राष्ट्रीय वृदधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम (NPHCE)
राष्ट्रीय वृदधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम (NPHCE)
आपणास माहितच आहे की, २००१ च्या जनगणनेनुसार भारतात सुमारे ७.५९३ कोटी लोक ६० वर्षांवरील होते, २००१ च्या जनगणनेनुसार वृध्दांचे प्रमाणे ७.७% एवढे होते. ते २०११ मध्ये ८.६% एवढे झाले व २०१६ मध्ये हे प्रमाण ८.९४% एवढे राहील. पुढील ५ वर्षांनी अशाप्रकारे भारतात ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वृदधापकाळातील असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण सुदधा वाढत आहे. म्हणुन केंद्रशासन व राज्यशासनामार्फत राष्ट्रीय वृदधापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
वृध्दांच्या संख्येत वाढ होणे हे २१ व्या शतकातील प्रगतीचे लक्षण आहे. देशामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ६० वर्षे वय असणाऱ्यांच्या वयामध्ये ८.६% इतकी वाढ झालेली दिसून येते. ६० वर्षे वयाच्या व्यक्तींमध्ये दरवर्षी ३% इतकी वाढ होत आहे. ही वृध्दांची संख्या सन२०५० पर्यंत ३१९ दश लक्ष पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य विषयक, सामाजिक आणि आर्थिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विषयक, सामाजिक आणि आर्थिक सुधारणा करणे आवश्यक आहे.
Longitudinal Ageing Study in India (LASI) Wave 2018-19 च्या सर्वेक्षणानुसार, राज्यामध्ये ६० ते ७४ वय असलेल्या वृध्द नागरीकांची शहरी भागामध्ये १०.१% व ग्रामीण भागामध्ये १३.४% अशी एकूण १२% वाढ झाल्याची दिसून येते.
कार्यक्रमाची उद्दिष्टये –
- वृद्धांना प्राथमिक उपचाराच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक, निदानात्मक व उपचारांची सुविधा देणे. वृध्दांच्या आरोग्याच्या समस्या ओळखुन त्यांचे निरासन करणे.
- वयोवृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आणि कुटुंबातील व्यक्तींना सक्षम बनविणे.
- आवश्यकतेनुसार वृद्ध रुग्णांना रिजनल जिरीऑट्रीक सेंटर किंवा जिल्हा रुग्णालयासाठी संदर्भित करणे.
उपलब्धी –
सदर कार्यक्रम ३४ जिल्हयांत राबविला जात आहे.
अनु क्र. | जिल्हा | वर्ष |
१ | अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम | २०१०-११ |
२ | नंदूरबार, उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग, नाशिक, जालना आणि परभणी. | २०१५-१६ |
३ | अकोला, यवतमाळ, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, लातूर, रायगड, सातारा, पुणे, रत्नागिरी. | २०१७-१८ |
४ | ठाणे, जळगांव, नागपूर, सोलापूर, सांगली, पालघर. | २०१८-१९ |
जिल्हा रुग्णालयात कार्यक्रमांतर्गत देण्यात येणा-या सेवा व सुविधा
- जिरीअॅट्रीक क्लिनीकमध्ये वृदधांना आठवडयातून एक दिवस डेडीकेडेट ओपीडी सुविधा दिल्या जातात. इतर दिवशी जनरल ओपीडी येथे रांग असते.
- जिरीअॅट्रीक वॉर्ड १० खाटा (५ खाटा महिलांसाठी व ५ खाटा पुरुषांसाठी) वृदधांकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २ बेड् स बेडरिडन (अंथरुणाला खिळून) असलेल्या रुग्णांकरीता (Pallative care साठी) राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या विषेशतज्ञांच्या सेवा-सुविधा वृध्द रुग्णांना पुरविल्या जातात.
- प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे जिरीअॅट्रीक (वृध्दांना) सेवा देण्याकरीता शिबीरे आयोजित करुन तेथून संदर्भित केलेल्या वृदध रुग्णांना भरती करण्यात येते.
- जिरीऑट्रीक (वृध्दांच्या) सुविधेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.
कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणा-या सेवा व सुविधा
- प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र स्तरावरुन संदर्भित केलेल्या वृध्द रुग्णांसाठी प्र्रथम संदर्भिय युनिट म्हणून काम केले जाते.
- दर आठवडी एक जेरिअेट्रीक डेडिकेटेड क्लिनिक आयोजित केली जातात. व त्यामध्ये फक्त वृध्द रुग्णांना ओपीडी ची सेवा पुरवली जात आहे.
- कार्यक्रमांतर्गतील वृध्द रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
- आवश्यकतेनुसार वृध्द रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.
- कार्यक्रमांतर्गतील वृध्द रुगणांना समुपदेशनाची सुविधा देण्यात येते.
- आवश्यकतेनुसार वृध्द रुग्णांची तपासणी, चाचण्या व उपचार जिल्हा रुग्णालयात करण्यात येतात.
कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणा-या सेवा व सुविधा
- आठवडयातून एकदा प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जिरिऑट्रीक क्लिनिक चे आयोजन केले जाते व त्यामध्ये वृध्द रुग्णांना सेवा पुरविल्या जातात.
- क्लिनिकमध्ये वृध्द रुग्णांच्या डोळयांची तपासणी (Vision), कानांची तपासणी (Hearing) रक्तदाब तपासणी (BP), छाती तपासणी (Chest) व आवश्यक चाचण्या. उदा.ब्लड शुगर ,ब्लड कोलेस्ट्रोल इ. केल्या जातात.
- आवश्यकतेनुसार वृध्द रुग्णांना जिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयास संदर्भित करण्यात येते.
- प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली औषधी सामान्य उपचाराकरीता वृध्द रुग्णांना पुरविण्यात येतात.
उपकेंद्र केंद्र देण्यात येणा-या सेवा व सुविधा
- सदर कार्यक्रमाबाबत जनजागृती केली जाते. तसेच प्रामुख्याने सकस आहार, नियमित व्यायाम, तंबाखु, धुम्रपान व दारुचे सेवन टाळणे याबाबत समुपदेशन केले जाते.
- Health and wellness clinic द्वारा वृध्द रुग्णांना कर्मचाऱ्यांद्वारे समुपदेशन केले जाते.
जनजागृती करण्यासाठी केलेले उपक्रम
- जिल्हा स्तरावरती १ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृद्धांचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यावेळी वृध्द लोकांच्या शारिरिक, मानसिक प्रकारच्या आजारांवरती जनजागृती तसेच त्यांच्या सर्वसामान्य आजारांवरती तपासण्या तसेच उपचार करण्यात येतात.
- जिल्हास्तरावरती विविध कॅम्पस् घेतले जातात. त्यामध्ये वृध्दांची मधुमेह, उच्चरक्तदाब आजारांची तपासणी केली जाते व त्यांना योग्य ते उपचार पुरविले जातात.
- राष्ट्रीय वृध्दपकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रमाविषयी संदेश देणारा वृत्तपत्रात जनजागृतीसाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत.
- जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, पथनाटय इत्यादी उपक्रम राबविले जातात. रांगोळी स्पर्धा तसेच निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
मनुष्यबळ माहिती
पदनाम | Sanction | Filled | Vacant |
मेडिकल ऑफिसर/फिजिशियन | 34 | 12 | 22 |
स्टाफ नर्स $GNM | 82 | 72 | 10 |
फिजिओथेरपी | 17 | 13 | 4 |
मल्टी रिहॅबिलिटेशन वर्कर | २० | १९ | १ |
भौतिक माहिती (Physical Performance)
S. No. | Care Services provided | 2022-2023 | 2023-2024 | 2024-25 (UP to Dec.24) | |
1 | Elderly persons attended OPD | 702749 | 622912 | 934085 | |
2 | Cases admitted in wards | 33327 | 24778 | 63088 | |
3 | Persons given rehabilitation services | 20669 | 13395 | 46711 | |
4 | Lab. tests performed on elderly | 327152 | 188974 | 581552 | |
5 | Elderly persons provided home based care | 4081 | 4137 | 14999 |
vkfFkZd ekghrh%&
vuq dz- | o”kZ | izkIr vuqnku | [kpZ | VDdsokjh |
1 | 2022 – 2023 | 307.30 | 51.59 | 16.79 |
2 | 2023 – 2024 | 313.30 | १९४.६५ | ६२.१३ |
3 | 2024 – 2025 | 220.05 | 97.90 | 44.48 |
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online