IPHS
लॅबोरेटरी सर्विसेस नोट
- केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये Laboratory Services च्या सेवा बाहयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध करून घेण्यासाठी करार करण्यात आलेला आहे.
- सदर करारास दि.19.10.2023 च्या शासन निर्णयानुसार दि.३१.०८.२०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
- सदर प्रकल्पानुसार मे.एचएलएल लाइफ केयर लि. यांनी राज्यात एकूण 137 ठिकाणी लॅबोरेटरी स्थापित केलेल्या आहेत. करारात ठरवून दिलेल्या चाचण्या लॅबोरेटरीज मध्ये करण्यात येतात.
- कलेक्शन केलेल्या samples चे अहवाल रुग्णांच्या मोबाइल वर मेसेज द्वारे देखील अहवाल पाठविण्यात येतात. तसेच संबंधित आरोग्य संस्थाना करारात नमूद केलेल्या TAT Time नुसार चाचणी निहाय अहवालांच्या Hard Copies चाचणी झाल्यानंतर दुस-या दिवशी आरोग्य संस्थाच्या संबंधित अधिका-यांकडे देण्यात येतात.
- सेवा पुरवठादार मे.एचएलएल लाइफ केयर लि. यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या वेळेत आरोग्य संस्थांमधील sample कलेक्शन करण्यासाठी phlebotomist ची नियुक्ती केलेली आहे.
- या सर्व प्रयोगशाळा चाचण्या करण्यासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसून सदर सेवा पूर्णतः मोफत आहे.
- सदर सेवेअंतर्गत खालील 34८५ आरोग्यसंस्थांमध्ये सेवा देण्यात येत आहे.
No. of Facilities having Laboratory Services | ||||||||
HBT AD | UHWC | UPHC | PHC | RH+ | DH+ | Total | ||
1 | INSTITUTIONS COVERED | 298 | 236 | 491 | 1916 | 436 | 108 | 3485 |
डायलिसीस सेवा
- महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमा अंतर्गत (पीएमएनडीपी) हिमोडायलिसीस सेवा देण्यात येत आहे.
- ६३ आरोग्य संस्थामध्ये इन-हाउस तत्त्वावर डायलिसीस सेवा देण्यात येत आहे.
- ४० आरोग्य संस्थामध्ये बाह्यस्थ संस्थेमार्फत पीपीपी तत्त्वावर डायलिसीस सेवा देण्यात येत आहे.
टेलिरेडीओलॉजी सेवा
- भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये टेलिरेडिओलॉजी सेवा मोफत देण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मे. कृष्णा डायग्नोस्टिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार दि . २२/१०/2020 रोजी पुढील ५ वर्षासाठी करण्यात आलेला आहे.
- टेलिरेडिओलॉजी सेवेमध्ये राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत ग्रामीण रुग्णालये (आरएच), उपविभागीय रुग्णालये (एसडीएच), जिल्हा रुग्णालये (डीएचएस), सामान्य रुग्णालये, मेंटल रुग्णालये, कुष्ठरोग रुग्णालये, टीबी हॉस्पिटल व महिला रुग्णालये या रूग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे.
- टेलिरेडिओलॉजी सेवा 479 रुग्णालयात उपलब्ध करुन दिली जात आहे.
सीटी स्कॅन सेवा
पीपीपी तत्वावर
- केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार 61 ठिकाणी सीटी स्कॅन सेवा देण्यासाठी खालील नमूद संस्था ना सेवापूरवठा दारामार्फत करार करण्यात आलेला आहे
- २२ जिल्हा रुग्णालयात – (ऑपरेशनल पार्टनर)
- ३१ उपजिल्हा रुग्णालय -(पी.पी.पी) तत्वावर )
- ०८ सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात – (ऑपरेशनल पार्टनर)
- दि. १०/०५/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३१ रुग्णालयात (सा.रु.व उप.जि.रु) नव्याने सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासकिेय मान्यता देण्यात आलेली आहे.
- केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील ३१ रुग्णालयात (सा.रु.व उप.जि.रु) नव्याने सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी सेवा पुरवठादार यांची नियुक्ती करुन दि. १८/०७/२०२२ रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहे.
- सीटी स्कॅन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी दि. १4/०8/२०२3 रोजी करार करण्यात आलेला आहे.
- सदयस्थितीत सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर ३१ पैक्की २3 ठिकाणी मे.क्रस्ना डायग्नॉस्टीक लि. यांच्यामार्फत जागा हस्तांतरित करण्यात आलेली आहे.त्यापैक्की १९ रुग्णालयात मे.क्रस्ना डायग्नॉस्टीक लि. यांच्यामार्फत सीटी स्कॅन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तसेच उर्वरित ठिकाणी सीटी स्कॅन सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ऑपरेशनल पार्टनर तत्वावर
- राज्यातील १७ रुग्णालयात एमआर सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी व सदयस्थितीत कार्यरत असणा-या १७ शासकिय रुग्णालयात सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा प्रक्रियद्वारे सेवा पुरवठादार यांची विहित पध्दतीने नियुक्ती करुन दि.04.2024 अन्वये करार करण्यात आलेला आहे.
- सदयस्थितीत १७ पैक्की १६ रुग्णालयात सीटी स्कॅन सर्विसेस मे.क्रस्ना डायग्नॉस्टीक लि.यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील 0१ रुग्णालयात (जि.रु) नव्याने सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी व सदयस्थितीत कार्यरत शासनामार्फत सीटी स्कॅन (ऑपरेशनल पार्टनर) ०३ रुग्णालयात सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यासाठी सेवा पुरवठादार यांची नियुक्ती करण्यात आलेली असून दि.२४.11.२०२३ नुसार करार करण्यात आलेला आहे.
- सदयस्थितीत ५ पैक्की ४ रुग्णालयात मे. युनिक वेलनेस प्रा.लि. यांच्यामार्फत सीटी स्कॅन सर्विसेस उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
( उपजिल्हा रुग्णालय पीपीपी तत्वावर सीटी स्कॅन सर्विसेस)
सिटी स्कॅन पीपीपी तत्वावर | ||
अनु. क्र | रुग्णालयांचे नाव | सिटी स्कॅन कार्यान्वित केल्याची दिनांक |
1 | उपजिल्हा रुग्णालय चोपडा | 08.08.2024 |
2 | उपजिल्हा रुग्णालय, देगलूर | 05-10-2023 |
3 | उपजिल्हा रुग्णालय, गडिग्लंज | 31-12-2023 |
4 | उपजिल्हा रुग्णालय, इंचलकरंजी | 28-08-2023 |
5 | उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर | 09-10-2023 |
6 | उपजिल्हा रुग्णालय, कैज | 11-12-2023 |
7 | उपजिल्हा रुग्णालय, कराड | 23-01-2024 |
8 | उपजिल्हा रुग्णालय, मंचर | 11-10-2023 |
9 | उपजिल्हा रुग्णालय, मानगाव | 16-05-2024 |
10 | उपजिल्हा रुग्णालय, पनवेल | 25-09-2023 |
11 | उपजिल्हा रुग्णालय, परळी | 05-12-2023 |
12 | उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी | 01.07.2024 |
13 | उपजिल्हा रुग्णालय, येवला | 17-02-2024 |
14 | उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर | 08.11.2024 |
15 | उपजिल्हा रुग्णालय, कळवण | 07.10.2024 |
16 | उपजिल्हा रुग्णालय, राजूरा | 03.01.2025 |
17 | उपजिल्हा रुग्णालय,डहाणू | ०९.०२.२०२५ |
18 | उपजिल्हा रुग्णालय,वैजापूर | ०९.०२.२०२५ |
19 | उपजिल्हा रुग्णालय,शिरपूर | 15-01-2025 |
( शासन मालकीचे सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय )
शासन मालकीचे सिटी स्कॅन (Operational Partner) | ||
अनु. क्र | रुग्णालयांचे नाव | सिटी स्कॅन कार्यान्वित केल्याची दिनांक |
१ | उपजिल्हा रुग्णालय, मानगाव | 16-05-2024 |
२ | सामान्य रुग्णालय,उल्हासगनर | 14-05-2024 |
३ | उपजिल्हा रुग्णालय, शहापूर | 02-05-2024 |
४ | उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर. | 18-04-2024 |
५ | सामान्य रुग्णालय, मालेगाव | 25-04-2024 |
६ | उपजिल्हा रुग्णालय, उदगिर | 01-05-2024 |
७ | सामान्य रुग्णालय, शेगाव | 03-05-2024 |
८ | सामान्य रुग्णालय, खामगाव | 16-04-2024 |
शासन मालकीचे सिटी स्कॅन (Operational Partner) | ||
अनु. क्र | रुग्णालयांचे नाव | सिटी स्कॅन कार्यान्वित केल्याची दिनांक |
1 | जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर | ०1.06.2024 |
2 | जिल्हा रुग्णालय, अमरावती | 17.07.2024 |
3 | जिल्हा रुग्णालय, छ. संभाजी नगर | 16.06.2024 |
4 | जिल्हा रुग्णालय, बीड | 22.05.2024 |
5 | जिल्हा रुग्णालय, भंडारा | 26.06.2024 |
6 | जिल्हा रुग्णालय, बुलढाणा | 27.06.2024 |
7 | जिल्हा रुग्णालय, धुळे | 06.06.2024 |
8 | जिल्हा रुग्णालय, हिंगोली | 15.07.2024 |
9 | जिल्हा रुग्णालय, जालना | 01.07.2024 |
10 | जिल्हा रुग्णालय, नांदेड | 15.07.2024 |
11 | जिल्हा रुग्णालय, नंदूरबार | 11.06.2024 |
12 | जिल्हा रुग्णालय, नाशिक | 22.05.2024 |
13 | जिल्हा रुग्णालय, परभणी | 03.07.2024 |
14 | जिल्हा रुग्णालय, वर्धा | 01.07.2024 |
15 | जिल्हा रुग्णालय, वाशिम | 27.06.2024 |
16 | जिल्हा रुग्णालय, गडचिरोली | 13.09.2024 |
१७ | जिल्हा रुग्णालय, अलिबाग | 13.03.2024 |
१८ | जिल्हा रुग्णालय, औंध | 21.06.2024 |
१९ | जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी | 05.03.2024 |
२० | जिल्हा रुग्णालय, सातारा | 05.03.2024 |
एम.आर.आय. सेवा
- राज्यातील २२ जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत एम.आर.आय. सर्व्हिसेस पीपीपी तत्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी तसेच जिल्हा रुग्णालयात असलेल्या शासकिय मालकीच्या सीटी स्कॅन मशीनसाठी ऑपरेशनल पार्टनर बाहयस्थ संस्थेमार्फत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.
- दि.१० मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्यातील २२ जिल्हा रुग्णालयात बाह्य सेवापुरवठादारामार्फत एम.आर.आय. सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- सदर निविदा प्रक्रियानुसार, एम.आर.आय. सेवा या प्रकल्पासाठी मे. युनिक वेलनेस प्रा.लि. आणि मे.क्रस्ना डायग्नोस्टिक लि. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनु. क्र. | सेवापुरवठादाराचे नाव | एकूण आरोग्य संस्था | कार्यादेश दिनांक | करार
दिनांक |
आरोग्य संस्थाचे नाव |
1 | मे. युनिक वेलनेस प्रा.लि | ०५ | २७.०९.२०२२ | २४.११.२०२३ | जिल्हा रुग्णालय, ठाणे, पुणे,रत्नागिरी, रायगड,सातारा |
२. | मे.क्रस्ना डायग्नोस्टिक लि. | १७ | २४.०१.२०२४ | २९.०४.२०२४ | जिल्हा रुग्णालय, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड, वर्धा, भांडारा, गडचिरोली, वाशीम, अमरावती, बुलढाणा |
- सदर प्रकल्पांतर्गत एम.आर.आय सेवा २४X७ स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
- एम.आर.आय अहवाल सॉप्टकॉपी व हार्डकॉपी अशा दोन्ही स्वरुपात संबंधित आरोग्य संस्थेस पुरविण्यात येतात. अहवालावर नोंदणीकृत रेडीयोलॉजीस्ट यांची डिजिटल किंवा प्रत्यक्ष स्वाक्षरी असेल.
- राज्यातील सर्व शासकीय रुग्णासाठी सदर सेवा हि पुर्णपणे निशुल्क आहे.
- या प्रकल्पासाठी लागणारे मनुष्यबळ (Technician and Radiologist) हे सेवापुरवठादार मार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
- सेवापुरवठादारासोबत करण्यात आलेल्या करारानुसार, एम.आर.आय. स्कॅन सेवा सुरु करण्यासाठी जागा हस्तांतरित केल्यानंतर सेवापुरवठादाराने १८० दिवसांमध्ये सदरील सेवा सुरु करणे अपेक्षित आहे.
- सद्यास्थितीत, जिल्हा रुग्णालय पुणे (औंध) येथे दि. २१.०६.२०२४ पासून IPD/OPD रुग्णांना MRI सेवा सुरु करण्यात आली आहे.
- तसेच उर्वरित ठिकाणी सेवापुरवठादारामार्फत एम.आर.आय. सेवा सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील जागा हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरु आहे.
- जिल्हा रुग्णालय,परभणी , हिंगोली , जालना, नांदेड, भंडारा, अहमदनगर, ठाणे आणि पुणे येथे सेवापुरवठादारामार्फत जागा हस्तांतरित करण्यात आली असून सिव्हील वर्क सुरु आहे.
बायोमेडिकल उपकरणे देखभाल आणि दुरुस्ती सेवा.
- बायोमेडिकल उपकरणे देखभाल आणि दुरुस्ती सेवांच्या आउटसोर्सिंगसाठी राज्याने निविदा प्रक्रिया केली असून नवीन सेवापुरवठादाराची 29% च्या CMC दराने निवड करण्यात आली आहे. नवीन सेवापुरवठादारास दि. ०६.०१.२०२२ रोजी कार्यादेश निर्गमित करण्यात आला आहे.
- दि. १५.०२.२०२२ रोजी नवीन सेवापुरवठादार मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी यांच्यासोबत ५ वर्षाकरिता करार करण्यात आलेला आहे.
- सेवापुरवठादार मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व आरोग्य संस्थामधील (PHC स्तरापर्यंत) सर्व वैद्यकीय उपकरणांची (Bio Medical Equipment’s) देखभाल दुरुस्ती करतात.
- सेवापुरवठादार मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपीद्वारे “18002084441” व “18002035606 ” या टोल फ्री क्रमांकावर 24X7 कॉल सेंटर सुरू केले आहे. तसेच सेवापुरवठादार मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपीद्वारे ऑनलाइन सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
- मे. एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी यांच्यामार्फत ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करण्यात आलेला असून ते “mhbemp.in” या Link वर उपलब्ध आहे.
- उपकरणे खराब झाल्याची तक्रार नोंदणी झाल्यानंतर मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी यांनी 7 दिवसांच्या आत उपकरणे दुरुस्त करणे बंधनकारक आहे. जर तक्रार नोंदवल्यानंतर 7 दिवसांनंतर कोणतेही उपकरण नादुरुस्त असल्यास, करारानुसार दंड लागू होईल.
- सेवापुरवठादार व्हेंटिलेटर, रेडियंट वॉर्मर, डिफिब्रिलेटर आणि बॉयलस apparatus ही उपकरणे स्टँडबाय उपकरणे प्रदान करेल कारण ही उपकरणे life saving उपकरणे म्हणून गणली जातात. त्यामुळे सदर उपकरणात बिघाड झाल्यास मे.एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी प्राधान्याने (priority basis) दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील आणि जर ते अयशस्वी झाले तर 72 तासांच्या आत आरोग्य संस्थेमध्ये सदर उपकरणांचे स्टँडबाय उपकरणे प्रदान करतील.
· जर सेवापुरवठादाराने निर्धारित वेळेत व्हेंटिलेटर, रेडियंट वॉर्मर, डिफिब्रिलेटर आणि बॉयलस apparatus ही उपकरणे स्टँडबाय उपकरणे पुरविण्यास अयशस्वी झाल्यास करारानुसार, दंड आकारणी लागू होईल.
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online