प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान(पी.एम.एस.एम.ए.)
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान(पी.एम.एस.एम.ए.)
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात येते. जिल्हास्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावर सदर अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी एका नोडल ऑफिसरची नेमणुक करण्यात आलेली आहे. सदर अभियानास संस्थास्तरावर प्रसिद् धी करण्यात येते.
सदरअभियान राबविण्याकरीता शहरी व ग्रामीण भागातील खालील तक्त्यात नमुद सरकारी आरोग्य संस्था निवडुन मॅपिंग करण्यात आले आहे.
ग्रामीण भाग | प्रा.आ.केंद्रे, ग्रामीणरुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये. |
शहरी भाग | अर्बन डिस्पेंसरीज, हेल्थपोस्ट, मॅटर्निटी होम्स व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये |
सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान खालीलप्रमाणे राबविण्यात येते
१) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्याकरीता संस्थांस्तरावर करण्यात येणारी तयारी
- वैद्यकिय अधिकारी/ संस्थाप्रमुख यांना अभियानासाठी लागणारी सर्व साहित्य सामुग्री देण्यात आलेली आहे.
- वैद्यकिय अधिकारी / आरोग्य सेविका / एलएचव्ही / स्टाफनर्स/ आशा यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत.
- अभियानाच्या दिवशी सर्व आरोग्य कर्मचारी आरोग्य संस्थेत हजर राहतात.
- संस्थेमधील स्वच्छतागृह व इतर ठिकाणी संपूर्ण स्वच्छता असल्याची खात्री केली जाते.
- लाभार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था केली जाते.
- लाभार्थ्यांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करुन दिले जातात.
- प्रसिध्दी साहीत्य संस्थेच्या दर्शनी भागावर, प्रतिक्षा कक्षात तपासणी कक्षात व प्रसुती कक्षात लावलेले असल्याची खात्री केली जाते.
- तपासणी, समुपदेशन, प्रयोगशाळा चाचण्या व औषध वाटपासाठी वेगवेगळया खोल्या असल्याची खात्री केली जाते.
- जर सरकारी संस्थेमध्ये खाजगी स्त्रीरोग तज्ञ विनामुल्य सेवा देत असतील तर अभियानाच्या अगोदर त्यांच्याशी संपर्कात राहणे व अशा खाजगी डॉक्टरांची प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभि्ांयान अंतर्गत निवड करुन जिल्हास्तरावर अंबलबजावणी केली जाते.
- राज्यातील आरएमएनसीएच+ए भागीदारांची प्रसिध्दी साहित्य तयार करण्यासाठी व सपोर्टीव्ह सुपरव्हीजनसाठी मदत घेतली जाते.
2) प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानष् अंतर्गत खालील सेवा देण्यात येतातः
- मोफत प्रयोग शाळा चाचण्या
- लाभार्थीचा वैद्यकीय पुर्वइतिहास घेऊन तपासणी करुन व धोक्याची लक्षणे, गुंतागुंत व कोणतीहीजोखीमनसल्याची खात्रीकरण्यात येते.
- प्रसुतीपूर्व तपासणीसाठी आलेल्या सर्व लाभार्थींचा रक्तदाब, पोटावरुन तपासणी व गर्भपिंडाच्या हृदयाचे ठोके तपासतात.
- शोधलेल्या सर्व अतिजोखमीच्या मातांना उच्च संस्थेमध्ये पुढील उपचारासाठी संदर्भीत केले जाते आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत उच्च संस्थेमध्ये योग्य ते उपचार दिले जातात. सर्व लाभार्थ्याला एमसीपी कार्ड देण्यात येते.
- सर्व गरोदर मातांचे गरोदरपणातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात एक सोनोग्राफी करण्यात येते.
- अभियानाच्या दिवशी आलेल्या सर्व लाभार्थीचे गरोदरपणातील तपासणी,गरोदरपणातील धोक्याची लक्षणे ,बाळाच्या जन्माची तयारी, गरोदरपणातील गुंतागुंतीची तयारी, लोहयुक्त गोळया व कॅल्शियमच्या गोळयांचे सेवनाचे महत्व, संस्थात्मक प्रसुती, संदर्भ सेवा, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमअंतर्गत देण्यात येणारा लाभ, प्रसुतीपश्चात काळजी, स्तनपान व पूरक आहार, संस्थात्मक प्रसुती व प्रसुतीपश्चात कुटूंबनियोजन बाबत समुपदेशन केले जाते.
- प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी)सहभाग :
- शासकीय संस्था वगळता अजून एखादी खाजगी संस्था स्वेच्छेने विनामूल्य सेवा सदर अभियानाच्या दिवसाच्या दिवशी देण्यास तयार असल्यास त्यांना या अभियानामध्ये समाविष्ट करुन घेतले जाते व त्यांच्या मार्फत वर नमुद केलेल्या सेवा त्यांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये देण्यात येतात. अभियानादरम्यान खाजगी संस्थांनी शोधलेल्या अतिजोखमीच्या मातांना शासकिय आरोग्य संस्थांमध्ये संदर्भ चिठ्ठीसहीत संदर्भित केले जाते.
- प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत झालेले काम
वर्ष | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत तपासण्यात आलेल्या एकूण गरोदर मातांची संख्या | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर मातांपैकी पहिल्यांदा तपासणी झालेल्या गरोदर मातांची संख्या | अतीजोखमीच्या आढळलेल्या गरोदर मातांची संख्या | सोनोग्राफी करण्यात आलेल्या एकूण गरोदर मातांची संख्या |
June 16 to Mar 17 | 783815 | 346808 | 34593 | 108933 |
2017-18 | 824309 | 389650 | 30805 | 181894 |
2018-19 | 703588 | 348193 | 24075 | 222647 |
2019-20 | 301779 | 147897 | 31573 | 97260 |
2020-21 | 73290 | 31439 | 9390 | 25870 |
2021-22 | 73764 | 34103 | 8296 | 29934 |
2022-23 | 290911 | 134261 | 41722 | 97799 |
2023-24 | 280508 | 120683 | 46344 | 94275 |
2024-25
(Upto Nov 24) |
199550 | 80442 | 65004 | 44676 |
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online