बंद

    प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

    • तारीख : 17/04/2025 -

    प्रधानमंत्री मातृ वंदना योजना –

    महाराष्‍ट्र राज्‍याची सद्यस्थिती

     

    भारतातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिला गरोदरपणाच्या शेवटच्या टप्‍यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते तसेच, प्रसूतिनंतर शारिरीक क्षमता नसतानाही मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांचे (कमी वजनाचे व कुपोषित) आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे देशाच्या मातामृत्यू व बालमृत्यूच्या दरात वाढ होते. सबब, मातामृत्यू दर व बालमृत्यू दर यावर नियंत्रण ठेवून सदर दर कमी करण्यासाठी आणि माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देवून त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्रशासनाच्या महीला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना संपूर्ण देशात दिनांक १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे.

     

    योजनेचे ध्‍येय –

    माता व बालकांचे आरोग्‍य सुधारण्‍याच्‍या दृष्‍टीने गर्भवती महिला व स्‍तनदा मातेला सकस आहार घेण्‍यास प्रोत्‍साहित करुन त्‍यांच्‍या आरोग्‍यात सुधारणा व्‍हावी.

    जन्‍माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्‍य सुधारावे आणि मात मृत्‍यू व बाल मृत्‍यू दरात घट होऊन तो नियंत्रणात रहावा.

    सदरचा लाभ हा जन्‍माच्‍या वेळी लिंग गुणोत्‍तर सुधारणे स्‍त्री भ्रुणहत्‍येस अवरोध करणे आणि स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत होण्‍यासाठी हितकारी ठरेल.

    लाभार्थ्‍यांकडून आरोग्‍य संस्‍थांच्‍या सुविधांचा लाभ घेण्‍याचे प्रमाण वाढून संस्‍थात्‍मक प्रसुतीचे प्रमाण वृध्दिंगत करणे.

    नवजात अर्भकांच्‍या जन्‍माबरोबरच जन्‍म नोंदणीचे प्रमाणात वाढ व्‍हावी.

     

    उदि्दष्‍टे –

    गरोदर वा स्‍तनदा मातांसाठी आर्थीक सहाय्य प्रदान करणे जेणेकरुन माता आणि बालकांच्‍या आरोग्‍य आणि पोषण व्‍यवस्थितरित्‍या होऊ शकेल. जेणेकरुन मातांनी प्रसुतीदरम्‍यान आरोग्‍य सुविधांचा वापर करावा आणि प्रसुतीच्‍या पुर्वी आणि नंतर पुरेशा प्रमाणात आराम करावा. मुलीच्‍या जन्‍माचे स्‍वागत व्‍हावे तसेच मुलींसाठी समाजामध्‍ये सकारात्‍मक वातावरण निर्माण व्‍हावे.

     

    त्याअनुषंगाने दि.२१.११.२०१७ रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन या योजनेचा शासन निर्णय दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी निर्गमित करण्यात आला असून या योजनेमध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाच्या ४० टक्के सहभाग आहे.

     

    जुनी PMMVY CAS योजना-

     

    शासनाने अधिसूचना केलेल्या संस्थेत (शासकीय रुग्णालयात) नोंदणी केलेलया गर्भवती महिलेस पहिल्या जिवीत अपत्यापूरताच एकदाच लाभ अनुज्ञेय असून लाभाची रक्कम रु.५०००/- एवढी आहे. (वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा  लाभ अनुज्ञेय नाही) अनुज्ञेय लाभ पात्र गर्भवती महिलेस खाली  दर्शविल्यानुसार ३ टप्प्यात (DBT – Through PFMS ) द्वारे संबंधित गर्भवती लाभार्थी महीलोच्या थेट संलग्न बॅंक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात थेट जमा केला जातो

     

    जुन्‍या PMMVY CAS योजने अंतर्गत देण्‍यात आलेल्‍या लाभाचे टप्‍पे –

     

    लाभ द्यावयाचे टप्पे लाभाचे निकष
    १ ला हप्ता रु.१०००/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भ धारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होतो.
    २ रा हप्ता रु.२०००/- किमान एकदा प्रसुतिपूर्व तपासणी केल्यास गर्भ धारणाचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या जमा केला जातो.
    ३ रा हप्ता रु.२०००/- प्रसुतिनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी,ओपीव्हीझीरो,तसेच पेन्टाव्हॅलेन्ट व ओपीव्ही चे ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या जमा केला जातो.

     

    प्रधानमंञी मातृ वंदना योजनेतंर्गत महाराष्‍ट्र राज्‍यासाठी सन २०१७ ते  मार्च २०२४ व 08 नोव्हेंबर 202४ पर्यंत ३८०८५०४  लाभार्थींना लाभ देण्‍यात आलेला आहे. तसेच लाभार्थीच्‍या बॅक खाती एकूण रक्‍कम रुपये 15४१,४7,5०,०००/- इतका निधी वितरित करण्‍यात आलेला आहे.

     

    राज्‍यात प्रधानमंञी मातृ वंदना योजना चालू झाल्‍यापासून 08 नोव्हेंबर  202४ अखेर अखेरपर्यत कार्यक्रमांतर्गत झालेल्‍या लाभाच्‍या वितरणाची माहिती खालील प्रमाणे आहे.

     

    वर्ष उदिष्‍ट   लाभार्थी खर्च (रुपये हजारात)
    2017-2018 ४१७१८५ 319558 388692
    2018-2019 ६६२३७७ 645648 2203022
    2019-2020 ६०४५५३ 762341 3819055
    2020-2021 ४५२४३६ 547219 2639061
    2021-2022 ४५२४३६ 609921 2484253
    202२-202३
    (२८ मार्च  202३ अखेर )
    ४५२४३६ 521750 2500963
    202३-202४ ७४४५२२ ११९८२८ ४४४६८३
    202४-202५                     (08 नोव्हेंबर   202४ अखेर) 568436 २८२२३९ ९३५०२१
    एकूण 4354381 ३८०८५०४ 15४१४७५०

     

    (स्‍पष्‍टीकरण –केंद्र शासनाव्‍दारे ६० टक्‍केच्‍या प्रमाणात एससी, एसटी व जनरल नुसार प्राप्‍त अनुदानाच्‍या प्रमाणात ४० टक्‍के राज्‍य हिस्स्‍याचे अनुदान उपलब्‍ध होत असते.

    • केंद्र शासनाव्‍दारे देण्‍यात येणा-या वा‍र्षिक उद्दिष्‍टांच्‍या प्रमाणात केंद्र हिस्‍सा ६० टक्‍के आणि राज्‍य हिस्‍सा ४० टक्‍के च्‍या प्रमाणात अनुदानाची अंदाजे तरतुद करण्‍यात येत असते.
    • सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२३-२४ या वित्‍तीय वर्षात प्रत्‍यक्ष केंद्र शासनाव्‍दारे प्राप्‍त ६० टक्‍के निधीच्‍या प्रमाणात राज्‍य हिस्‍सा ४० टक्‍के खर्च करण्‍यात आला आहे.
    • अपेक्षित उद्दिष्‍टांच्‍या प्रमाणात केंद्र हिस्‍सा प्राप्‍त न झाल्‍या कारणांने राज्‍य हिस्‍सा करीताचे अनुदान त्‍यामुळे कमी खर्च करण्‍यात आले आहे.)

     नवीन PMMVY – 2.0 योजना

     

    केंद्र शासनाच्‍या दि.१४ जुलै २०२२ रोजीच्‍या पत्रानुसार सदर योजना नव्‍या स्‍वरुपात देशात लागू करण्‍यात आली आहे. सदर योजनेमध्‍ये पुर्वी केवळ पहिल्‍या अपत्‍यासाठी लाभ मिळत असून आता नवीन मार्गदर्शक सूचनानुसार दि.१ एप्रिल २०२२ नंतर दुसरे अपत्‍य मुलगी जन्‍माला आल्‍यानंतरच्‍या लाभार्थीचा देखील या योजनेमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.

     योजनेतंर्गत अनुज्ञेय लाभ व त्‍यांचे वितरण

     

    प्रधान मंञी मातृ वंदना योजनेतंर्गत पाञ लाभार्थी महिलेने विहीत अटी, शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्‍यानंतर तिला पहिल्‍या अपत्‍यासाठी रु. ५०००/- (अक्षरी रु. पाच हजार फक्‍त) ची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांमध्‍ये तर दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास मुलीच्‍या जन्‍मानंतर एकाच टप्‍प्‍यात रु. ६०००/- (अक्षरी रु. सहा हजार फक्‍त) चा लाभ आधार संलग्‍न बॅक खात्‍यात किंवा पोस्‍ट ऑफिस मधील खात्‍यात (DBT) व्‍दारे जमा केली जाईल.

     

    टप्‍पा अट पहिल्‍या अपत्‍यासाठी दुसरे अपत्‍य मुलगी असल्‍यास तिच्‍या जन्‍मानंतर*
    पहिला हप्‍ता राज्‍य शासनाने अधिसूचित केलेल्‍या शासकीय आरोग्‍य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्‍या मासिक पाळीच्‍या तारखेपासून ६ महिन्‍यांच्‍या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी. रु. ३०००/- एकत्रित रु. ६०००/-

    i. बाळाची जन्‍म नोंदणी

    ii.बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्ही ३ मात्रा, पेन्टाव्हॅलेन्टलसीच्‍या ३ मात्रा अथवा समतुल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्‍यक.

     

     

    दुसरा हप्‍ता * i. बाळाची जन्‍म नोंदणी

    ii.बालकास बीसीजी, ओपीव्हीझीरो, ओपीव्ही ३ मात्रा, पेन्टाव्हॅलेन्टलसीच्‍या ३ मात्रा अथवा समतुल्य / पर्यायी लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण करणे आवश्‍यक.

    रु. २०००/-

     

    पहिल्‍या खेपेच्‍या मातांसाठी शेवटच्‍या मासिक पाळीच्‍या दिनांकापासून ५७० दिवसांच्‍या आत तर दुसरे जीवंत अपत्‍य मुलगी असलेल्‍या मातांनी मुलीच्‍या जन्‍म दिनांकपासून २७० दिवसांच्‍या आत लाभ सर्व अटी शर्ती पुर्तता करुन लाभ प्राप्‍त करु शकतात. विहित मुदतीनंतर संगणक प्रणालीद्वारे फॉर्म स्‍वीकारला जात नाही.

     

    प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्‍यासाठी लाभार्थी खालीलपैकी किमान एक गटातील असणे आवश्‍यक

     (किमान एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणे आवश्‍यक) 

     

     

    १) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न रु.८ लाख पेक्षा कमी आहे.

    २) अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती

    ३) ज्या महिला ४० टक्के किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत.

    ४) बीपीएल शिधापत्रिका धारक महिला.

    ५) आयुष्मान भारत अंतर्गत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी.

    ६) इ- श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला.

    ७) किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी.

    ८) मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला.

    ९) गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW)/अंगणवाडी मदतनीस(AWHs)/आशा

    कार्यकर्ती (ASHAs)

    १०) अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनिंग कार्ड धारक महिला

     

    वरील नमूद किमान एका कागदपत्रा सोबत खालील कागदपत्रे व तपशील देणे आवश्‍यक आहे.

     

    • लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी (EID) कागदपत्र त्‍यासोबत विहित केलेले कागदपत्र.
    • परिपूर्ण भरलेलेमाता आणि बाल संरक्षण कार्डज्‍यामध्‍ये शेवटच्‍या मासिक पाळीचा दिनांक, गरोदरपणाची नोंदणी दिनांक,प्रसुतीपूर्व तपासणीच्‍या नोंदी असाव्‍यात.
    • लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत.
    • बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्रप्रत.
    • माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्‍या लसीकरणाच्‍या नोंदी असलेल्‍या पानाची प्रत.
    • गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक.
    • लाभार्थीचा स्‍वतःचा किंवा कुटूंबातील सदस्‍यांचा मोबाईल क्रमांक.
    • वेळोवेळी विहित केलेले अन्‍य कागदपत्र.

     

     

    केंद्राच्‍या सुचनेनुसार व मान्‍यतेने दिनांक २५ ऑक्‍टोबर २०२३ रोजी पाञ लाभार्थ्‍याची पडताळणी व मंजूरी झाल्‍यानंतर राज्‍यातील विविध जिल्‍हयांतील ८ महिलांना त्‍यांचा लाभ देवून निधी वितरणास सुरुवात करण्‍यात आली आहे.

     

    प्रधान मंञी मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल २.० मध्‍ये दि. 29 ऑक्टोबर २०२४ पर्यंत पहिल्‍या खेपेचे 477480  दुसरे अपत्‍य मुलगी असलेल्‍या 183532 असे एकुण 661012 लाभार्थींची नोंदणी झालेली आहे, व  नोंदणी करण्‍यात आलेल्‍या लाभार्थिंपैंकी वर्ष २०२४-२५ मध्‍ये आज (दि. 08 नोव्हेंबर  २०२४) पर्यत पीएफएमएस प्रणालीव्‍दारे २८२२३९    इतक्‍या लाभार्थ्‍यांना लाभ वितरण करण्‍यात आला आहे.

     

     

     

    अनु.क्र. एकूण लाभार्थि नोंदणी

    (वर्ष २०२४-२५)

    निधी वितरित करण्‍यात आलेल्‍या लाभार्थिंची संख्‍या ( दि. 08 नोव्हेंबर  २०२४ ) वितरित निधी रक्‍कम
    1 ३०३१६४ २८२२३९ ९३, ५0, २१, ०००/-

     

     

    सद्यस्थिती

    केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या दि २ मार्च २०२४ च्या पत्रानुसार नवीन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी सूचित केल्यानुसार मा. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने सदर योजना हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मा. मुख्यमंत्री कार्यालय यांचेकडे मान्यतेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सादर करण्यात आला होता.

     

    तसेच मा. आयुक्‍त, एकात्‍मीक बाल विकास  योजना महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या दिनांक १६/०७/२०२४ च्‍या पञानुसार सदर योजना महिला व बाल विकास विभागाकडे हस्‍तातरण करण्‍याकरीता व योजना हाताळण्‍याकरीता आवश्‍यक माहिती मा. आयुक्‍त, आरोग्‍य सेवा यांच्‍या मार्फत सादर करण्‍यात आली  आहे.

     

    महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 6/9/2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंमलबजावणीच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात  आली आहे.

     

    आरोग्य विभागाचे मनुष्यबळ व संसाधनांसह ही योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक माहिती व कार्यवाही सुरू आहे.

     

    आयुक्त, महिला व बालविकास, पुणे आणि अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे हे योजनेच्या हस्तांतरणासंबंधी प्रशासकीय आणि इतर अनुषंगिक बाबींची काळजी घेण्यासाठी एकमेकांशी समन्वय साधत आहेत.

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online