मौखिक आरोग्य कार्यक्रम
मौखिक आरोग्य कार्यक्रम
मौखिक आरोग्य ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, त्यामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मौखिक आरोग्याच्या आजारामुळे सौंदर्यास बाधा येऊ शकते, अन्न व्यवस्थित चावता येत नाही. तसेच दातांमध्ये वेदना होऊ शकतात. या सर्वांचा परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर व उत्पादन क्षमतेवर होतो. केंद्र शासनातर्फे राज्यातील ३४ जिल्हयांमध्ये मौखिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याकरीता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे.
मौखिक आरोग्य कार्यक्रमाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
- मुख आरोग्य ज्या घटकांवर अवलंबुन आहे असे घटक (उदा. आरोग्यदायी आहार, मुख स्वच्छतेच्या सवयी, इत्यादी.) विचारात घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे, ग्रामीण व शहरी भागात मौखिक आरोग्य सेवा देणे.
- मौखिक आजाराचे प्रमाण कमी करण्याकरीता मौखिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे. त्यानुसार सर्व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालय येथे मौखिक आरोग्य सेवा सुरु करणे.
- मौखिक आजाराशी संबधित प्रतिबंधात्मक उपाय योजना व सर्व साधारण आरोग्य सेवा यांचे एकीकरण करण्यासाठी विविध आरोग्य कार्यक्रम (उदा. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम, फ्लोरोसीस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम ) यांचा सुयोग्यतेने समन्वय साधणे, याबरोबरच इतर प्रशासकीय विभाग जसे की, शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालविकास इ. विभाग यांचे बरोबर आंतरविभागीय समन्वय साधणे.
- मौखिक आरोग्याबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खाजगी क्षेत्रातील व्यक्ती / संस्थांचा सहभाग घेणे.
मुख आरोग्यासाठी देण्यात येणा-या सेवा
उपकेंद्र
- उपकेंद्रातील नियमित सेवांबरोबर मौखिक आरोग्याबाबत सर्वांना आरोग्य शिक्षण देणे.
- महिना / पंधरवडयातील एका विशिष्ट दिवशी उदा. माता बालसंगोपन दिन या दिवशी मौखिक आरोग्या बाबत चर्चासत्रे आयोजित करणे.
- मौखिक आजाराने बाधीत रुग्णांना प्रा.आ.केंद्र अथवा प्रथम संदर्भ सेवाकेंद्रामध्ये उपचाराकरीता संदर्भीत करणे.
- किरकोळ मौखिक आजारांच्या तक्रारीसाठी वेदनाशामक औषध देणे.
- मौखिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणा-या आरोग्य सेवांच्या माहितीचे जतन करणे.
प्रा.आ. केंद्र
- वैद्यकिय अधिकारी यांच्या कडुन मुख रुग्णांची बाहय रुग्णविभागात तपासणी करणे.
- इतर विभागाच्या मदतीने मुख उपचार शिबीरे आयोजित करणे.
- रुग्णालयांना सादर करण्यात येणाऱ्या अहवालाचे विहित नमुन्यात जतन करणे.
- शाळेतुन संदर्भीत करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सर्व सेवा देणे.
- आवश्यकतेनुसार रुग्णांना प्राथमिक संदर्भ सेवा देणे.
ग्रामीण रुग्णालये
- ग्रामीण रुग्णालये /उपजिल्हा रुग्णालये ही प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रासाठी प्रथम संदर्भ सेवा रुग्णालये म्हणुन असतील.
- सदर विभागाच्या मदतीने मुख उपचार शिबीरे आयोजित करणे.
- विविध विहीत प्रपत्रात अहवाल जतन करणे.
- शाळेतुन संदर्भीत करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या मौखिक आरोग्याबाबतच्या सर्व सेवा देणे.
जिल्हा रुग्णालये
- प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांच्या कडुन संदर्भीत झालेल्या रुग्णांवर उपचार करणे. डेंचर, फ्रॅक्चर रिडक्शन इ. सेवा रुग्णांना गरजेनुसार देणे, साप्ताहिक अथवा मासिक कालावधीमध्ये ऑर्थोडोन्टिस्ट यांची सेवा रुग्णांना देण्याचे नियोजन करणे.
- प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांच्या कडुन प्राप्त होणाऱ्या अहवालाचे एकत्रीकरण करणे.
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांच्या सहाय्याने मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत कार्ये पार पाडणे.
- राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य सेवा देणे.
- राज्यामध्ये १९ जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ३६८ ग्रामीण रुग्णालये, १०१ उपजिल्हा रुग्णालये व २२ स्त्री रुग्णालये आहेत त्यामध्ये एकुण २८८ ठिकाणी डेंटल क्लिनिक कार्यरत आहे व तेथे कंत्राटी अथवा नियमित दंत शल्य चिकित्सक उपलब्ध असून त्यांच्या मार्फत मौखिक आरोग्य तपासणी, समुपदेशन व उपचार इत्यादी सेवा देण्यात येतात.
लाभार्थी:
व्यक्ती
फायदे:
ग्रामिण व शहरी भागात मौखिक आरोग्य सेवा देणे.
अर्ज कसा करावा
राज्यामध्ये १९ जिल्हा रुग्णालये, ८ सामान्य रुग्णालये, ३६८ ग्रामीण रुग्णालये, १०१ उपजिल्हा रुग्णालये व २२ स्त्री रुग्णालये आहेत त्यामध्ये एकुण २८८ ठिकाणी डेंटल क्लिनिक कार्यरत आहे व तेथे कंत्राटी अथवा नियमित दंत शल्य चिकित्सक उपलब्ध असून त्यांच्या मार्फत मौखिक आरोग्य तपासणी, समुपदेशन व उपचार इत्यादी सेवा देण्यात येतात.