बंद

    उपसंचालक, आरोग्‍य सेवा (परिवहन), पुणे

    • तारीख : 16/04/2025 -

    उपसंचालक, आरोग्‍य सेवा (परिवहन), पुणे

    १) प्रस्‍तावना

    संपुर्ण राज्‍यातील जनतेला आरोग्‍य सेवा, रुग्‍णसेवा, वैदयकीय सेवा पुरविण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागातंर्गत राज्‍यभरात विविध रुग्‍णालये, आरोग्‍य संस्‍था कार्यरत आहेत.

    विविध रुग्‍णालये, आरोग्‍य संस्‍था यांना रुग्‍णांच्‍या सेवेसाठी, वैदयकीय मदतीसाठी रुग्‍णवाहीका आवश्‍यक असतात. तसेच अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी यांच्‍यासाठी कार, जीप, मिनीबस, इत्‍यादी वाहनांची आवश्‍यकता असते. राज्‍यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागातील रुग्‍णांना, जनतेला वैदयकीय मदत पुरविण्‍यासाठी, वैदयकीय अधिकारी यांना कार्यक्षेञात विविध योजना प्रभावीपणे राबविण्‍यासाठीही वाहनांची आवश्‍यकता असते. तसेच औषधे वाटपासाठी लसवाहतुक वाहने, ट्रक यांची आवश्‍यकता असते. विविध कार्यक्रम प्रमुखांना आरोगय विषयक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्‍यासाठी, कार्यक्रमाचा आढावा घेण्‍यासाठी कार्यक्षेञात प्रवास करण्‍यासाठी कार, जीप प्रकारच्‍या पर्यवेक्षकीय वाहनांची अत्‍यंत आवश्‍यकता असते. रुग्‍णवाहीका /वाहने, तसेच विविध प्रकारची रुग्‍णालयीन उपकरणे, शीतसाखळी उपकरणे आरोग्‍य सेवेसाठी अत्‍यंत आवश्‍यक असुन हे सर्व आरोगय सेवेचे एक अविभाज्‍य अंग आहे.

    रुग्‍णवाहीका/ वाहने सुस्थितीत राहुन आरोगय सेवेसाठी, रुग्‍णसेवेसाठी वापरात यावीत, रुग्‍णांना वैदयकीय मदत तातडीने मिळावी, यासाठी उपलब्‍ध रुग्‍णवाहीका/ वाहनांची देखभाल व दुरुस्‍ती त्‍या त्‍या स्‍तरावर व्‍हावी यासाठी शासनाची एक परिवहन यंञणा असावी या प्रमुख उद्देशाने, आरोगय सेवा (परिवहन) विभागाची सन १९६२ मध्‍ये निर्मिती करण्‍यात आलेली आहे.

    विविध आरोग्‍य संस्‍थामधील उपलब्‍ध रुग्‍णालयीन उपकरणे, यंञे, सयंञे, शीतसाखळी उपकरणे यांची देखभाल व दुरुस्‍ती वेळीच होण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍य आरोग्‍य परिवहन कार्यालयातंर्गत आरोग्‍य साधन सामुग्री देखभाल व दुरुस्‍ती कार्यशाळेची स्‍थापना सन १९७२ मध्‍ये झाली.

    २) उद्देश व उद्दीष्टये –

    १. वाहनांची व शितसाखळी उपकरणांची नियतकालिक देखभाल व दुरुस्ती वेळच्यावेळी करुन ते      सुस्थितीत ठेवणे. जास्तीत जास्त वाहने व रुग्णालयीन उपकरणे नेहमी सुस्थितीत राहून आरोग्य      सेवेसाठी पुर्ण क्षमतेने वापरात येतील या दृष्टिने नियोजन करणे.

    २. शासन आदेशानूसार नवीन वाहने, रुग्णवाहिका यांचे वाटप संबंधित आरोग्य संस्थांना करणे.

    ३. शासन निर्णयान्वये विहीत अटी व शर्ती आणि मार्गदर्शक सूचनांनूसार वाहने, रुग्णालयीन उपकरणे      तसेच इतर निरुपयोगी साहित्यांचे निर्लेखन करणेबाबत आरोग्य संस्था प्रमुख आणि परिवहन       विभागाचे कार्यशाळा प्रमुख यांना मार्गदर्शन करणे. सदर कामकाजाचा पाठपुरावा आणि संनियत्रण         करणे.

    ४.  निरुपयोगी, विनावापर आणि निर्लेखित वाहने, सुटे भाग, साहित्य व उपकरणे यांचे शासकीय      लिलावदारामार्फत जाहीर लिलाव आयोजित करुन विक्री करणे. प्राप्त महसूल शासनास जमा करणे.

    ५. युनिसेफ आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यात कार्यरत असलेल्या      तंत्रज्ञांकरिता विविध उपकरणांबाबत प्रशिक्षण आयोजित करणे.

    ३) अंमलबजावणी पध्दती –

    १. सार्वजनिक आरोग्य विभागातील वाहनांची देखभाल व दुरुस्ती, निर्लेखन, वाहन अपघात ग्रस्त प्रकरणे, नवीन वाहन खरेदी व वाटप इत्‍यादी वाहन अनुषंगिक कामकाज आणि शितसाखळी उपकरणे          देखभाल व दुरुस्ती आणि त्यांचे प्रशिक्षण इत्यादी प्रमुख कामकाज आरोग्य सेवा, परिवहन         विभागाकडून करण्यात येते.

    २. सदर कामकाजासाठी आरोग्य सेवा, परिवहन विभागाची प्रत्येक जिल्हास्तरावर एक जिल्हा कार्यशाळा      असते. सदर कार्यशाळेत जिल्हयातील वाहनांची छोटी व मध्यम स्वरुपाची दुरुस्तीची कामे आणि          इतर वाहन अनुषंगिक कामकाज केले जाते.

    ३. जिल्हयातील शितसाखळी उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा      परिषद यांचेकडे एक तंत्रज्ञ कार्यरत असतो.

    ४. प्रत्येक मंडळस्तरावर आरोग्य सेवा, परिवहन विभागांतर्गत एक विभागीय कार्यशाळा कार्यरत असते.      यामध्ये मंडळातील वाहनांची मध्यम व मोठी दुरुस्तीची कामे आणि वाहन अनुषंगिक इतर कामकाज       केले जाते.

    ५. मंडळातील आरोग्य संस्थांकडील शितसाखळी उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मंडळ    उपसंचालक, आरोग्य सेवा, प्रभारी मंडळ यांचे कार्यालयात जीव वैद्यकीय अभियंता आणि इतर    तांत्रिक कर्मचारी      असतात.

    ६. सदर कार्यशाळांच्या कामकाजाचे नियंत्रण आणि त्यातील तांत्रिक व लिपीक संवर्गातील कर्मचा-यांचे      प्रशासनिक व लेखा विषयक कामकाज करण्यसाठी आरोग्य सेवा, परिवहन विभागाचे मुख्यालय, पुणे     येथे आहे. सदर कार्यालयातून आरोग्य   सेवा संचालनालय, मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सोसायटी, मुंबई यांना नवीन वाहन खरेदी,            निर्लेखन व इतर वाहन विषयक तांत्रिक बाबींसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करणे, त्याचे निर्देशानुसार        कामकाज करणे इ.कामेही केली जातात.

     

    ४) मनुष्यबळ –        

    • उपसंचालक आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या अधिनस्त २ सहाय्यक संचालक , विभागीय स्तरावर विभागीय कार्यशाळामध्ये ०८ सेवा व्यवस्थापक तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा कार्यशाळेमध्ये ३५ सेवा अभियंता कार्यरत आहेत.
    • आरोग्य साधन सामुग्री देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत विभागीय स्तरावर ०८ जैव वैदयकीय अभियंता तसेच जिल्हा स्तरावर प्रत्येकी ०१ तंत्रज्ञ कार्यरत आहेत.
    • राज्यात ५३९ तांत्रिक पदे मंजूर असुन त्यापैकी ४२१ पदे भरलेली आहेत.
    • तसेच ३२ बिगरतांत्रिक पदे मंजूर असुन त्यापैकी २४ पदे भरलेली आहेत.

     ५) कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम –

    • उददेश्य व उद्दीष्टये : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील विविध स्तरावर कार्यरत विविध आराग्ये संस्थांकडील वाहने, शितसाखळी उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामकाज आरोग्य सेवा,परिवहन विभागाकडून केले जाते. सदर वाहने व उपकरणे सुस्थितीत राहुन आरोग्य कार्यक्रमांच्या वापरात यावीत हाच आरोग्य सेवा, परिवहन विभागाचा उददेश्य आणि उदद् ीष्टय आहे.
    • अंमलबजावणी कालावधी व पध्दती : वाहने, शितसाखळी उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामकाज आरोग्य सेवा,परिवहन विभागाकडून नियमितपणे केले जाते.
    • अपेक्षित लाभार्थी / लोकसंख्या : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यभरातील विविध स्तरावर कार्यरत सर्व आरोग्य संस्थांकडील वाहने, शितसाखळी उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्याचे कामकाज आरोग्य सेवा, परिवहन विभागाकडून नियमितपणे केले जाते. याचा थेट लाभ आरोग्य कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांना होत असतो.
    • देण्यात येणारे लाभ / सेवा : वाहने, शितसाखळी उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्याची सेवा आरोग्य सेवा, परिवहन विभागाकडून केली जाते. याचा लाभ सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व आरोग्य संस्थांना होतो.
    • झालेले कार्य : आरोग्य सेवा, परिवहन विभागाच्या जिल्हा कार्यशाळा आणि विभागीय कार्यशाळांकडून सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व आरोग्य संस्थांकडील वाहने, शितसाखळी उपकरणांची नियमितपणे देखभाल व दुरुस्ती केली जाते. सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध आरोग्य संस्थांकडील वापरातील एकुण वाहनांपैकी ९६.९० टक्के पेक्षा अधिक वाहने चालु आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध आरोग्य कार्यक्रम राबविणे आरोग्य संस्थांना सहज सुलभ होत आहे.

     

    ६) कार्यक्रमाची सदयस्थिती –        

    विभागात सेवेत कार्यरत वाहनांची सदयस्थिती
    एकुण चालु नादुरुस्‍त निर्लेखनपाञ अंतिम निर्लेखित
    ४०७१ ३९४५ १२६ ३५८ २१६७

     

    रुग्‍णालयीन उपकरणांची सदयस्थिती –

    रुग्‍णालयीन उपकरणे
    एकुण चालू नादुरुस्‍त निर्लेखनपाञ अंतिम निर्लेखित
    १०२७०३ १०२४५८ २४५ ३१२०

     

    शितसाखळी उपकरणांची सदयस्थिती –

    शितसाखळी उपकरणे
    एकुण चालू नादुरुस्‍त निर्लेखनपाञ अंतिम निर्लेखित
    ९१७० ९१४५ २५ २१४२ ८२१

    लाभार्थी:

    नागरीक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या १०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.