“आयुष्यमान आरोग्य मंदिर – आरोग्यं परंम धनम” अंतर्गत देण्यात येणार्या सेवा
“आयुष्यमान आरोग्य मंदिर – आरोग्यं परंम धनम”
प्रस्तावना व उदे्दश –
- आयुष्मान आरोग्य मंदिर हे आरोग्य सेवेकडे निवडक दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक, पुनर्वसन आणि उपशामक काळजी अशा सर्व समावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्याचा एक प्रयत्न आहे.
- भारत सरकार मार्फत आरोग्य सेवासंबधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयुष्मान भारत योजने अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यक्रम सुरु केला आहे.
- सामान्य जनतेला त्यांच्या नजीकच्या ठिकाणी दर्जेदार आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे, आरोग्यावर होणारा खर्च कमी करणे व समाजाला illness to wellness कडे घेवून जाणे हा मुख्य उद्देश आहे.
- महाराष्ट्र राज्यातील कार्यान्वित उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्रांचे रुपांतर टप्प्या टप्प्याने आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये करण्यात येत आहे.
ब) आयुष्मान आरोग्य मंदिर मध्ये दिल्या जाणा-या आरोग्य सेवा.
- नवजात अर्भक व नवजात बालकांना दिला जाणा-या सेवा
- बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा
- कुटुंब नियोजन, गर्भ निरोधक व आवश्यक आरोग्य सेवा
- सामान्य रोगांची बाहय रुग्ण सेवा
- संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
- असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी
- मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी
- नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा
- दंत व मुखरोग आरोग्य सेवा
- वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार
- प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा
- आयुष व योग
- टेलिकन्सल्टेशन सुविधा
लाभार्थी:
नागरीक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन