बंद

    राष्‍ट्रीय अंधत्‍व  व दृष्‍टीदोष नियंत्रण कार्यक्रम

    • तारीख : 17/04/2025 -

    राष्‍ट्रीय अंधत्‍व  व दृष्‍टीदोष नियंत्रण कार्यक्रम

    राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम 1976 सालापासून सुरु करण्‍यांत आला आहे. सन 2017 मध्‍ये कार्यक्रमाच्‍या नावात बदल करण्‍यांत आला असून ते राष्‍ट्रीय अंधत्‍व व दृष्‍टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम करण्‍यांत आले आहे. केंद्र शासनामार्फत सन 2015-19 मधील जलद सर्वेक्षणानुसार अंधत्‍वाचे प्रमाण सन २००६-०७  या आर्थिक या वर्षात  1.1 % वरुन सन 2019-20 या आर्थिक 0.36 % इतके झाल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये नमूद केल्यानुसार सन 2025 पर्यंत अंधत्वाचे प्रमाण हे 0.25% पर्यंत कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  मोतिबिंदू शस्‍त्रक्रियेसोबतच डोळयांचे इतर आजारांवर जसे की, काचबिंदू, दृष्‍टीपटल विकार (मधुमेह रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार) लहान मुलांमधील अंधत्‍वावर उपचार करण्‍यावर देखील लक्ष केंद्रीत करण्‍यात आले आहे.

    राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमसाठी केंद्र शासनाकडून 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येत होते. सन 2015-16 पासून 60 टक्‍के केंद्राचा वाटा व 40 टक्‍के राज्‍य शासनाचा वाटा याप्रमाणे अनुदान देण्‍यांत येते.

    कार्यक्रमाची ठळक उद्दिष्टे –

    1. “डोळयांचे आरोग्‍य सर्वांसाठी”हे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी  व्‍यापक सार्वत्रिक नेत्र सेवा देणे.
    2. राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रमाचे बळकटीकरण करुन डोळयांच्या आजाराबाबत उच्‍च दर्जाच्‍या सेवा लोकांना देणे.
    3. निदान वउपचाराद्वारे मोतिबिंदु रुग्‍णांचा अनुशेष भरुन काढण्‍यासाठी जास्‍तीच्‍या सेवा पुरविणे.
    4. राज्‍यातील सर्व जिल्‍हयातील आरोग्‍य संस्‍थांना साधनसामुग्री व तज्ञ व्‍यक्‍तींची नेमणूक करुन रुग्‍णांना सेवा देणे.
    5. कार्यक्रमात अशासकीय स्‍वयंसेवी संस्‍थांना व खाजगी डॉक्‍टरांना समाविष्‍ट करुन डोळयांचे आजारावरील सेवा पुरविणे.
    6. सामान्‍य जन माणसात डोळयांचे इतर आजार  (काचबिंदू, मधुमेह रेटीनोपॅथी, व्हिट्रोरेटीनाचे आजार, लहान मुलांमधील अंधत्‍व ) व त्यावरील उपचारांबाबत आरोग्‍यविषयक शिक्षण देवून जनजागृती करणे व  इतर डोळ्यांचे  आजारांबाबत मोफत सेवा पुरविणे.
    7. शालेय विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र  तपासणी करुन दृष्‍टीदोष शोधुन काढणे .
    8. सन 2014-15 पासून 40 + वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींची मोफत नेत्र तपासणी करणे.

     

    कार्यक्रमाची कार्यप्रणाली –

    राज्‍यात कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍याकरीता राज्‍यस्‍तरावर राज्‍य आरोग्‍य सोसायटी (अंनिका) व  सर्व जिल्‍हयात जिल्‍हास्‍तरावर जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी (अंनिका)  स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. केंद्र  शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्‍हा स्‍तरावर अधिकार देऊन जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी (अंनिका) मार्फत कार्यक्रम यशस्‍वीपणे राबविणेबाबतच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत.

    तज्ञ व्‍यक्‍तींना प्रशिक्षण देवून व साहित्‍य सामुग्री पुरवठा करुन कार्यक्रमात सुधारणा करणेस्‍वयंसेवी संस्‍थांचा व खाजगी डॉक्‍टरांचा सहभाग घेऊन डोळयांचे आजारांचे निराकरण करणे. 50 वर्षेवरील सर्वांची तपासणी शिबीरे आयोजित करुन व वाहतूक सेवा देऊन जास्‍तीत जास्‍त अंधत्‍वाचे प्रमाण कमी करणे. शासकीय व स्‍वयंसेवी संस्‍थामार्फत मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया, काच‍बिंदू व इतर नेत्र आजारांबाबत मोफत सेवा पुरविणे. राज्‍यात आजमितीस 6९  नेत्रपेढया, 46 नेत्र संकलन केंद्र, 201 नेत्र प्रत्‍यारोपण केंद्र कार्यरत आहेत. तसेच राज्‍यात 93  शासकीय नेत्र शस्‍त्रक्रियागृह तसेच 88 अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍था  कार्यान्वित आहेत.

     

    योजनेचे उद्दीष्‍ट साध्‍य करणे करीता खालील बाबींकरीता अर्थसहाय्य –

    • या योजनेमध्‍ये ९९ % मोतिबिंदु शस्‍त्रक्रिया IOL वापरून SICS तंत्राद्वारे करण्‍यात येतात.
    • लहान मुलांमध्‍ये व वृध्‍द व्‍यक्‍तींमध्‍ये इतर नेत्र आजाराचीसुध्‍दा काळजी घेण्‍यात आलेली असून, अंधत्‍व येऊ नये म्‍हणून जास्‍तीत जास्‍त भर दिला जाणार आहे. हे उद्दीष्‍ट गाठण्‍यासाठी मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया वाढविणे, जास्‍तीत जास्‍त लोकांना सेवा देणे, आरोग्‍य सेवांचे बळकटीकरणे करणे व जनसहभाग, स्‍वयंसेवी संस्‍था, लोकनियुक्‍त लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन हे उद्दीष्‍ट गाठण्‍यात येणार आहे.
    • शालेय विद्यार्थ्‍यांची नेत्र तपासणी करुन दृष्‍टी दोष आढळून आलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मोफत चष्‍मे वाटप करणे
    • 40 + वर्ष वयोगटातील व्‍यक्‍तींच्‍या डोळयांची तपासणी करुन गरजू व गरीब व्‍यक्‍तींना मोफत चष्‍मे वाटप करणे.
    • मृत्‍यू पश्‍चात दान केलेली बुब्‍बुळे  जमा करुन नेत्र प्रत्‍यारोपण करणे.
    • सार्वजनिक क्षेत्रातील नेत्र रुग्‍णालयांमार्फत अधिकाधिक क्षमतेने सेवा पुरविणेकरीता विविध स्‍तरावरुन मार्गदर्शन व अर्थसहाय्य पुरवणे.
    • राज्यातील सर्व जिल्‍हा रुग्‍णालयात नेत्ररुग्‍ण कक्ष व नेत्र शस्‍त्रक्रिया गृहाची बांधणी करणे.
    • नेत्रतज्ञांना व नेत्र सहाय्यकांना अद्यावत तांत्रिक शिक्षण देणे.
    • जिल्‍हा रुग्‍णालय/ उपजिल्‍हा रुग्‍णालये/ प्राथमिक आरोग्‍य केंद्र तसेच रिजनल इन्‍स्‍टीटयुट ऑफ ऑप्‍थॅल्‍मोलॉजी यांना अदयावत यंत्र सामुग्रीचा पुरवठा करणे तसेच यंत्र सामुग्रीची देखभाल दुरुस्‍ती करणे.

    केंद्र शासनामार्फत विशेष मोहिम   “  राष्ट्रीय  नेत्र ज्योती अभियान माहे जून, २०२२ पासून राबविण्‍यात येत आहे. सदर मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि गंभीर दृष्‍टी क्षीणता (Severe Visual Impairment SVI )  कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्‍य देण्‍यात आले आहे.  मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष भरुन काढणेकरीता केंद्र शासनाकडून  सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या  तीन  वर्षात २७ लक्ष मोतिबिंदु शस्‍त्रक्रियांचे उद्यिष्‍ट देण्‍यात आले आहे.

    कार्यक्रमाची प्रगती

     

    मोतिबिंदू शस्‍त्रक्रिया

    वर्ष वार्षिक उद्दीष्‍ट झालेल्‍या शस्‍त्रक्रिया टक्‍केवारी कृत्रिम भिंगारोपण शस्‍त्रक्रिया  (IOL) कृत्रिम भिंगारोपण शस्‍त्रक्रियेची टक्‍केवारी
    2019-20 455000 704813 १५४ 703569 99
    2020-21 339570 228991 ६७.४४ 226630 99
    2021-22 373510 ५५१०३४ १४७.३३ ५४९८११ 99
    2022-23 776411 ८७३५१३ ११२.५१ ८७२१६७ 99
    2023-24 931815 945733 101.50 944445 99.86
    २०२४-२५

    (डिसेंबर ,  २०२४)

    १०८७००० 751507 6९.१० 747532 99.4७

     

    नेत्रपेढयांचे कार्य –

    वर्ष उद्दीष्‍ट जमा नेत्र पटले बुब्‍बुळरोपण शस्‍त्रक्रिया
    2019-20 7500 6653 3059
    2020-21 5850 1355 847
    2021-22 ६५०० ३१७२ १९४७
    2022-23 ५५०० ४४५६ २४७७
    2023-24 ६००० 5087 2713
    २०२४-२५

    (डिसेंबर,  २०२४)

    ६८०० 3794 2316

     

    • शालेय विद्यार्थ्‍यांची नेत्र तपासणी –
    वर्ष तपासलेले विद्यार्थी दृष्‍टीदोष आढळलेले विद्यार्थी चष्‍मे पुरविलेले विद्यार्थी
    2019-20 3167593 43203 16614
    2020-21 135722 7600 5480
    2021-22 678446 १५२३७ ८६३३
    022-23 5915783 59586 19131
    2023-24

     

    4199029 33700 9694
    २०२४-२५

    (डिसेंबर,  २०२४)

    2819056 21830 3572

     

    • 40 वर्षे वयावरील व्‍यक्‍तींची नेत्र तपाणी व चष्‍मे वाटपाचा अहवाल
    वर्ष 40 वर्षे वयावरील तपासलेले व्‍यक्‍ती वाटप केलेले चष्‍मे
    पुरुष महिला एकूण पुरुष महिला एकूण
    2019-20 60085 71485 131570 10324 10237 20561
    2020-21 20402 22534 42936 1219 1041 2260
    2021-22 ४९१६३ ५५९६८ १०५१३१ १०७१४ ११५१२ २२२२६
    2022-23 99636 122750 219027 30316 33448 63764
    2023-24 121683 138836 267927 81685 89188 170873
    २०२४-२५

    (डिसेंबर,  २०२४)

    252060 285843 537903 56900 47546 104446

     

     

     

     

     

     

     

    Other Eye Diseases

    Sr.No. Name of Diseases 2019-20 2020-21 2021-22 2022-23

     

    2023-24

     

    २०२४-२५

    (डिसेंबर,  २०२४)

    1 Diabetic Retinopathy  with Laser Treatment 5153 855 2368 2875 1882 2444
    2 Glaucoma Medical t/t 11499 3119 5360

    584

    6054 6546 3692
    Surgical t/t 941 351
    3 Childhood Blindness  Cataract surgery 747 211 21250 7218 5100 8661
    4  Glaucoma Medical t/t 68 56  
    Surgical t/t 79 40  
    5 Squint surgery 772 142 394
    6 Retinopathy of Prematurity (ROP) with Laser treatment 1167 485 1437
    7 Retinoblastoma surgery 2 4 19
    8 Congenital  ptosis surgery 64 23 47
    9 Intraocular Trauma in Children management 617 731 1024
    10 Keratoplasty 3059 614 1669 2477 2713 2316
    11 Low Vision Aids 816 96 321 4296 5124 5067
    12 Other OPD 15530 4058 9300 418149 433894 309575
    Total 44705 13986 48731 441069 455259 332612

     

    राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम अर्थसंकल्‍प व खर्च (रुपये लाखात)

    वर्ष मंजुर अर्थसंकल्‍प खर्च उपलब्‍ध निधीवर टक्‍केवारी
    2019-20 2375.40 721.64 30.42%
    2020-21 1802.15 460.29 25.54 %
    2021-22 2449.51 949.11 38%
    202-२३  4062.19 968.46 23.25
    २०२३२४

     

    8084.18 2889.39 35.74
    २०२४-२५

    (डिसेंबर,  २०२४)

    2059.05 641.18 31.17%

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online