञ सल्‍ला उपलब्‍ध करून दिला जातो.
    • वैद्यकीय अधिकारी,परिचारिका,तज्ञ व इत्‍यादीचे वैद्यकीय ज्ञान अद्यावत करण्‍यासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण (सी.एम.ई) आयोजित करता येतात.
    • महाराष्‍ट्रातील टेलिमेडिसीन –

      • टेलिमेडिसीन सेवा महाराष्ट्रात सन २००७-०८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत २४ जिल्हा रुग्णालये, ३७ उपजिल्हा रुग्णालये आणि १३ ग्रामीण रुग्णालय येथे टेलिमेडिसीन सेवा सुरू करण्यात आली आहे. वरील सर्व टेलिमेडिसीन विभाग ६ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये यांच्याशी इंटरनेट सेवा आणि इतर तांत्रिक उपकरणांच्या च्या माध्यमातून जोडण्यात आले आहे.
      • आयुष्मान भारत योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर-उपकेंद्र,प्राथमिक आरोग्य केंद्र,शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर येथे टेलिकन्सलटेशन सेवा हब आणि स्पोक च्या माध्यमातून सुरू करण्यात आली.
      • राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हब तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत २९ जिल्ह्यांमध्ये हब तयार करण्यात आले आहे. जेथे ५ एमबीबीएस आणि ३ विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ,बालरोग तज्ञ आणि भिषक) इत्यादि उपलब्ध असणार आहेत. तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्य विषयक सल्ला हबमधील उपस्थित वैद्यकीय अधिकारी देणार आहेत.
      • केंद्र शासनाने टेलिकन्सलटेशनद्वारे रुग्ण तपासणी करण्यासाठी इ-संजीवनी अॅप्लिकेशन ची निवड केली असून सदर अॅप्लिकेशन सीडॅक मोहाली यांनी तयार केले आहे.
      • आतापर्यंत ८405 उपकेंद्र, 1894 प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि ७42 शहरी भागातील प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि ८२९ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर येथे टेलिकन्‍सलटेशन सेवा सुरू करण्‍यात आली आहे.

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    आयुष्मान आरोग्य मंदिर येथून होणारी रुग्ण तपासणी वर्षनिहाय भौतिक प्रगती

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्‍य सेवा

    राज्‍यात इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन मोफत आरोग्‍य सेवा माहे एप्रिल,२०२० मध्‍ये सुरू करण्‍यात आली आहे. या सेवेव्‍दारे रूग्‍णांना व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंगचा आणि चॅटचा वापर  करून थेट घर बसल्‍या वैद्यकीय अधिका-यांशी आजारांबाबत सल्‍लामसलत करता येते. सदर सेवेमार्फत रूग्‍ण सर्व आजारांबाबत वैद्यकीय अधिका-यांशी संवाद साधू शकतात. तसेच कोविड १९ साथीच्‍या आजाराने ग्रस्‍त असलेले रूग्‍ण जे घरून उपचार घेत आहेत किंवा विलगीकरणात असलेले रूग्‍ण या सेवेचा लाभ घेऊ शकतात. इ-संजीवनी ओपीडी कार्यक्रमाव्‍दारे सामान्‍य ओपीडी,तज्ञ/विशेषज्ञ ओपीडी (अस्‍थीरोग,नेत्ररोग,मानसोपचार,त्‍वचारोग,स्‍ञीरोग,बालरोग,दंतरोग,नाक,कान,घसा,सामान्‍य चिकित्‍सा,सामान्‍य शस्‍ञक्रिया,मेंदू विकार) आयुष ओपीडी (आयुर्वेद,होमीओपॅथी,युनानी ओपीडी) सुरू करण्‍यात आली आहे. राज्‍यातील सर्व जिल्‍हा रूग्‍णालये, उपजिल्‍हा रूग्‍णालये,ग्रामीण रूग्‍णालये,स्‍पेशालिस्‍ट रूग्‍णालये येथील सर्व वैद्यकीय अधिका-यांची नोंदणी इ-संजीवनी ओपीडी अॅप्‍लीकेशनमध्‍ये करण्‍यात आली असून,दिवस ठरवून दिल्‍याप्रमाणे सर्व (शासकीय/कंञाटी) वैद्यकीय अधिकारी इ-संजीवनी  ओपीडी मार्फत रूग्‍णांना त्‍यांच्‍या आजारावर सल्‍लामसलत करून त्‍यांना ई-प्रिस्क्रिपशन देतात. रूग्‍णांना  ई-प्रिस्क्रिपशनची लिंक मॅसेज स्‍वरूपात प्राप्‍त होत असून सदर लिंकव्‍दारे ई-प्रिस्क्रिपशन डाऊनलोड करता येते.

    • इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन सेवेचा वापर करण्‍याची प्रक्रिया –
    • इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन टेलिमेडिसीन सेवेचा लाभ घेण्‍यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in/#या संकेतस्‍थळाचा वापर करून  वैद्यकीय अधिका-यांशी सल्‍लामसलत करू शकतात.
    • Android मोबाइल धारक play store मध्‍ये जाऊन इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन अॅप मोफत डाऊनलोड करून वैद्यकीय अधिका-यांशी सल्‍लामसलत करू शकतात.
    • इ-संजीवनी ओपीडी ऑनलाइन वेळ –
    • सोमवार ते रविवार,सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आणि दुपारी १:४५ ते संध्‍याकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.

     

     

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    टेलिमेडिसीन विभागाद्वारे रुग्ण तपासणी

    लाभार्थी:

    नागरीक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन