बंद

    राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम

    • तारीख : 17/04/2025 -

    राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम (रा.कु.नि.का.) महाराष्ट्र राज्य

    संक्षिप्त परिचय : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम सन १९५५-५६ साली पाहणी,शिक्षण व उपचार या तत्वावर एक उददेशिय पध्दतीने राबविण्यांत सुरुवात झाली. सन १९८१-८२ पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पध्दती राज्यात टप्प्याटप्प्यात लागू करण्यात येऊन १९९५-९६ सालापर्यंत राज्यातील सर्व जिल्हे या योजनेअंतर्गत आणण्यात आले.त्यामुळे सन १९८१-८२ साली दर दहा हजारी कुष्ठरोगाचे प्रमाण ६२.४० वरुन (३,१२,८७७ उपचाराखालील शिल्लक कुष्ठरुग्ण) सन १९९१-९२ साली १४.७० (१,१८,८६४ उपचाराखालील शिल्लक कुष्ठरुग्ण )  इतके कमी झाले आहे.सन १९८१-८२ मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाचे नाव राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम करण्यात आले.पुढील दशक म्हणजे सन २००१-०२ साली बहुविध औषधोपचार पध्दतीमुळे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले ते दर दहा हजारी कुष्ठरोगाचे प्रमाण ३.२७ (३२,३१८ उपचाराखालील शिल्लक कुष्ठरुग्ण ) इतके  कमी झाले व माहे.फेब्रुवारी २०२५ अखेर दर दहा हजारी कुष्ठरोगाचे प्रमाण १.१९ इतके व १५,३४७ उपचारा खाली शिल्लक कुष्ठरुग्ण आहेत.

    योजनेचे स्वरुप :-

    हा कार्यक्रम केद्रशासन अनुदानीत असून कार्यक्रमाचे सर्वसाधारण आरोग्य सेवेमध्ये एकत्रिकरण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात हा कार्यक्रम राज्य शासन ,जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत राबविण्यात येत आहे.राज्याने जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेले कुष्ठरोग इलिमिनेशनचे ध्येय माहे सप्टेंबर २००५ अखेर साध्य केले आहे (इलिमिनेशन म्हणजे कुष्ठरोगाचे दर दहाहजारी प्रमाण १ पेक्षा कमी आणल्यास कुष्ठरोग ही सार्वजनिक आरोग्य समस्या रहाणार नाही.)

    विभाग संरचना:-

     

    ध्‍येय : शून्य संसर्ग आणि रोग, शून्य अपंगत्व, शून्य कलंक आणि भेदभावासह कुष्ठरोगमुक्त भारत.

    उद्दिष्ट : भारतात कुष्ठरोगाच्या संक्रमणास अडथळा आणण्याच्या दिशेने गती वाढवणे.

    विशिष्ट उद्दिष्टे :

    • नेतृत्व, वचनबद्धता आणि भागीदारी मजबूत करा
    • रुग्‍ण शोधण्याची गती
    • दर्जेदार सेवांची तरतूद
    • रोग, अपंगत्व, कलंक, भेदभाव आणि मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी सुधारित उपाय
    • सर्वेलन्‍स प्रणालीचे डिजिटलायझेशन

    पायाभूत सुविधा :

    .क्र. कार्यरत संस्‍था संख्‍या
    पर्यवेक्षकिय नागरी कुष्‍ठरोग पथक (पनाकुप) २३
    नागरी कुष्‍ठरोग केंद्र २३७
    तात्‍पुरत अंतररुग्‍ण कक्ष (मुंबई ,पुणे नागपूर )
    शासकिय कुष्‍ठरोग दवाखाणे / कुष्‍ठधाम (पुणे कोल्‍हापूर )
    स्‍वयंसेवी संस्‍थेंचे पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केंद्रे
    शासकिय कुष्‍ठरोग प्रशिक्षण केंद्र
    नविन स्‍वयंसेवी संस्‍था योजना २०२४-२५
    ७.१ स्‍वयंसेवी संस्‍था 1
    ७.२ पुर्नवसन सेवा तत्‍वावरील संस्‍था १६
    ७.३ हॉस्‍पीटल सेवा तत्‍वावरील संस्‍था १३

     

     

    राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा

    • बहुविध औषधोपचार पध्दती (एमडीटी) :-

    कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर लक्षणे व चिन्हे यांच्या आधारे वर्गीकरण करणे आवश्यक आहे.कारण त्याच्या आधारेच योग्य औषधाचे नियोजन करणे सोईचे जाते.

    • असांसर्गिक
    • सांसर्गिक
    • चट्टयांची संख्या,बाधित मज्जा व विलेपनाच्या आधारे वर्गीकरण करणे
    अ.क्रं. चिन्हे व लक्षणे असांसर्गिक सांसर्गिक
    चट्टयांची संख्या १ ते ५ चट्टे ५ पेक्षा जास्त चट्टे
    परावर्तीय मज्जा बाधित कोणतीही मज्जा बाधित नाही अथवा १ मज्जा बाधित असणे (चट्टा नसणे अथवा १ ते ५ चट्टे ) १ किंवा १ पेक्षा जास्त मज्जा बाधित असणे
    जंतू परीक्षण जंतूपरीक्षण निगेटीव्ह असणे जंतूपरीक्षण पॉझिटिव्ह असणे
    उपचार कालावधी ६ महिने १२ महिने

     

    १. कुष्ठरोगामध्ये देण्यात येणाऱ्या पीबी व एमबी अशा दोन्‍ही रुग्‍णांना बहुविध औषधोपचारामध्ये खालील तीन संयुक्त औषधांचा समावेश असतो.

    १.रिफाम्पिसिन – १० मि. ग्रॅ. प्रति किलो शरीराचे वजन, महिन्यातून एकदा

    २.क्लोफाझिमाईन – १ मि. ग्रॅ. प्रति किलो शरीराचे वजन , दररोज आणि ६ ग्रॅम प्रति किलो शरीराचे वजन महिन्यातून एकदा

    ३.डॅप्सोन –  २ मि. ग्रॅ. प्रति किलो शरीराचे वजन , दररोज

    नोट- ३१ मार्च २०२५ नंतर निदान झालेल्‍या पीबी रुग्‍णांना सुध्‍दा दि.१ एप्रिल २०२५ पासून  एमबी रुग्‍णांप्रमाणेच तीन संयुक्त औषधांचे उपचार पध्‍दती अवलंबिण्‍यात येणार आहे.

    • विकृती प्रतिबंध व वैदयकिय पुर्नवसन

    १.बधीर पायांना जखमा होवू नये म्हणून वर्षातून दोनदा एम सी आर चप्पल पात्र कुष्ठरुग्णांना मोफत पुरविले  जाते.

    २.डोळयातील विकृतीमध्ये वाढ होवू नये म्हणून गॉगल्स पात्र कुष्ठरुग्णांना मोफत पुरविले जाते.

    ३.हाताच्या बोटांच्या विकृतीमध्ये वाढ होवू नये म्हणून पात्र कुष्ठरुग्णांना स्प्लिंटस पुरविले जातात.

    ४.प्राथमिक आरोग्य केंद्रे,नपा/मनपा दवाखाने,कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रे व स्वयंभू कुष्ठवसाहतीमधील जखमा  असलेल्या कुष्ठरुग्णांवर मोफत उपचार केले जातात.

    ५.सर्व शासकिय/निमशासकिय रुग्णालये,कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्रे व स्वयंभू कुष्ठवसाहतीमध्ये पात्र कुष्ठरुग्णांना विकृती होवू नये किंवा वाढ होवू नये म्हणून मोफत भौतिकोपचार दिला जातो.

    • पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया

    १.सर्व सामान्य रुग्णालये व निवडक स्वयंसेवी संस्थामध्ये पात्र कुष्ठरुग्णांच्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

    २.मोठया पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी रु.१२०००/- प्रोत्साहन भत्ता कुष्ठरुग्णांना दिला जातो.

    ३.प्रत्येक वैदयकिय महाविदयालय यांना रु ५०००/- प्रमाणे प्रति पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया अनुदान दिले जाते.

    ४.ज्या स्वयंसेवी संस्था २० पेक्षा जास्त पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करतील त्या स्वयंसेवी संस्थेला २० शस्त्रक्रियेनंतर रु ५०००/- प्रति शस्त्रक्रिया अनुदान दिले जाते.

    • कुष्ठरोग संदर्भ केंद्र :-

    राज्‍यातील सिव्हिल हॉस्पिटल्स/उपजिल्‍हा रुग्‍णालये/ग्रामीण रुग्‍णालये मध्ये एकूण 277 कुष्ठरोग संदर्भ केंद्र आहेत.

    कुष्ठरोग संदर्भ केंद्र चे मुख्य उद्दिष्टे:-

    • कुष्ठरोग आणि रोगामुळे गुंतागुंत असलेल्या (लेप्रा प्रतिक्रिया आणि न्यूरायटीस- उपचारादरम्यान किंवा नंतर उद्भवणारी विकृतीची स्थिती) व्यक्तींना निदान आणि व्यवस्थापनासाठी विशेष सेवा प्रदान करणे.
    • ज्या रुग्णांचे मज्जातंतू बाधित आहेत. अशा व्यक्तींमध्ये विकृती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक सेवा प्रदान करणे.
    • विकृती असलेल्या कुष्ठरोग प्रभावित व्यक्तींमध्ये विकलांगता / वाढती विकृती टाळण्यासाठी विशेष सेवा प्रदान करणे.
    • आरोग्य शिक्षण व जनजागृती

    समाजामध्ये छापील माध्यमे,दृकश्राव्य माध्यमे व सामाजिक माध्यमांद्वारे कुष्ठरोगाविषयी खालील संदेश प्रसारित करण्यात येतात.

    १.कुष्ठरोगाची चिन्हे व लक्षणे

    २.कुष्ठरोगाचे प्रकार

    ३.कुष्ठरोगाविषयी गैरसमज

    ४.कुष्ठरोगाचा उपचार प्रकार व औषधांची उपलब्धता

    ५.कुष्ठरोगावरील औषधे सर्व शासकिय/निमशासकिय रुग्णालये येथे मोफत उपलब्ध आहेत.

    ६.विकृती प्रतिबंध व वैदयकिय पुनर्वसन सेवांची उपलब्धता

    ७.स्वंयसेवक व आशांना मिळणारे प्रोत्साहन भत्ता

    अ) छापील माध्यम क) पारंपारिक माध्यमे
    पोस्टर भिंतीवर संदेश लिहीणे
    बॅनर प्रभात फेरी
    हस्तपत्रिका प्रदर्शन
    निदानात्मक कार्ड शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य शिक्षण
    घडी पत्रिका
    ब) दृकश्राव्य माध्यम ड ) इतर माध्यमे
    रेडिओ जिंगल्स वीटभट्टी,इमारत बांधकाम व मजुर अड्डयावर आरोग्य शिक्षण देणे

     

      

    • पीईपी (Post Exposure Prophylaxis) :-
    • पीईपीचे समावेशन निकष

    १. नवीन आढळून आलेल्‍या कुष्‍ठरुग्‍णाच्‍या सानिध्‍यात तीन महिन्यांपेक्षा जास्त आणि २० तास/आठवडा राहणे/काम करणे/सामाजिक उपक्रम राबविणे अशी व्यक्ती.

    २. वय > २ वर्षे.

    • पीईपीचे विशेष निकष

    १. गर्भवती महिला (पीईपी बाळंतपणानंतर देता येते).

    २. गेल्या दोन वर्षांत कोणत्याही कारणास्तव रिफाम्पिसिन घेतलेले लोक (उदा. क्षयरोग (टीबी) किंवा कुष्ठरोगासाठी किंवा कुष्ठरोगाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीसाठी).

    ३. कुष्ठरोगाची संभाव्य चिन्हे आणि/किंवा लक्षणे असलेले लोक.

    ४. तीव्र तापाचा आजार असलेली व्यक्ती.

    ५. यकृताच्या विकारांचा इतिहास असलेले लोक (कावीळ, उजव्या बाजूला ओटीपोटात वेदना आणि सूज, पाय आणि घोट्यांमध्ये सूज, फिकट रंगाचे मल).

    ६. मूत्रपिंडाच्या विकारांचा इतिहास असलेले लोक (मूत्रपिंड कमी होणे, पाय आणि घोट्यांमध्ये सूज येणे, उच्च रक्तदाब यासाठी विचारा).

    ७. ज्या लोकांना क्षयरोगाची संभाव्य चिन्हे आणि/किंवा लक्षणे आहेत (यापैकी कोणतीही लक्षणे असलेल्या रुग्णांची क्षयरोगासाठी तपासणी करावी: दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, रात्री घाम येणे, अस्पष्ट ताप, वजन कमी  होणे).

    ८. तथापि, कुष्ठरोगासह इतर आजारांची चिन्हे आणि लक्षणे असलेल्या रुग्णांना पुढील व्यवस्थापनासाठी जवळच्या आरोग्य सुविधांमध्ये पाठवले जाऊ शकते.

     

      

    मागील 5 वर्षांची कामगिरी  :

    निर्देशांक 2019-20 2020-21 2021-22 2022-23 2023-24 2024-25 (माहे फेब्रुवारी २०२५ अखेर)
    नविन शोधलेले कुष्‍ठरुग्‍ण 16531 12438 14520 19860 20001 18860
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांचे दर एक लाख लोकसंख्येमागे प्रमाण* 13.07 9.55 11.14 15.58 15.54 15.36
    क्रियाशिल रुग्ण 10203 10417 11607 13088 14976 15347
    कुष्ठरुग्णांचे दर दहाहजार लोकसंख्येमागे प्रमाण 0.81 0.8 0.89 1.03 1.16 1.19
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये मुलांची संख्या 1360 922 1092 1301 1321 1015
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये मुलांचे शेकडा प्रमाण 8.23 7.41 7.52 6.55 6.60 5.38
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये दर्जा-२ विकृती असलेल्या रुग्णाची संख्या

     

    258 160 141 184 138 118
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये दर्जा-२ विकृती असलेल्याचे शेंकडा प्रमाण 1.56 1.29 0.97 0.93 0.69 0.63
    नविन शोधलेल्या कुष्ठरुग्णांमध्ये दर्जा-२ विकृती असलेल्याचे प्रती दहा लाख लोकसंख्येमगिल  प्रमाण 2.04 1.23 1.08 1.44 1.07 0.92

    * माहे मार्च २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या १२ महिण्‍याच्‍या कालावधीत निदान झालेल्‍या नविन कुष्‍ठरुग्‍णांची आकडेवारी वरुन (दर एक लाख लोकसंख्येमागे प्रमाण) एएनसीडीआर दर काढला आहे.

    १) कुष्ठरुग्ण शोध अभियान 

    हे अभियान सन २०१५-१६ पासून राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यास सुरुवात झाली. यामध्ये आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या मदतीने १०० टक्के ग्रामीण भाग व सुमारे ३० टक्के अतिजोखमीचा शहरी भाग यामध्ये घरोघर सर्वेक्षण करुन लोकसंख्येची तपासणी करण्यात येते. यामुळे मोठया प्रमाणात कुष्ठरोगाविषयी जनजागृती निर्माण होवून समाजातील लपून राहिलेले कुष्ठरुग्ण प्राथमिक स्तरावर शोधून त्या सर्वांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात यश आले. सन २०२४-२५ यावर्षी हे अभियान राज्यातील अतिजोखमीच्या २० जिल्‍हयात दि.३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात आली असून या अभियानात ३८२६ नविन कुष्‍ठरुग्‍ण शोधण्‍यात आले व या सर्वांना बहूविध औषधोपचार सुरु करण्यात आला.

    वर्षनिहाय एलसीडीसी अभियानात निदान झालेले कुष्‍ठरुग्‍ण संख्‍या 

    अ.क्र वर्ष एलसीडीसी केसेस एकूण केसेस निवडलेले जिल्हे 
    1 2015-16 166 15695 5
    2 2016-17 4134 15012 16
    3 2017-18 5073 16065 22
    4 2018-19 5268 15299 35
    5 2019-20 6116 16531 35
    6 2022-23 6731 19860 35
    7 2023-24 6744 20001 35
    8 2024-25 (माहे फेब्रुवारी २५ अखेर) 3826 18860 20

    नाविण्‍यापुर्ण योजना :- कुसुम

     कुसूम परिचय  (KuSuM) कुष्‍ठमुक्‍त सुरक्षीत महाराष्ट्र

     

    1. भारत सरकारने शाश्‍वत विकास ध्‍येयाच्या तीन वर्षे अगोदर, 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्याचे ध्‍येय ठेवले आहे.
    2. शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्यासाठी प्रथम संपूर्ण समाजातील सर्व लपलेले कुष्ठरुग्‍ण शोधणे आवश्यक आहे.
    3. सक्रिय कुष्ठरोगाच्या शोधासाठी दुर्लक्षित गटांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे जसे की वीटभट्टीची ठिकाणे, स्थलांतरित लोक, बांधकाम साइट्स, शारीरिक/मानसिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा, रात्र निवारा, खाणी, इतर औद्योगिक कामगार इ.
    4. बहुतेक वेळा उपेक्षित गट सकाळी लवकर कामावर जातात आणि संध्याकाळी उशिरा घरी परततात आणि त्यामुळे ते नियमित आरोग्य तपासणी चुकवतात आणि एलसीडीसी अभियानात देखील यांची तपासणी होवू शकत नाही.
    5. कुष्ठरोगाचे लवकर निदान करण्यासाठी सध्या उपेक्षित गटांसाठी कोणतेही विशेष उपक्रम नाहीत
    6. उपेक्षित गटांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.
    7. उपेक्षित गटांची तपासणी, दैनिक अहवाल, डेटाचे विश्लेषण आणि अभिप्राय.

      

     

    • कुसूम (KuSuM) कुष्‍ठमुक्‍त सुरक्षीत महाराष्ट्र २०२३२४
    अ.क्र. अती जोखमीचा भाग एकुण संख्‍या एकुण नोंदणी लोकसंख्‍या शारिरिक तपासणी केलेली लोकसंख्‍या % शोधलेले संशयित रुग्‍ण तपासलेले संशयित रुग्‍ण % एकुण निदान झालेले रुग्‍ण कुष्‍ठरुग्‍णांपैकी ग्रेड २ चे एकुण रुग्‍ण
    एमबी पीबी एकुण
    1 विटभटटी   कामगार 7460 224453 212984 95 2766 2766 100 128 230 358 1
    2  आश्रम शाळा 1971 519029 476060 92 2847 2834 100 18 140 158 0
    3 स्थलांतरीत लोक 16164 406471 332064 82 2005 2003 100 55 80 135 2
    4 आश्रम शाळा वसतीगृहे 983 180880 162683 85 779 779 100 4 47 51 0
    5 कारागृहे 49 39333 35726 91 206 202 98 16 33 49 0
    6 खाण कामगार 908 60910 57176 94 361 361 100 11 13 24 0
    7 इतर अती जोखमीची ठिकाणे 3193 148103 126359 85 512 512 100 44 30 74 0
    महाराष्ट्र 30728 1579179 1403052 89 9476 9457 99.7 276 573 (67.5%) 849 3
    • कुसूम (KuSuM) कुष्‍ठमुक्‍त सुरक्षीत महाराष्ट्र २०२४२५
    अ.क्र. अती जोखमीचा भाग एकुण संख्‍या एकुण नोंदणी लोकसंख्‍या शारिरिक तपासणी केलेली लोकसंख्‍या % शोधलेले संशयित रुग्‍ण तपासलेले संशयित रुग्‍ण % एकुण निदान झालेले रुग्‍ण कुष्‍ठरुग्‍णांपैकी ग्रेड २ चे एकुण रुग्‍ण
    एमबी पीबी एकुण
    1 विटभटटी   कामगार 7303 261525 256402 98.0 5907 5836 98.8 96 195 291 0
    2  आश्रम शाळा 1999 580643 570704 98.3 9369 9268 98.9 16 117 133 0
    3 स्थलांतरीत लोक 22050 600188 579157 96.5 7879 7650 97.1 133 200 333 2
    4 आश्रम शाळा वसतीगृहे 1245 232119 207940 89.6 3241 3186 98.3 10 36 46 0
    5 कारागृहे 49 40103 31713 79.1 368 368 100 13 31 44 0
    6 खाण कामगार 964 55713 51570 92.6 1060 1060 100 8 17 25 0
    7 इतर अती जोखमीची ठिकाणे 1375 201639 200477 99.4 3969 3880 97.8 59 91 150 0
    महाराष्ट्र 34985 1971930 1897963 96.2 31793 31248 98.3 335 687 (67.2) 1022 2

    लाभार्थी:

    Citizens

    फायदे:

    As above

    अर्ज कसा करावा

    Online