बंद

    प्रजनन व बाल आरोग्‍य (आरसीएच पोर्टल)

    • तारीख : 01/01/2011 -

    प्रजनन व बाल आरोग्‍य (आरसीएच पोर्टल)

    (पुर्वी मदर अॅण्‍ड चाईल्‍ड ट्रॅकींग सिस्टिम सॉफटवेअर)

    (ए)  पार्श्‍वभुमी  –

    प्रजनन व बाल आरोग्‍य (आरसीएच पोर्टल) हे राष्‍ट्रीय प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत इंटरनेटवर आधारीत माहिती भरण्‍याचे सॉफटवेअर आहे. जननक्षम जोडपी, गरोदर माता व बालकांना दर्जात्‍मक आरोग्‍य सेवा पुरविण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच, त्‍यांना दिलेल्‍या सेवा नोंदीची माहिती अदयावत ठेवून आरोग्‍य सेवांचा पाठपुरावा करण्‍यासाठी सदर प्रकल्‍पाची अमलबजावणी महाराष्‍ट्र राज्‍यात जानेवारी २०११ पासुन केंद्रशासनाच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंञालय भारत सरकार यांच्‍या सुचनेनुसार करण्‍यात येत आहे. केंद्रसरकारने सदरचा प्रकल्‍प हा नॅशनल ई-गव्‍हर्नन्‍स प्‍लॅनच्‍या अंतर्गत मिशन मोड प्रकल्‍प म्‍हणुन घोषीत केला आहे. ग्रामिण आणि शहरी अशा दोनही ठिकाणी याबाबत अमलबजावणी करण्‍यात येत आहे.

    आरसीएच पोर्टल हे एमसीटीएस पोर्टलचे अदयावत व्‍हर्जन आहे. केंद्रशासनाच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंञालय भारत सरकारने सदर सॉफटवेअर स्विकारले आहे व हे राष्‍ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, नवि दिल्‍ली यांच्‍या राष्‍ट्रीय सर्व्‍हरवर कार्यान्वित आहे. सदर सॉफटवेअरची अंमलबजावणी संपुर्ण देशभरात होऊन सर्व राज्‍यांकडून समान माहिती गोळा केली जात आहे.

    (बी)  उद्देश आणि  उदिदष्‍टे

    उद्देश –  प्रजनन व बाल आरोग्‍य पोर्टल प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून गरोदर माता व बालके यांना दिलेल्‍या सेवांची नोंदणी व पाठपुरावा करुन माता मृत्‍यू व अर्भक मृत्‍यू दर कमी करण्‍यासाठी प्रभावी नियंञण करणे हा या प्रकल्‍पाचा उददेश आहे.

    उदिदष्‍टे-

              नावावर आधारीत लाभार्थ्‍यांचा आरोग्‍य सेवा विषयक पाठपुरावा करणे.

              १) पाञ जननक्षम जोडपी नोंदणी व गर्भनिरोधक साधनांचा वापराची नोंद व पाठपुरावा

    2) गरोदर माता- प्रसूतीपूर्व, प्रसूती व प्रसूतीपश्‍चात सेवांची नोंदणी व अदयावतीकरण

    3) बालक- लसीकरण सेवा नोंदी व अदयावतीकरण

    संनियंञण सेवा-

              1) जननक्षम जोडप्‍यांचा गर्भनिरोधक साधनांचा उपयोग / उपलब्‍धतेची नोंद पाठपुरावा व

    नसबंदी सेवांची तरतूद

    २) गरोदर मातांची वेळोवेळी तपासणीची नोंद व जरुरीच्‍या आवश्‍यक आरोग्‍य सुविधांचे नियंञण

    ३) गरोदर माता व बालकांचे संपुर्ण लसीकरणाची नोंदणी

    4) सेवेपासून वंचित राहीलेल्‍या बालकांचा पाठपुरावा व सेवा दिलेल्‍याची नोंदणी

    ५) आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये सुरक्षित प्रसुती प्रोत्‍साहन व नोंदणी

    (सी)  व्‍याप्‍ती-

    महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व ग्रामिण व शहरी भाग यांचा आरसीएच पोर्टलमध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे.

    (डी)  भौतिक माहितीचे संकलन-

    गावनिहाय आरसीएच रजिस्‍टर व्‍हर्जन-1 केंद्रशासनाच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंञालय भारत सरकार यांच्‍या सुचनेनुसार तयार करण्‍यात आले आहे व सन 2015-16 पासुन आरसीएच जुने रजिस्‍टर बदलून  सदरचे आवृत्‍ती १.० रजिस्‍टर लागू करण्‍यात आले आहे. राज्‍यस्‍तरीय संगणक प्रणालीमध्‍ये व आरसीएच रजिस्‍टर मध्‍ये माहिती भरण्‍यात येत आहे. आरसीएच रजिस्‍टर व्‍हर्जन-२ केंद्रशासनाच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंञालय भारत सरकार यांच्‍या सुचनेनुसार राज्‍यामध्‍ये लागू करण्‍यात येत असून या आवृत्‍तीमध्‍ये एका लाभार्थ्‍याच्‍या सर्व प्रकारच्‍या नोंदी एका पानावर गोळा करण्‍यात येत आहे.

    (इ)  ऑनलाईन माहितीचे संकलन –

    1. व्हिलेज प्रोफाईल- जनगणनेनुसार लोकसंख्‍या, जननक्षम जोडपी, गरोदर माता व बालके यांचे

    वार्षीक उदिष्‍टे, गावपातळीवर सेवा देणारे कर्मचारी

    1. सेवा देणारे कर्मचारी- आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सेविका2, आरोग्‍य सेवक, आरोग्‍य सेवा परिचारीका,

    आशा कार्यकर्ती, लिंक वर्कर, सीएचव्‍ही, आंगणवाडी सेविका इत्‍यादी

    1. जननक्षम जोडपी- कौटूंबीक आरोग्‍य सर्व्‍हेक्षणानुसार

    ४. गरोदर माता- पाञ जननक्षम जोडपी नोंदणी केलेल्‍यांमध्‍ये प्रसुती चाचणी पॉझीटीव्‍ह

    ५. बालके- लसीकरण सेवा

    (एफ)   माहिती भरण्‍याच्‍या पदधती-

    आरसीएच रजिस्‍टरचा वापर करुन त्‍यामधील डाटा आरसीएच पोर्टलवर ऑनलाइन भरण्‍यात येतो. कम्‍प्‍युटर व इंटरनेट सुविधा उपलब्‍ध आसलेल्‍या केंद्रांवर डाटा एन्‍ट्री करण्‍यात येत आहे. अनमोल ( नॉन – एआयएस म्‍हण्‍जेच नॉन अनमोल इ्ंटरमेडीएट सर्व्‍हर) अॅप्‍लीकेशन राज्‍यामध्‍ये सन २०२३-२४ पासुन राबविणेत येत आहे. अनमोल अॅन्‍ड्रॉईड अॅप्‍लीकेशनचा वापर ऑनलाईन व ऑफलाईन डाटा एन्‍ट्री करणेसाठी करण्‍यात येत आहे. सदरचे अॅप्‍लीकेशन गुगल प्‍ले स्‍टोअर वर उपलब्‍ध आहे. सदरचे अॅप्‍लीकेशन आरोग्‍य सेविका / एमपीडब्‍लयू यांचेव्‍दारे डाउनलोड केले जाउ शकते. सदर अॅप्‍लीकेशनच्‍या वापर करण्‍यासाठी पाञता निकष म्‍हणून आरोग्‍य सेविका / एमपीडब्‍लयू हे त्‍यांच्‍या मोबाईल नंबरसह आरसीएच पोर्टलमध्‍ये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. त्‍यानंतरच आरोग्‍य सेविका / एमपीडब्‍ल्‍यू अनमोल अॅप्‍लीकेशन लॉगइन करणेसाठी पाञ असणार आहे. आरोग्‍य सेविका / एमपीडब्‍लयू यांचा आरसीएच आयडी हा अनमोल अॅप्‍लीकेशनमध्‍ये युझर आयडी म्‍हणून असणार आहे. आरसीएच पोर्टलमधील सर्व निर्देशांक हे अनमोल अॅप्‍लीकेशनमध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आले आहे.  अनमोल अॅप्‍लीकेशन लॉगइन केल्‍यानंतर आरोग्‍य सेविका नोंदणी असलेल्‍या आरोग्‍य केंद्राचा डाटा अनमोल अॅप्‍लीकेशनव्‍दारे डाउनलोड करण्‍यात येतो. ऑनलाईन व ऑफलाईन दोनही सुविधा यामध्‍ये उपलब्‍ध आहेत. इंटरनेट कनेक्‍टीव्हिटी उपलब्‍ध असताना डेटा वेळोवेळी सिंक करणे आवश्‍यक आहे, अनमोल अॅप्‍लीकेशनव्‍दारे डेटा आपोआप आरसीएच पोर्टल सर्व्‍हरवर अदयावत होतो.

    (जी)  माहिती भरण्‍याच्‍या पदधती-

    आरसीएच पोर्टल वापरण्‍यासाठी खालील पदधतींचा अवलंब करण्‍यात येतो.

    • इंटरनेट ब्राउझरचा वापर करुन आरसीएच पोर्टल वेबसाईल ओपन करणे.
    • आरसीएच पोर्टल युझर्सव्‍दारे लॉगईन आयडी व पासवर्डच्‍या मदतीने पोर्टल लॉगइन करण्‍यात येते, युझर्स यांचे मोबाईल नंबरवर ओटीपी प्राप्‍त होणार आहे.
    • पोर्टल लॉगईन झाल्‍यावर सुरवातीला प्रत्‍येक वेळी कोणत्‍याही नवीन सुचना परीपञके पोर्टलवरील नोटीसबोर्डवर पाहण्‍यात येते.
    • आरोग्‍य सेविका व आशा यांच्‍या आरसीएच पोटलमध्‍ये नोंदणी अदयावत माहितीसह पुर्ण करुन व काही बदल आसल्‍यास माहिती नियमितपणे अदयावत करण्‍यात येते. आरोग्‍य सेविका, एमपीडब्‍ल्‍यू व आशा यांची बदली झाल्‍यास पोटलमध्‍ये एका सेंटरवरुन दुस-या सेंटरवर बदलीकरणे बाबतची तरतूद उपलब्‍ध आहे.
    • डेटा एन्‍ट्री लॉगइन विभागामध्‍ये व्हिलेज प्रोफाईल नोंदणी, सेवा देणारे कर्मचारी नोंदणी, लाभार्थि नोंदणी व देण्‍यात आलेल्‍या सेवांची नोंदणी करण्‍यात येते.
    • डेटा एन्‍ट्री विभागामध्‍ये स्‍थलांतरीत लाभार्थिचा शोध घेतला जाउ शकतो, तसेच केंद्रशासनस्‍तरीय एमसीटीएफसी विभागाव्‍दारे आरसीएच पोर्टलमधील नोंदणीकृत लाभार्थि व सेवा पुरवणारे कर्मचारी यांच्‍या मोबाईलवर फोन करुन डेटा पडताळणी केली जाते.
    • अहवाल विभागामध्‍ये विविध प्रकारचे अहवाल उपलब्‍ध आहेत.

    (एच)   आरसीएच पोर्टलची कार्यप्रणाली-

    1) लाभार्थि सेवेची प्रत्‍येक माहिती आणि भूतपुर्वसेवा मिळाल्‍याची माहिती आरसीएच रजिस्‍टर मध्‍ये नोंदविली आहे याबाबत खाञी करण्‍यात येते.

    २) आरसीएच पोर्टलमध्‍ये जिल्‍हास्‍तरापासुन ते गावस्‍तरापर्यंत योग्‍य मॅपींग झाली आहे याबाबत सुनिश्‍चीत करण्‍यात येते.

    ३) आरोग्‍य सेविका, आशा आणि आंगणवाडी सेविका यांचे योग्‍य आरोग्‍य केंद्र व गावस्‍तरावर आरसीएच पोर्टलमध्‍ये मॅपिंग केली जाते.

    ४) डेटा एन्‍ट्री फॉर्ममधील लाल स्‍टार मध्‍ये नमुद केलेले सर्व निर्देशांक माहिती भरणे अनिवार्य आहे. आरसीएच रजिस्‍टरमधील डेटा आरसीएच पोर्टलमध्‍ये नोंदविणे अनिवार्य आहे.

    ५) आरसीएच पोर्टलमध्‍ये संबंधीत कार्यक्षेञातील लाभार्थ्‍यांची नोंदणी करण्‍यापुर्वी प्रोफाईल नोंदणी करणे आवश्‍यक आहे. गाव/आरोग्‍य केंद्र यांची प्रोफाईल माहिती भरल्‍याशिवाय आरसीएच पोर्टलमध्‍ये इतर कोणत्‍याही प्रकारची माहिती भरता येणार नाही. सदर गाव/आरोग्‍य केंद्र प्रोफाइल माहिती वर्षातून एकच वेळा भरायची आहे व ती वर्षभरात कधीही अदयावत करता येणार आहे.

    ६) पाञ जननक्षम जोडपी वयमर्यादा १५ ते ४९ वर्ष व बालकांसाठी वयमर्यादा ० ते ५ वर्ष आहे.

    ७) गरोदर मातांची थेट नोंदणी करण्‍याकरीता आरसीएच पोर्टल परवानगी देते नाही आणि  या‍करीता गरोदर माताची प्रथम पाञ जननक्षम जोडपी विभागामध्‍ये नोंदणी करावी व गर्भधारणा दाखविण्‍यासाठी गर्भधारणा होय पर्याय म्‍हणुन आरसीएच पोर्टल मध्‍ये निवडण्‍यात येते.

    ८) पाञ जननक्षम जोडपी, नोंदणीकृत झाल्‍यानंतर १२ अंकी आरसीएच आयडी गरोदर मातेच्‍या  गरोदर पणामध्‍ये तोच राहणार आहे.

    9) गरोदर मातेची सर्व प्रकारची माहिती जसे गरोदर माता नोंदणी, वैदयकीय माहिती विभाग, एएनसी विभाग, प्रसुती विभाग, पीएनसी विभाग, बालक नोंदणी विभाग अंतर्गत व्‍हॅलीडेशन तपासणीचा समावेश आहे.

    १०) गर्भपात नोंदणी झाल्‍यानंतर किंवा गरोदर मातेची पीएनसी पुर्ण झाल्‍यानंतर तिला पुनश्‍च नोंदणीव्‍दारे (रिरजिस्‍ट्रेशनव्‍दारे) तोच आरसीएच आयडीसह जननक्षम जोडपीमध्‍ये नोंदणी करण्‍यात येते.

    ११) आरसीएच पोर्टलमध्‍ये प्रसुती दिनांक नमुद करुन बालकाची नोंदणी केल्‍यानंतर बालकाचा 12 अंकी स्‍वतंञ आरसीएच आयडी प्राप्‍त होतो आणि बालक लसीकरण सेवा विभागामध्‍ये लसीकरण ट्रॅकींग करणेकरीता याचा उपयोग होतो.

    १२) पाञ जननक्षम जोडप्‍यांचे केस बंद, मृत्‍यू, नसंबंदी, वयोमर्यादा इत्‍यादी बाबत निवड करणेकरीता पर्याय उपलब्‍ध आहेत, गरोदर मातेचा मृत्‍यू झाल्‍यास वय मर्यादा, प्रसूतीपश्‍चात नसबंदी इत्‍यादी बाबत उपलब्‍ध पर्यायाव्‍दारे माहिती भरता येणार आहे.

    (आय)  संगणकाव्‍दारे 12 अंकी आयडी तयार करणे –

    आरसीएच पोर्टलवर नविन लाभार्थि नोंदविल्‍यानंतर प्रत्‍येक लाभार्थिसाठी स्‍वतंञ आरसीएच आयडी तयार केला जातो. सुरवातीला 12 आंकी आरसीएच आयडी पत्‍नीकरीता तयार केला जातो जेंव्‍हा ती पाञ जननक्षम जोडपी मध्‍ये नोंदविण्‍यात येते व तिची गरोदर माता विभागामध्‍ये नोंदणी झाल्‍यानंतर पोर्टलव्‍दारे आपोआप तोच 12 आंकी आयडी तिला प्राप्‍त होतो. गरोदर मातेची त्‍वरीत प्रसुती अदयावतीकरण केल्‍यानंतर बालकाचा स्‍वतंञ 12 आंकी आयडी तयार केला जातो. १२ अंकी आयडीची सुरवात १ ने झाल्‍यास तो गरोदर मातेचा व २ ने सुरवात झाल्‍यास तो बालकाचा समजण्‍यात येतो, यामधील पुढील 2 आंक हे राज्‍याचा कोड दर्शवितो व उर्वरीता 9 आंकी क्रमांक हा तो लाभार्थ्‍याचा क्रमांक म्‍हणुन ओळखला जातो. संगणक प्रणाली मधील डाटाबेसमध्‍ये लाभार्थ्‍याचा पाठपुरावा करण्‍यासाठी १२ आंकी युनिक आयडी हा आरसीएच पोर्टलप्रणालीमधील सर्वात महत्‍वाचा भाग आहे.

    (जे)    ट्रॅकींग प्रणाली –

    आरसीएच पोर्टलप्रणालीमध्‍ये खालील तीन विभागाचा समावेश केला जातो.

    1) लाभार्थि –  आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी व सेवेपासुन वंचित राहील्‍यास

    २) सेवा देणारे कर्मचारी – देण्‍यात आलेल्‍या सेवेच्‍या अहवाल

    ३) आरसीएच पोर्टल युझर्स – आरोग्‍य केंद्र / उपकेंद्र स्‍त्‍ारावरील लॉगइन आयडी वापर

    लाभार्थि ट्रॅकींग करण्‍यासाठीच विविध टप्‍पे खालीलप्रमाणे नमुद आहेत.

       (के)    नविन नोंदणी-

    नविन लाभार्थि ( जननक्षम जोडपी नोंदणी व गर्भनिरोध पध्‍दतीचा वापर व नसबंदी शस्‍ञक्रीया), ( गरोदर माता नोंदणी व एएनसी सेवा, प्रसुती सेवा, पीएनसी सेवा व बालके लसीकरण सेवा अदयावतीकरण) इत्‍यादी करीता ऑनलाईन आरसीएच पोर्टलमध्‍ये नोंदविण्‍याकरीता व त्‍यांना ओळखण्‍याकरीता 12 आंकी आरसीएच आयडी प्राप्‍त होतो.

    ए) आरोग्‍य सेवा पुरविणारे कर्मचारी व आशा यांची निवड-

    आरसीएच पोर्टलमध्‍ये लाभार्थि नोंदणीच्‍या वेळी आरोग्‍य सेवा देणारे कर्मचारी यांचे नाव ( जसे आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सेविका2, एमपीडब्‍ल्‍यू, लिंक वर्कर, आरोग्‍य परिचारीका, सीएचव्‍ही) यांचेव्‍दारे प्रत्‍येक लाभार्थ्‍यांना देण्‍यात आलेल्‍या सेवेनुसार यांची निवड केली जाते.

    बी) आरीएच आयडी रजिस्‍टरमध्‍ये नोंदणी व लाभार्थिंना कळविणे-

    लाभार्थिची नोंदणी केल्‍यानंतर पोर्टलवर १२ आंकी आरसीएच आयडी प्राप्‍त होतो, एएनएम/ युझर्स यांनी लगेचच आरसीएच रजिस्‍टरवर लाभार्थि नावासमोर सदरचा आयडी लिहून ठेवावा व नंतर संबंधीत आरोग्‍स सेविकाव्‍दारे लाभार्थि एएनसी नोंदणी कार्ड व लसीकरण कार्डवर नमुद करावा. संबधीत लाभार्थ्‍याला सदरचा आयडी एएनएम व्‍दारे किंवा पोर्टलव्‍दारे कळविला जाउ शकतो.

    सी) डयू सेवाबाबतचे वर्कप्‍लॅन काढणे-

    ला‍भार्थि नोदणीनंतर आरसीएच पोर्टलमधील डाटा एन्‍ट्री विभागातील लॉगइनव्‍दारे लाभार्थिनिहाय मासिक डयू सेवाबाबतचे वर्कप्‍लॅन एएनएमव्‍दारे काढण्‍यात येतील व ते आशा यांना कळविण्‍यात यावे. सदर वर्कप्‍लॅनचा उपयोग कार्यक्षेञामधील लाभार्थि ट्रॅक करण्‍यातकरीता करणे आपेक्षीत आहे. लाभार्थिचा मोबाईलनंबर आरसीएच पोर्टलमध्‍ये नमुद करणे अनिवार्य असून याचा वापर लाभार्थिंनी कार्यक्षेञाबाहेर घेण्‍यात आलेल्‍या सेवांची माहिती घेतल्‍याबाबत जानून घेण्‍यासाठी होउ शकतो. देण्‍यात आलेल्‍या सेवेबाबतची तारखेसहीत माहिती वर्कप्‍लॅनमध्‍ये नोंवदवून डाटा एन्‍ट्री करणेसाठी सदरचे वर्कप्‍लॅन वापस देणे आवश्‍यक आहे. डयू सेवा वर्कप्‍लॅन माहिती प्रत्‍येक बाहय सञांमध्‍ये योग्‍य सेवा देण्‍यासाठी वापरण्‍यात येते.

    डी) देण्‍यात आलेल्‍या सेवांचे अदयावतीकरण-

    आरोग्‍य सेवा व इतर संबंधीत निर्देशांक अदयावत करण्‍यासाठी लाभार्थि जिल्‍हयामध्‍ये नावाने व राज्‍यामध्‍ये आयडीव्‍दारे ट्रॅक केला जाउ शकतो.  लाभार्थि नोंदणी क्रमांकाच्‍या मदतीने तसेच पोर्टल डेटाबेसमधील नोंदणीकृत इतर माहितीच्‍या आधारावर ट्रॅक केला जाउ शकतो.

    इ) लाभार्थि व आरोग्‍य सेविकांना एसएमएसव्‍दारे अदयावत करणे-

    लाभार्थि नोंदणीनंतर त्‍वरीत पोर्टलव्‍दारे लाभार्थि व आरोग्‍य सेविका यांच्‍या नोंदणीकृत मोबाईलवर आरसीएच आयडी पाठविला जातो.

    (एल)    अहवाल  व संनियंञण –

    ए ) नोंदणी अहवाल- लाभार्थि नोंदणीचे दररोज संनियंञण करणे आवश्‍यक आहे. कार्यक्षेञातील सर्व लाभार्थिंची आरसीएच पोर्टलमध्‍ये नोंदणी करणे आवश्‍यक असून याव्‍दारे प्राप्‍त 12 आंकी आरसीएच आयडी सर्व लाभार्थिंना दिला असल्‍याची खाञी केली जाते.

    बी) सेवा अदयावतीकरण अहवाल- गरोदर मातांना देण्‍यात येणा-या एएनसी, प्रसुती व पीएनसी सेवा यावर लक्ष ठेवण्‍यासाठी व प्रत्‍येक महिण्‍याला बालकांच्‍या डयू सेवा बाबतची लसीकरण माहिती अदयावत करणे करीता याचा उपयोग होणार आहे. लाभार्थिचा सर्व सेवा बाबतची माहिती आरसीएच रजिस्‍टरमध्‍ये नमुद केल्‍यानंतर लगेचच आरसीएच पोर्टलमध्‍ये नियमितपणे अदयावत होत आहे याबाबतची खाञी केली जाते.

    सी) वर्कप्‍लॅन डाउनलोड- योग्‍य प्रकारच्‍या आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी एएनसी,  प्रसुती, पीएनसी,  अर्भक व बालके लसीकरण,  आरोग्‍य केंद्रनिहाय, आरोग्‍य सेवा देणारे कर्मचारी निहाय व लाभार्थिनिहाय वर्कप्‍लॅनचा सुक्ष्‍म नियोजनासाठी उपयोग होतो.

    लाभार्थि डयू सेवाबाबत पाठपुरावा करण्‍यासाठी आरोग्‍य सेविका व आशा यांना डयू सेवाबाबतचे वर्कप्‍लॅन प्रिंट आउट देण्‍यात येते. युझर्सव्‍दारे आरोग्‍य केंद्राचे लॉगइन वापरुन वर्कप्‍लॅन डाउनलोड करण्‍यात येतो.

    डी)  डॅशबोर्ड अहवाल- डॅशबोर्ड वर माता व बालक फॅक्‍टशिट अहवाल तसेच निर्देशांकनिहाय अहवाल टॅबूलर व ग्राफीकल स्‍वरुपात उपलब्‍ध आहे. सदरचे अहवाल क्‍वॉलीटेटीव्‍ह (गुणात्‍मकता) दर्शवितात,सदर डेटा नियमितपणे तपासण्‍यात येतो.

    इ) ट्रॅकींग अहवाल- गरोदर मातांकरीता एलएमपी दिनांकानुसार व बालकांसाठी जन्‍मदिनांकानुसार तयार करण्‍यात येते. तसेच कमी वजन आसलेल्‍या बालकांचा अहवाल, हिमोग्‍लोबीन 7 ग्रॅम पेक्षा कमी आसणा-या माता व एएनसी दरम्‍यान गुंतागुंत आसलेल्‍या गरोदर मातेंचे अहवाल तयार करण्‍यात येतो.

    एफ)  लक्ष केंद्रीत करण्‍यात आलेल्‍या लाभार्थ्‍यांची यादी- उच्‍च जोखमेच्‍या गरोदर माता, सिव्हिअर अॅनेमीक गरोदर माता, तसेच कमी वजन आसलेले बालके व कमी वयात गरोदरपणा बाबतचे लाभार्थि यादी संनियंञण करणेकरीता आरसीएच पोर्टलमधून प्राप्‍त होतो.

    जी) डेटा व्‍हेरीफीकेशन अहवाल- लाभार्थि, आरोग्‍य सेविका व आशा यांचा मोबाईल नंबर टेलीफोनीक कॉलव्‍दारे तपासण्‍यात येतो, आरसीएच पोर्टलवर कोणतीही चुकीची माहिती आढळल्‍यास त्‍वरीत दुरुस्‍त करण्‍यात येते.

    (एम)  आरसीएच युझर आयडी

    आरसीएच पोर्टल हाताळणारे युझर्स यांचे पासवर्ड १८० दिवसांनंतर मुदत आपोआप संपणार आहे, त्‍यामुळे युझर्स लॉगइन आयडी जिल्‍हास्‍तरावरुन रिसेट केला जातो व युझर्स यांचेव्‍दारे त्‍याच्‍या केंद्राच्‍या लागईन आयडीचा नविन पासवर्ड तयार करण्‍यात येतो.

    (एन)   कॉल सेंटरव्‍दारे डेटा पडताळणी –

    आरोग्‍य सेविका व आशा यांचे मोबाईल नंबर माहिती, ओळख तपशिल व लाभार्थ्‍यांना देण्‍यात येणा-या सेवांबाबतची माहिती गावपातळीवर भरण्‍यात येते व याबाबतची पडताळणी राष्‍ट्रीय व राज्‍यस्‍तरीय कॉलसेंटरव्‍दारे तपासण्‍यात येते.

    (ओ)   आरोग्‍य सेविका व आशा यांच्‍या मोबाईल नंबरचे प्रमाणीकरण –

    प्रमाणीकरण करणे ही एकाच वेळेस करणेबाबतचे कार्य आहे, आरसीएच पोर्टलवर नविन आरोग्‍य सेविका व आशा यांची नोंदणी झाल्‍यानंतर किंवा मोबाईल नंबर बदलल्‍यास याबाबतची पडताळणी करण्‍यात येते.

    (पी) नोटीस बोर्ड –

    केंद्रस्‍तरीय व राज्‍यस्‍तरीय मार्गदर्शक सुचना, पञ, परिपञके, म्‍यान्‍यअल, व्हिडीओ इत्‍यादीबाबत माहिती जनजागृतीसाठी आरसीएच पोर्टलवरील डॅशबोर्ड ये‍थे दर्शविली जातील.

    (क्‍यू)    आरोग्‍य केंद्रांचे आरसीएच पोर्टलमध्‍ये समाविष्‍ट-

    आरोग्‍य सेवा देणारे सार्वजनिक आरोग्‍य केंद्रे – उपकेंद्र, प्रा.आ.केंद्र, ग्रामिण रु, उपजिल्‍हा रु, जिल्‍हा रुग्‍णालय, महिला रु, एमसीएच, महानगरपालिका व नगरपालिका स्‍तरीय केंद्रे आरसीएच पोर्टलवर डेटा नोंदणी करीत आहेत.

    (आर)    पायाभुत सुविधा व मनुष्‍यबळ –

    डाटा एन्‍ट्री करण्‍यासाठी  केंद्रस्‍तरावर आरोग्‍य सेविका/एमपीडब्‍लयू व तालूकास्‍तरीय डाटा ऑपरेटर उपलब्‍ध आहेत. उपलब्‍ध असलेले मनुष्‍यबळ व पायाभुत सुविधा यांचा वापर करण्‍यात येतो. तांञीक सहायासाठी राज्‍यस्‍तरीय आरसीएच पोर्टलसेल, कुटूंब कल्‍याण कार्यालय, पुणे येथे उपलब्‍ध आहे.

     

    (एस)   आरसीएच कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी-

    • रिअल टाईम डाटा एन्‍ट्री- कार्यक्षेञामध्‍ये लाभार्थ्‍यांना देण्‍यात आलेल्‍या सेवांची माहिती दिनांकासहीत 3 दिवसांच्‍या आत आरसीएच पोर्टलमध्‍ये अदयावत करणे आवश्‍यक आहे.
    • आरसीएच पोर्टल डेटाची रिअलटाईम आधारावर कार्यक्षेञामध्‍ये अमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.
    • सर्व पाञ जननक्षम जोडपी, गरोदर माता व बालके यांची आरसीएच पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे, कोणत्‍याही स्‍वरुपातील अनुशेष नोंदणी मोहिमस्‍वरुपात त्‍वरीत करणे आवश्‍यक आहे.
    • कार्यक्षेञामध्‍ये दिल्‍या जाणा-या सेवांची माहिती वर्कप्‍लॅननुसार त्‍या त्‍या महिन्‍यामध्‍ये रिअल टाईम डेटाच्‍या आधारावर अदयावत करण्‍यात येत आहे.
    • लाभार्थि पाठपुरावा करण्‍यासाठी दर महिन्‍याला जिल्‍हा ते उपकेंद्रस्‍तरापर्यंत यादी डाउनलोड करुन ट्रॅकींग करण्‍यासाठी उपयोग करण्‍यात येतो.

    – सिव्हिअर अॅनेमिक गरोदर माता व अतिजोखमेच्‍या गरोदर माता

    – कमी वजन आसलेली बालके

    • खालील बाब नियमितपणे तपासण्‍यात येते

    – सर्व माहितीची नोंदणी व सेवा अदयावतीकरण, लाभार्थ्‍यांचे अचुक मोबाईल नंबर्स व माहिती

    – आरोग्‍य सेविका व आशा कार्यकर्ती यांचे प्रमाणीकरणासहीतचे मोबाईल नंबर्स

    (टी)    वैदयकीय अधिकारी यांचेसाठी प्रमुख मुददे –

    1) आरसीएच पोर्टलबाबत कर्मचारी यांचे प्रशिक्षण व स्‍वताःचे कन्‍सेप्‍ट- सर्व आरोग्‍य कर्मचारी    यांचे आरसीएच पोर्टल रिअल टाईम डेटा अदयावतीकरण व पोर्टल हाताळणेबाबतचे प्रशिक्षण         व मार्गदर्शक सुचना

    २) आरसीएच पोर्टलमध्‍ये सतत डेटा एन्‍ट्री होत आसल्‍याची खाञी करणे-

    • लाभार्थि आढळल्‍यानंतर लवकरात लवकर पोर्टलवर नोंदणी करणे
    • लाभार्थि सेवा दिल्‍यानंतर लगेचच रिअलटाईम पोर्टलवरती लाभार्थि अदयावतीकरण

    ३) आरसीएच पोर्टलमध्‍ये योग्‍य गावामध्‍ये डेटा एन्‍ट्री होत आसल्‍याची खाञी करणे

    ४) उपलब्‍धतेनुसार आरसीएच पोर्टलमध्‍ये लाभार्थ्‍यांना सेवा देणा-या कर्मचारी माहिती

    ५) प्रत्‍येक महिण्‍याला आरोग्‍य केंद्रस्‍तरावर आरोग्‍य कर्मचारीनिहाय वर्कप्‍लॅन डाउनलोड करणे

    ६) आरोग्‍य कर्मचारी यांना वर्कप्‍लॅन प्रिंटआउट देउन त्‍यामध्‍ये माहिती भरुन पोर्टलवर

    अदयावतीकरण.

    ७) सिव्हिअर अॅनेमिक गरोदर माता, अतिजोखमेच्‍या गरोदर माता व कमी वजन आसलेली

    बालके यांच्‍या आरोग्‍य विषयक सेवेचा पाठपुरावा करण्‍यासाठी लाईनलीस्‍टचा वापर

    ८) ऑनलाईन डेटा पडताळणीदरम्‍यान लाभार्थिचा मोबाईल नंबर व इतर माहिती तत्‍काळ

    दुरुस्‍त करणे.

    ९) आरोग्‍य सेविका,एमपीडब्‍लयू यांनी अनमोल अॅप्‍लीकेशनचा वापर करणे.

    १०) आरसीएच पोर्टलवर सेवा देणारे आरोग्‍य कर्मचारी व लाभार्थिंची योग्‍य माहिती अदयावत

    ठेवणे.

     

    (यु) अनमोल अॅप्लिकेशन

    • सध्‍या राज्‍यामध्‍ये अनमोल अॅप्लिकेशनव्‍दारे डाटा एन्‍ट्री करण्‍यात येत आहे. यामध्‍ये ऑनलाईन व ऑफलाईन दोनही स्‍वरुपात डाटा एन्‍ट्री करण्‍याची तरतूद उपलब्‍ध आहे. अनमोल अॅप्लिकेशन गुगल प्‍ले स्‍टोअरवर उपलब्‍ध आहे.
    • अनमोल अॅप्लिकेशनच्‍या वापरासाठी आरोग्‍य सेविका यांचे पाञता निकष हे आरसीएच पोर्टलवर यांचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदणी आसणे आवश्‍यक आहे .
    • युझर आयडी- आरोग्‍य सेविका यांचा आरसीएच पोर्टलवरील आरसीएच आयडी व
    • पासवर्ड- आरोग्‍य सेविका यांचा आरसीएच पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
    • प्रथम एक वेळा लॉगइन झाल्‍यानंतर अनमोल अॅप्लिकेशनव्‍दारे संबंधीत आरोग्‍य सेविका यांच्‍या उपकेंद्राचा डाटा डाउनलोड केला जातो. ऑनलाईन व ऑफलाईन दोनही स्‍वरुपात डाटा एन्‍ट्री उपलब्‍ध आहे.
    • जेंव्‍हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्‍ध असेल तेंव्‍हा अनमोल अॅप्लिकेशवरील भरण्‍यात आलेला डेटा सिंक केला जातो. अनमोल अॅप्लिकेशनव्‍दारे आरसीएच पोर्टल सर्व्‍हरवर आपोआप डेटा अदयावत होतो.

    (व्हि) किलकारी

    • किलकारी कार्यक्रमाचा महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये दिनांक 7 फेब्रुवारी २०२४ रोजी शुभारंभ करण्‍यात आला आहे.
    • किलकारी योजनेअंतर्गत मोफत, साप्‍ताहिक व समयबदध 72 श्राव्‍य (ऑडीओ) मराठी भाषेतील संदेशाव्‍दारे, आरसीएच पोर्टलवरील प्रत्‍येक नोंदणी झालेल्‍या महिलेस व बालकांच्‍या मातेस नोंदणी केलेल्‍या मोबाईल नंबरवर तिच्‍या/बालकाच्‍या आरोग्‍य स्थितीनुसार माहिती देण्‍यात येत आहे.
    • सदर संदेश व विविध माहिती माबाईल फोनव्‍दारे गरोदरपणाच्‍या दुस-या तिमाहीपासुन ते बालक 1 वर्षाचे होईपर्यंत देण्‍यात येत आहे. यामुळे लाभार्थिला आवश्‍यक माहिती व मार्गदर्शन उपलब्‍ध होणार आहे.
    • किलकारी योजनेअंतर्गत मराठी भाषेतील संदेशाव्‍दारे, आरसीएच पोर्टलवरील प्रत्‍येक नोंदणी झालेल्‍या महिलेस व बालकांच्‍या मातेस नोंदणी केलेल्‍या मोबाईल नंबरवर तिच्‍या/बालकाच्‍या आरोग्‍य स्थितीनुसार माहिती देण्‍यात येत आहे.

    लाभार्थी:

    People

    फायदे:

     प्रजनन व बाल आरोग्‍य पोर्टल प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून गरोदर माता व बालके यांना दिलेल्‍या सेवांची नोंदणी व पाठपुरावा करुन माता मृत्‍यू व अर्भक मृत्‍यू दर कमी करण्‍यासाठी प्रभावी नियंञण करणे हा या प्रकल्‍पाचा उददेश आहे. 

    अर्ज कसा करावा

    RCH Portal