प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम-जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
प्रस्तावना :
गरोदर मातांना सेवा देताना असे आढळून आले आहे की, आरोग्य संस्थेपर्यंत पोहचण्यास होणाऱ्या विलंबामुळे मातामृत्यू, उपजत मृत्यू व अर्भक मृत्यू होण्याची संभावना जास्त असते. हे टाळण्याकरीता गरोदर मातांना प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूती पश्चात मोफत सेवा देण्यात आल्यास, तसेच बालकांना एक वर्षापर्यंत आवश्यक त्या सर्व सेवा मोफत पुरविण्यात आल्यास माता-मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल.
उद्देश :
माता-मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करणे हे आर.सी.एच.कार्यक्रमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण ९९ % आहे. शासकिय संस्थांमध्ये प्रसूत होणा-या मातांना औषधे, विविध तपासण्या, प्रसंगी सिझेरियन इत्यादीसाठी लागणारी साहित्य बाहेरुन खरेदी करण्यासाठी तसेच मातेला संदर्भित केल्यानंतर आवश्यक त्या वाहनाची सोय करणे यासाठी संबंधित मातेला किंवा तिच्या कुटूंबियांना खर्च करावा लागतो. पैशा अभावी यामध्ये होणा-या विलंबामुळे प्रसंगी माता-मृत्यू अथवा अर्भक मृत्यू होण्याची संभावना जास्त असते. वरील प्रमाणे होणारे माता-मृत्यू अथवा अर्भक मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यामध्ये कार्यवाही करण्यात येत आहे.
यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार राज्यामध्ये दिनांक २६ सप्टेंबर २०११ च्या शासन निर्णयान्वये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) सर्व जिल्हयांमध्ये दिनांक ७ ऑक्टोबर २०११ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूत होणाऱ्या सर्व मातांना तसेच प्रसूतीनंतर ४२ दिवसापर्यंत व १ वर्षापर्यंतच्या आजारी बालकास सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये संपूर्ण मोफत पुरविण्यात येतात.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी :–
१) मोफत औषधे व इतर साहित्य पुरवठा –
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे माता व १ वर्षापर्यंतच्या आजारी बालकांसाठी लागणाऱ्या औषधांची यादी सर्व जिल्हयांना उपलब्ध करुन दिलेली आहे व त्याप्रमाणे सर्व जिल्हा- महानगरपालिका यांना वार्षिक मागणीनुसार औषधे व इतर साहित्ये यांचा पुरवठा करण्यात येतो.
२) मोफत संदर्भ सेवा –
मोफत वाहतुक सेवेअंतर्गत लाभार्थींनी १०२ व १०८ क्रमांकास फोन केल्यावर प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी नियुक्त केलेला ईएमएस को-ऑर्डिनटर लाभार्थीच्या जवळच्या आरोग्य केंद्रास फोन करुन तेथील रुग्णवाहिका लाभार्थीच्या घरी पाठवितात व लाभार्थीस सुरक्षितरित्या शासकीय आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आणले जाते. त्याप्रमाणे संदर्भसेवेकरिता एका शासकीय रुग्णालयातुन दुस-या शासकीय रुग्णालयात मोफत वाहतुक सेवा दिली जाते. प्रसूती पश्चात, प्रसूत मातेस व बालकास घरी सोडण्यासाठी मोफत वाहतुक सेवा दिली जाते. या प्रकारची सेवा एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकास मोफत दिली जाते.
३) मोफत निदान –
प्रत्येक गरोदर मातेची आवश्यक व एैच्छिक आरोग्य तपासणी ही प्रसूतीपुर्व, प्रसूती दरम्यान व प्रसूती पश्चात – ६ आठवडयापर्यंत मोफत केली जाते, तसेच एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकाचे देखील मोफत निदान केले जाते.
४) प्रसूती झालेल्या मातेस मोफत आहार –
नॉर्मल प्रसूती झालेल्या मातेस ३ दिवस तर सिझेरियन झालेल्या मातेस ७ दिवसा पर्यंत मोफत आहाराची तरतुद केली आहे. या कालावधीत मातेस स्तनपान, आहार व बालकाचे लसीकरण याबाबत समुपदेशन केले जाते.
५)मोफत रक्तसंक्रमण –
गंभीर व गुंतागुंतीच्या प्रसूती दरम्यान आवश्यकते नुसार मोफत रक्त पुरवठा व मोफत रक्तसंक्रमण केले जाते.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था :
उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा व स्त्री रुग्णालय व इतर शासकिय आरोग्य संस्थांमध्ये वरील सुविधा मोफत दिल्या जातात.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत संदर्भसेवा व इतर आरोग्य सेवांचे झालेले कार्य
मोफत संदर्भसेवा वाहतूक (उपकेंद्रे व महानगरपालिका कार्यक्षेञातील संस्थांच्या प्रसूती वगळून)
अ.क्र. | वर्ष | गरोदर व प्रसूती झालेल्या माता | आजारी अर्भक (० ते १ वयोगटातील वर्षे आजारी अर्भक बालके) | ||||
घर ते आरोग्य संस्था | आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था | परत घरी सोडणे | घर तेआरोग्य संस्था | आरोग्य संस्था ते आरोग्य संस्था | परत घरी सोडणे | ||
1 | 2019-20 | 468310 | 184885 | 512508 | 55341 | 25880 | 70781 |
2 | 2020-21 | 441356 | 161398 | 460847 | 67785 | 29806 | 81204 |
3 | 2021-22 | 432044 | 154601 | 457271 | 75694 | 29212 | 89707 |
4 | 2022-23 | 477022 | 163242 | 513880 | 83888 | 27815 | 107773 |
5 | 2023-24 | 305998 | 147036 | 385468 | 41004 | 42764 | 69680 |
6 | 2024-25 माहे फेब्रुवारी २०२५ अखेर | 295761 | 141909 | 368265 | 41236 | 18586 | 68142 |
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत औषधे ,मोफत निदान, मोफत आहार इत्यादी आरोग्य सेवांचे झालेले कार्य
अ.क्र. | वर्ष | गरोदर व प्रसूती झालेल्या माता | आजारीअर्भक (० ते १ वयोगटातील वर्षे आजारी अर्भक बालके) | |||
मोफत औषधे | मोफत आहार दिलेल्या मातांची संख्या | मोफत निदान | मोफत औषधे | मोफत निदान | ||
1 | 2019-20 | 1903755 | 788716 | 1889784 | 161059 | 133468 |
2 | 2020-21 | 1902311 | 633221 | 1905722 | 328617 | 236258 |
3 | 2021-22 | 1956966 | 643289 | 1956401 | 297562 | 180463 |
4 | 2022 -23 | 1953351 | 686799 | 1948565 | 217859 | 174548 |
5 | 2023-24 | १३०९३९९ | ६३६३६३ | ११९०७३० | १४६४७४ | १२४०५२ |
६ | २०२४-२५ माहे फेब्रुवारी २०२५ अखेर | 1739756 | 608476 | 1646598 | 136109 | 112758 |
लाभार्थी:
Citizens
फायदे:
As above
अर्ज कसा करावा
Online