राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम
प्रस्तावना –
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये २८ जुलै २०१९ पासून सुरु करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्रे (Model Treatment Center ( MTC ) व 32 उपचार केंद्रे (Treatment Center ( TC ) यांची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर केंद्रामार्फत Hepatitis रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
Hepatitis आजाराचे एकुण ५ प्रकार आहेत. Hepatitis A, Hepatitis B, Hepatitis C, Hepatitis D & Hepatitis E. सदर ५ प्रकारांपैकी Hepatitis B व C हे दोन महत्वाचे प्रकार आहेत. त्यावर निदान व उपचार यासाठी प्रत्येक जिल्हयात एक उपचार केंद्र चालू करण्यात आले आहे.
उदिष्टये –
सर्व केन्द्रामध्ये येणा-या सर्व रुग्णाची Hepatitis B व C तपासणी व उपचार देऊन Hepatitis चा प्रादुर्भाव रोखणे. सन २०३० पर्यंत Hepatitis C च्या आजारावर राज्यात नियंत्रण आणणे, तसेच हिपॅटायटीस रुग्णाचे निदान करणे, संक्रमण थांबवणे, समुपदेशन करणे.
राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत खालीलप्रमाणे आदर्श उपचार केंद्र व उपचार केंद्र कार्यरत आहेत .
- आदर्श उपचार केंद्र (Model Treatment Center (MTC) येथे सामान्य व अति गंभीर अवस्थेतीतील रुग्णास उपचार केले जातात.
अ.क्र. | आदर्श उपचार केंद्र (Model Treatment Centre ) | जिल्ह्याचे नाव |
१ | सायन रुग्णालय व लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय | मुंबई |
२ | बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | पुणे |
३ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | नागपुर |
४ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | छत्रपती संभाजीनगर |
२) उपचार केंद्र Treatment Center (TC) – येथे सामान्य ( गंभीर नसणाऱ्या ) अवस्थेतीतील रुग्णास उपचार केले जातात.
अ.क्र. | उपचार केंद्र ( Treatment Centre ) | जिल्हा |
१ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | धुळे |
२ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | जळगाव |
३ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | सोलापूर |
४ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | कोल्हापूर |
५ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज) | सांगली |
६ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | लातूर |
७ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | नांदेड |
८ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | अकोला |
९ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | चंद्रपुर |
१० | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | यवतमाळ |
११ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | गोंदिया |
१२ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | रायगड |
१३ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | नंदुरबार |
१४ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | सिंधुदुर्ग |
१५ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | धाराशिव |
१६ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | परभणी |
१७ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | रत्नागिरी |
१८ | केइएम रुग्णालय व जीएस वैद्यकीय महाविद्यालय | मुंबई |
१९ | जिल्हा रुग्णालय | ठाणे |
२० | जिल्हा रुग्णालय | अहमदनगर |
२१ | जिल्हा रुग्णालय | सातारा |
२२ | जिल्हा रुग्णालय | बीड |
२३ | जिल्हा रुग्णालय | अमरावती |
२४ | जिल्हा रुग्णालय | बुलढाणा |
२५ | जिल्हा रुग्णालय | वाशिम |
२६ | जिल्हा रुग्णालय | वर्धा |
२७ | जिल्हा रुग्णालय | भंडारा |
28 | जिल्हा रुग्णालय | गडचिरोली |
29 | जिल्हा रुग्णालय | नाशिक |
30 | जिल्हा रुग्णालय | जालना |
31 | जिल्हा रुग्णालय | हिंगोली |
32 | ग्रामीण रुग्णालय | पालघर |
कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा-
Hepatitis B व C ची तपासणी –
- एआरटी उपचारावरील रुग्ण
- High risk Group – Female sex worker (FSW) , Injection Drug uses (IDUs), Male sex with male (MSM), Transgenders , Truckers, Migrants इ.
- Thalassemia उपचारासाठी नियमित रक्ताची गरज असणारे रुग्ण
- डायलिसीस उपचार घेणारे रुग्ण
- Hepatitis B किंवा C Positive रक्तदाते
- शस्त्रक्रिया करण्यात येणारे रुग्ण
- सर्व जिल्हयातील कारागृहामधील कैदी
गरोदर महिलांची तपासणी
सर्व गरोदर मातांची Hepatitis B ची तपासणी करण्यात येते व त्यातील Hepatitis B Positive येणाऱ्या मातेच्या बाळास जन्मानंतर 24 तासाच्या आतमध्ये Injection HBIG व Hepatitis B लसीचा बर्थ डोस देण्यात येतो. जेणेकरून Hepatitis B Positive मातेकडून बाळास होणारा संभाव्य Hepatitis B चा प्रादुर्भाव रोखता येतो.
Hepatitis B चे लसीकरण –
बर्थ डोस
आरोग्य कर्मचारी
High Risk Groups
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
online