बंद

    आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्र (टोल-फ्री १०४)

    • तारीख : 08/04/2025 -

    179: आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्र (टोलफ्री १०४)

    प्रस्‍तावना :

    • सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत कार्यरत आरोग्‍य सेवा पुरवठादार (जसे आशा, एएनएम, वैदयकीय अधिकारी व इतर आरोग्‍य कर्मचारी) यांना राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत राबविण्‍यात येणा-या विविध आरोग्‍य कार्यक्रमाविषयी तसेच सेवा देताना काही अडचण असल्‍यास वैदयकीय तज्ञांच्‍या सल्‍ल्‍याची आवश्‍यकता भासते.त्‍यावेळी आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्र (टोल फ्री क्र.१०४)  येथे संपर्क करून वैद्यकिय तज्ञांचा सल्‍ला घेतात.
    • वैदयकीय तज्ञांची सेवा वेळेत प्राप्‍त झाल्‍यास रुग्‍णांस स्‍थानिक पातळीवर सेवा पुरवुन संदर्भित करण्‍याचे टाळता येते.
    • तसेच स्‍थानिक पातळीवर वैदयकीय सेवा व सुविधांबाबत काही तक्रारी असल्‍यास त्‍याची नोंद होवुन तक्रार निवारण करुन रुग्‍णाभिमुख सेवा प्रदान करणे शक्‍य होते.
    • याचप्रमाणे मानसिक आरोग्‍याकरिता तसेच किशोरवयीन मुलांमुलींकरिता समुपदेशनाकरीता सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. तसेच वेळीअवेळी रुग्‍णांस रक्‍ताची आवश्‍यकता भासल्‍यास रक्‍त उपलब्‍ध होण्‍याकरीता रक्‍तपेढींशी संपर्क साधुन उपलब्‍धता कळविण्‍यात येते.
    • वरील संदर्भात वैदयकीय सेवापुरवठादारास २४x७ आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती व वैदयकिय तज्ञांचा सल्‍ला उपलब्‍ध व्‍हावा, जेणेकरुन आजारावर योग्‍य पध्‍दतीने उपचार करता येणे शक्‍य होईल. या दृष्‍टीने राज्‍यात २9 आसनांचे आरोग्‍य सल्‍ला संप‍र्क केंद्र (टोल फ्री क्रमांक १०४) सन २०११-१२ पासून उरो रुग्‍णालय, पुणे येथे कार्यान्वित करण्‍यात आलेले आहे.

    उदिष्‍टे :

    • आरोग्‍य सेवा पुरवठादारांकडुन (आशा, एएनएम, वैदयकीय अधिकारी व इतर आरोग्‍य कर्मचारी) रुग्‍णाभिमुख प्रभावी व परिपूर्ण आरोग्‍य सेवा पुरवण्‍याकरीता पुर्णवेळ (२४ X ७) मार्गदर्शन व सल्‍ला उपलब्‍ध करुन देणे.
    • राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैदयकिय अधिकारी व कर्मचारी यांना शालेय विद्याथ्‍र्यांची तपासणी व प्रभावी उपचारासाठी २४x७ वैदयकिय सल्‍ला व मार्गदर्शन उपलब्‍ध करणे.
    • राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमाच्‍या (राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य व राष्‍ट्रीय नागरी आरोग्‍य) प्रभावी अंमलबजावणीसाठी SPMU, DPMU, BPMU व CPMU स्‍तरावर कार्यरत आरोग्‍य कर्मचा-यांना २४X७ मार्गदर्शन करणे.
    • वैदयकिय सेवा देणा-या व्‍यक्‍तीला किरकोळ आजारावरही उपचारासाठी सल्‍ला उपलब्‍ध करून देणे.
    • स्‍त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशियन, शल्‍यविशारद व सार्वजनिक आरोग्‍य विशेषतज्ञ यांचे २४X७ मार्गदर्शन उपलब्‍ध करुन देणे.
    • रुग्‍णांना रक्‍ताचा पुरवठा वेळेवर व्‍हावा याकरीता “जीवन अमृत सेवा” कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
    • शासकिय रुग्‍णालये, नेत्रपेढी व रक्‍तपेढी यांची माहिती उपलब्‍ध करुन देणे.
    • मानसिक आरोग्‍याकरिता सेवापुरवठादारांस तसेच रुग्‍णांस संपर्क केंद्रामार्फत समुपदेशन देणे.
    • रुग्‍णांना आरोग्‍य संस्‍थेतुन मोफत औषधी न देता खरेदी करण्‍यास सुचविल्‍यास तक्रारीची नोंद करणे. (Free Medicine Supply and Complaint regarding outside prescription of medicines.)
    • जनतेच्‍या आरोग्‍य संस्‍थेबाबत किंवा पुरविल्‍या जाणा-या सेवेबाबत तक्रारीची नोंद करणे व ती सोडविण्‍यासाठी संबंधीत विभागाकडे पाठपुरावा करणे. (Public Grievance Redressal)
    • आरोग्‍य सेवापुरवठादार यांना दैनंदिन आरोग्‍य सेवा उपलब्‍ध करुन देताना येणा-या अडचणींची नोंद करणे व ती सोडविण्‍यासाठी पाठपुरावा करणे. (Frontline Health worker Grievance Redressal)

    संरचना :

    आरोग्‍य सल्‍ला व संपर्क केंद्र अंतर्गत 9 आसनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्‍यात आलेले आहे.

    1) १० आसने- ECD  बद्दलची सेवा, सल्‍ला व मार्गदर्शन उपलब्‍ध करण्‍याकरीता.
    2) 0२ आसने – मानसिक आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत सल्‍ला व समुपदेशन करण्‍याकरीता.
    3) 17 आसने- इतर सर्व -आरोग्‍य सेवापुरवठादार व सामान्‍य जनतेच्‍या तक्रारींची नोंद करुन पाठपुरावा करण्‍याकरिता (GR), राष्‍ट्रीय किशोर स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमविषयक (RKSK) माहिती, सल्‍ला व समुपदेशन करण्‍याकरिता.

    कार्यपदधती :

    • कॉल कोण करु शकतेसार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत सेवा देणारे वैदयकिय अधिकारी, आरोग्‍य कर्मचारी, आशा, प्रा.आ केंद्राचे वैदयकिय अधिकारी, राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमाचे वैदयकिय अधिकारी व कर्मचारी, मोबाईल मेडीकल युनिटचे वैदयकिय अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्‍य सहायक (HA), बहूउददेशिय आरोग्‍य कर्मचारी CHO, MPW, ANM, LHV आणि नियमित तसेच कंत्राटी कर्मचारी व वैदयकिय अधिकारी.
    • सामान्‍य जनता – आरोग्‍य संस्‍थेबाबत किंवा दिल्‍या जाणा-या सेवेबाबत तक्रारीची नोंद, मोफत औषधे न दिल्‍यास तसेच मानसिक समुपदेशनाकरीता १०४ वर कॉल करु शकते.
    • राज्‍यातील प्रा.आ.केंद्राचे वैदयकिय अधिकारी, आरोग्‍य कर्मचारी, राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम व फिरते आरोग्‍य पथकातील वैदयकिय अधिकारी, कर्मचारी केव्‍हाही या केंद्राशी टोल फ्री क्र. १०४ वर कोणत्‍याही दुरध्‍वनी किंवा मोबाईलव्‍दारे संपर्क करुन आरोग्‍य कार्यक्रम, वैदयकिय सल्‍ला तसेच तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्‍त करुन घेवू शकतात.
    • आरोग्‍य सल्‍ला कॉल करणा-याच्‍या विनंती प्रमाणे मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत दिला जातो.

    कार्याची विभागणी :

    • उपसंचालक (आरोग्‍य सेवा), जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी तसेच परिमंडळ स्‍तरावरील कार्यरत पीपीपी समन्‍वयक आणि जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्थापक यांना प्रत्‍येक दिवशी त्‍यांच्‍या जिल्‍हयातुन संपर्क केंद्रास प्राप्‍त झालेल्‍या कॉल्‍सची व तक्रारींची माहिती ई-मेलद्वारे देण्‍यात येते.
    • सदर माहितीच्‍या आधारे मासिक आढावा घेण्‍यात येऊन सेवेचा लाभ न घेण्‍या-या आशा, ए. एन. एम., वैद्यकीय अधिकारी, एम. पी. डब्‍ल्‍यु. आणि इतर आरोग्‍य अधिकारी व कर्मचारी यांच्‍याकडे पाठपुरावा करण्‍यात यावा.

     

    लाभार्थी:

    व्यक्ती

    फायदे:

    आरोग्‍य सेवा पुरवठादारांकडुन (आशा, एएनएम, वैदयकीय अधिकारी व इतर आरोग्‍य कर्मचारी) रुग्‍णाभिमुख प्रभावी व परिपूर्ण आरोग्‍य सेवा पुरवण्‍याकरीता पुर्णवेळ (२४ X ७) मार्गदर्शन व सल्‍ला उपलब्‍ध करुन देणे.

    अर्ज कसा करावा

    आरोग्‍य सल्‍ला संपर्क केंद्र (टोल-फ्री १०४)