राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र महाराष्ट्र
| राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र महाराष्ट्र | ||
| परिचय:
केंद्र शासन (एमओएचएफडब्ल्यू) आणि राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) यांच्या तांत्रिक सहाय्याने सन २००८ मध्ये राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, महाराष्ट्र, पुणे (एसएचएसआरसी) ची स्थापना करण्यात आली. हे कार्यालय औंध, पुणे येथील जिल्हा रुग्णालय कॅम्पस येथे असलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, (एचएफडब्ल्यूटीसी) चे नवीन इमारतीच्या तळमजल्यावर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येणा-या विविध आरोग्यविषयक योजनांचे मुल्यमापन करुन अभ्यास करण्याचे कामकाज करण्यात येते. त्यानुसार राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एसएचएसआरसी) ही राज्यास तांत्रिक सहाय करणारी प्रमुख संस्था आहे. या केंद्रामार्फत कार्यक्रम आराखडा विषयक, कार्यक्रम त्रुटी शोधणे, कार्यक्रम अंमलबजावणी विषयक सल्ला, संशोधन अभ्यास, माहिती विश्लेषण, कार्यक्रम मूल्यमापन, कार्यक्रमांतर्गत संशोधन इत्यादी कामकाजात योगदान दिले जाते. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, पुणे कार्यालयाचे उदेदश १) मुख्य उदेदश २) प्रतिसादात्मक उदेदश |
||
| संस्थेचा मुख्य उदेदश –
१. सामुदायिक आरोग्य कार्यक्रमांचे/प्रक्रियांना बळकटीकरण करणे. २. सार्वजनिक आरोग्य नियोजन करणे ३. मानव संसाधन व्यवस्थापन करणे ४. गुणवत्ता हमी आणि संदर्भ सेवाबाबत माहिती उपलब्ध करणे ५. प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करणे ६. डेटा विश्लेषण/संशोधन करणे ७. आरोग्य लेखा आणि आरोग्य सेवा वित्त बाबत संशोधन करणे राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, महाराष्ट, मुख्य उदेदश म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत येणा-या सर्व आरोग्यविषयक कार्यक्रमांना योग्य तांत्रिक सहाय्य प्रदान करणे, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि कार्यक्रमांचा समावेश आहे. राज्य नवोन्मेष केंद्र: (राज्यभरातील चांगल्या पद्धती आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी केंद्र) एसएचएसआरसी येथे स्थित आहे. |
||
| ध्येय:- सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांना तांत्रिक साहाय्य म्हणून काम करणे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान] महाराष्ट्र राज्यातील लोकांना योग्य आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. | ||
| उदिष्टे :-
1) महाराष्ट्रातील धोरण निर्मिती आणि आरोग्य नियोजनासाठी संशोधनाद्वारे पुरावे तयार करणे. 2) महाराष्ट्रातील आरोग्य मानवी संसाधने सक्षम करणे. 3) राज्यातील आरोग्य सेवांमध्ये सार्वत्रिक ऊपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी निर्देशित केलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणे. महाराष्ट्रात आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी विविध भागीदारी आणि सहकार्यांना प्रोत्साहन देणे. |
||
| भावी वाटचाल, दृष्टी आणि उद्देश:- सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच संशोधन आणि मूल्यमापन] क्षमता निर्माण] समुदाय प्रक्रिया] व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करून प्रभावी आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासाठी एसएचएसआरसीला सार्वजनिक आरोग्यामध्ये एक प्रमुख तांत्रिक आरोग्यसंसाधन संस्था म्हणून स्थान आहे. | ||
|
लाभार्थी:
नागरीक
फायदे:
वरीलप्रमाणे
