बंद

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के)

    तारीख : 17/04/2025 -

    राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आर.बी.एस.के)

    • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा मुलांच्या आरोग्याचे संवर्धन व विकास साधण्यासाठी उचललेले अत्यंत महत्वपुर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाचा माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंध घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.
    • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
    • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ० ते १८ वर्ष वयोगटातील जवळपास २ कोटी मुलांना होत आहे.
    • अंगणवाडीस्तरावर ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून २ वेळेस होणारी आरोग्य तपासणी हा हया कार्यक्रमाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या व्यतिरिक्त शासकीय व निमशासकीय शाळेतील ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांनाही या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा लाभ होत आहे.
    • सदर आरोग्य तपासणी दरम्यान मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषयक समस्या/ अडचणीसाठी योग्य ते संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकिय व शल्य चिकित्सक उपचार पुरविण्यात येणार आहेत. मुलांवर केले जाणारे उपचार हे पुर्णत मोफत पुरविण्यात येतात.
    • राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची पथके प्रत्येक तालुक्यात नियुक्त करण्यात आलेली आहेत. सदर पथकाचे मुख्यालय, ग्रामीण रुग्णालये किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, जिल्‍हा रुग्‍णालय हे आहे.
    • महाराष्ट्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत एकूण ११९६ पथके सन २०२२-२३ च्या पीआयपीमध्ये मंजुर करण्यात आलेली आहेत. यापैकी १११० पथके महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागासाठी (बृहन्मुंबई वगळता) कार्यरत आहेत. बृहन्मुंबईसाठी ५५ पथके मंजुर करण्यात आलेली आहेत. तसेच ३१ पथके आदिवासी जिल्हयांमधील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी मंजुर आहेत.
    • महाराष्ट्र राज्याच्या ३४ जिल्हयांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम १ एप्रिल २०१३ पासून लागू करण्यात आला. प्रत्येक पथकात १ वाहन, २ वैद्यकीय अधिकारी, १ औषधी निर्माण अधिकारी, १ एएनएम, तपासणी साहित्य, इत्यादी पुरविण्यात आलेले आहे. आरोग्य तपासणी कार्यक्रमाचे गावनिहाय वेळापत्रक शिक्षण आणि महिला व बाल कल्याण विभागांच्या समन्वयाने तयार करुन प्रत्येक पथकास ठराविक वेळापत्रकाप्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
    • जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (जिल्हा लवकर हस्तक्षेप केंद्र) हा अंत्यत महत्वाकांक्षी प्रकल्प असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील अंगणवाडी स्तर आणि शाळा स्तरांवरुन संदर्भित करण्यात आलेल्या बालकांच्या बौध्दि् क, मानसिक आणि शारिरीक स्थितीचा विकास आणि उपचार करणेसाठी राज्यातील 34 जिल्हयांमध्ये डिईआयसी स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
    • डिईआयसी अंतर्गत एकूण १४ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये डिईआयसी व्यवस्थापक, बालरोग तज्ञ, वैद्यकिय अधिकारी, दंतचिकित्सक, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, ध्वनी विशेषज्ञ आणि भाषण तज्ञ, मानसोपचार तज्ञ, नेत्रतज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर आणि आरोग्य परिचारीका इत्यादी पदांचा समावेश आहे.  या केंद्रामध्ये संदर्भित करण्यात आलेल्या बालकांना विविध तज्ञांमार्फत उपचार देवून त्या बालकांचे बौध्दि् क, मानसिक आणि शारिरीक स्थितीचा विकास साधला जातो.

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन