बंद

    राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

    • तारीख : 17/04/2025 -

    राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

     

     

    प्रस्तावना

     

    तंबाखू सेवनामुळे बरेच असंसर्गजन्य रोग निर्माण होतात. उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, इत्यादी. तसेच राष्ट्रीय तंबाखू नियत्रण कार्यक्रम सन २०१६-१७ पासून ३४ जिल्हात राबविण्यात येत आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो.

    तंबाखू सेवनाच्या आकडेवारीमध्ये एन. एफ. एच. एस. यांच्या सर्वेक्षणानुसार सन २००५-०६ (NFHS-3) ते २०१५-१६ (NFHS-4) मध्ये घट आढळून आली आहे. सन २००५-०६ मध्ये स्त्रियांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण १०.५ % वरून २०१५-१६ मध्ये ५.८% वर तर सन २००५-०६ मध्ये पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाण ४८.३% वरून सन २०१५-१६ मध्ये ३६.६% एवढी घट दिसून आलेली आहे.

    सन २०२६-१७ GATS – २ च्या अहवालानुसार राज्यात ६% पुरुष व १.४ महिला असे ३.८% प्रौढ व्यक्ती धुररहित (Smoke) तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात.

    31.7% पुरुष व 16.6% महिला असे एकूण 24.4% प्रौढव्यक्ती धुरविरहित (Smokeless or chowing tobacco) तंबाखूचे सेवन करतात.

    सन २००९ -१० GATS – 1 व सन २०१६ – १७ GATS – २ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात धूर रहित (smoking) तंबाखू सेवनाचे प्रमाण २.८% इतके तर धूरविरहीत  (Smoking ओर Chowing tobacco तंबाखू सेवनाचे प्रमाण ३.२% ने घटले आहे. तसेच तंबाखूच्या कोणत्याही प्रकारचा तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण ही ४.८% टक्क्यांनी म्हणजेच सन २००९-१० GATS – 1 च्या सर्वेमध्ये आढलळलेल्या ३१.४% वरुण ते  GATS – २ च्या सर्वेमध्ये २६.६% इतकी घट झाली आहे.

     

    या कार्यक्रमाची प्रमुख उदिदष्टे:-

    • तंबाखूमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायदयाविषयी मोठया प्रमाणावर जनजागृती करणे
    • सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.

     

    सिगारेट अन्य तंबाखूजन्य कायदा   2003 त्या अंतर्गत कलमे :-

    • कलम 4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी.
    • कलम ५ – सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थाच्‍या जाहीरातीवर बंदी.
    • कलम ६ अ – १८ वर्षाखालील मुलामुलिंना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी.
    • कलम ६ ब – शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी.
    • कलम ७ – तंबाखूजन्य पदार्थाच्या पॅकेटवर वैधानिक ईशारा छापणे.

     

    प्रमुख घडामोडी

    • राज्य नियंत्रण समिती (तंबाखू नियंत्रण कायदा – ५ कलम करिता) (शासन निर्णय क्रं. व्यसन २००८ /प्र.क्र. २४५/ आ – ५, दि. १ ऑक्टोबर २००८) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सचिवांची समिती करण्यात आलेली आहे.
    • जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तंबाखू नियंत्रण समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे व त्या समितीच्या त्रैमासिक बैठक होत आहे.
    • सुपारी सेवनाने कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाच्या (FDA) नोटिफिकेशन दि. १५/७/२०२० नुसार राज्यात तंबाखू, स्वादिष्ट /सुगंधित सुपारी यावर प्रतिबंध करण्यात आले आहे.
    • दिनांक १/७/२०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णय क्रं. तंबाखू /प्र. क्र. २३३/आ – ५, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्र आरोग्य रक्षण आणि थुंकी प्रतिबंध अधिनियम २०१५.
    • अधिसूचना ३/४/२०१८ नुसार सिगारेट व तंबाखू उत्पादनावरील वेष्टन, पॅकिंग तसेच तंबाखूने कॅन्सर होतो, तंबाखू जीव घेणा आहे, आजच सोडा ह्या प्रकारे नवीन सूचना जरी करण्यात आल्या आहेत.
    • महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. कोरोना – २०२०/ प्र. क्र. ११० /आ – ५, महाराष्ट्र राज्यात तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनास/ थुंकण्यास व धुम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्याबाबत दिनांक २९.५.२०२०.
    • महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यशासनाच्या दि. २४.९.२०२० रोजी च्या परीपत्रकानुसार कोटपा कायदा २००३ कलम ७ (२) ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी बिडी, सिगारेट, यासारखे उत्पादने पाकिटाशिवाय तथा वैधानिक चेतावणी शिवाय विक्री करण्यावर पूर्णता बंदी आहे.
    • तंबाखू सेवन मुक्ती करीता (National Tobacco Quit Line) तयार करण्यात आलेली असून त्याचा टोल फ्री क्रमांक हा 1800-11-2356 आहे.
    • महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परीपत्रक क्रं. संकीर्ण – २०२०/ प्र.क्र.२३४ /एस. डी.- ४, मंत्रालय मुंबई, दि. १० फेब्रूवारी २०२१ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत.
    • महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्रं तनिका-२०१५ .प्र.क्र. १७७ /आ – ५, मंत्रालय मुंबई, दिनांक ३० मे २०२३ – सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या वेष्टनावर विशिष्ट आरोग्य चेतावणी देण्याबाबत.
    • महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तनिका-२१२३/प्र.क्र-८१/आ-5, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व कार्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत दि. १० जुलै २०२३.
    • महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तनिका-२१२३/प्र.क्र-८5/आ-5, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायद्याच्या, 2003 (COTPA) प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करणेबाबत दि. १० जुलै २०२३.
    • महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. तंबाखू/बैठक-२०२४-प्र.क्र-६६/आ.५-, अनुसार सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण याचे विनियमन) कायदा, २००३ आणि FCTC Article ५.३ चा आढावा, प्रभावी अंमलबजावणी व सनियंत्रण करिता स्थापित राज्यस्तरीय समन्वय समितीच्या कार्यकक्षेचा विस्तार आणि जिल्हास्तरीय समन्वय समिती संरचना व कार्यकक्षेचा विस्तार करणेबाबत दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

     

     

     

     

     

    • कार्यक्रम तपशील:-

     

    .क्र. सन राज्‍यातील तंबाखुमुक्‍त आरोग्‍य संस्‍थांची संख्‍या राज्‍यातील तंबाखु मुक्‍त शाळांची संख्‍या
    1 2020 – 2021 400 1,932
    2 2021 – 2022 2434 5241
    3 2022 – 2023 9672 32496
    4 2023 – 2024  12094  38203
    5 एप्रिल – डिसेंबर 2024 12९५२  45127

     

     

    तंबाखू मुक्‍ती केंद्रामार्फत करण्‍यात आलेली कार्यवाही :-

     

    .क्र. सन राज्‍यातील तंबाखुमुक्‍त केंद्राची संख्‍या नोंदणी झालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या पैकी तंबाखू व तंबाखूजन्‍य पदार्थ सोडलेल्‍यांची संख्‍या
    1 2020 – 2021 41 1,24,792 3,978
    2 2021 – 2022                230 2,43,760 5,911
    3 2022 – 2023                  404 4,00,340 9304
    4 2023 – 2024 410 3,96,826 8673
    5 एप्रिल – डिसेंबर 2024 416 3,14,456 7,197

     

     

    कोटपा कायदा २००३ अंतर्गत कार्यवाहीचा अहवाल –

    (तपशीलराज्‍यातील आरोग्‍य संस्‍था, जिल्‍हयातील अन्‍न व औषध प्रशासन, पोलीस विभाग)

    .क्र. वर्ग तपशील कलम ४ कलम ५ कलम ६ () कलम ६ () कलम ७
    1 2020 – 2021 90,67,325 50,700 2,52,934 4,48,767 2,55,93,021 3,54,12,747
    2 2021 – 2022 1,14,45,148 55,434 7,07,135 5,16,174 3,68,62,911 5,38,27,443
    3 2022 – 2023 73,79,879 3,09,712 6,66,898 50,48,149 1,32,74,479 2,66,79,117
    4 2023 – 2024 49,62,884 90,316 10,96,504 21,45,575 5,80,950 88,76,229
    एप्रिल – डिसेंबर 2024 2434000 ८३७०० 665351 1048856 768794 5000701

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online