बंद

    राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग

    • तारीख : 07/04/2025 -

    आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग स्थापन्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग पुणे येथे स्थापन करण्यात आला.

    सामान्य उदिद्ष्टये :

    1. आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण उपक्रमाचे योग्य प्राधान्यक्रमाने नियोजन.
    2. आरोग्य खात्याअंतर्गत विविध विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण उपक्रमाविषयी सहकार्य व समन्वय साधणे.
    3. राज्याचे आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण बाबात धोरण ठरवून अंमलबजावणी करणे.
    4. राज्याच्या आरोग्य शिक्षण व पसिध्दीबाबत उपक्रमाचे नियोजन, संयोजन करणे व दिशा देणे
    5. आय.ई.सी विषयी फील्ड मध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना IEC पद्धती, माध्यमांचा वापर करण्यासाठी सल्लामसलत, तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन करणे.
    6. राज्यातील आरोग्य सेवेच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य शिक्षण देण्याच्या पध्दती, पध्दतीतंत्र आणि साहित्य निर्मितीबाबत शासकीय योजनांचे संदेश प्रसारण देणे.
    7. आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण कार्याच्या अनुषंगाने शासनाची विविध खाती तसेच आरोग्य विभागांतर्गत सहकार्य व समन्वय निर्माण करणे.
    8. आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारणबाबतचे बाहयसंस्थांच्या मदतीने साकारण्यात येणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे. (उदा.WHO, UNICEF)

    विशेष उदिद्ष्टये :

    1. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिक्षण उपक्रमांचे नियोजन करणे.
    2. आरोग्य शिक्षणासाठी मुद्रित, दृकश्राव्य साधनांची निर्मिती करुन कार्यक्षेत्रात पुरवठा करणे.
    3. राज्यामध्ये जिल्‍हास्‍तरीयआयईसी कक्षामार्फत आरोग्य प्रदर्शनांचे आयोजन.
    4. महाराष्ट्र आरोग्य पत्रिका या मासिकाचे प्रकाशन.
    5. विविध महिला गट आणि युवक गटांसाठी आरोग्य शिक्षण उपक्रमांचे आयोजन.
    6. जिल्हास्तरावरील माहिती शिक्षण व संपर्क कार्यक्रमाचे संनियंत्रण
    7. आरोग्य शिक्षण व जनजागरण मोहिमांचे व्यवस्थापन
    8. राज्यातील आरोग्य शिक्षण प्रकल्प व कार्यक्रमांचा आढावा.
    9. जागतिक आरोग्य दिन, जागतिक लोकसंख्या दिन अशा विविध आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरावर तसेच जिल्हयातील कार्यक्षेत्रात स्थानिक ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आरोग्य शिक्षणाविषयी फिल्म शो सारख्या उपक्रमांचे आयोजन.
    10. विविध आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती देणारे टि.व्ही.स्पॉट, रेडीओ जिंगल, वृत्तपत्र जाहिराती तयार करुन शासकीय योजनांचे संदेश प्रसारण करणे.
    11. डॉ.आनंदीबाई जोशी व वंदनीय बाळासाहेब ठाकरे गौरव पुरस्कार योजनेची अंमलबजावणी करणे.

     

    विशेष कार्यक्रम :

    1. परिवर्तन IEC व्हॅन: IEC मोबईल व्यान चा वापर करून कोविड १९ विषयक कार्यक्रमांच्या जनजागृतीसाठी पाठिंबा देणे. (IEC व्यान मध्ये चलचित्र दाखवण्यासाठी LED असून, जनजागृतीसाठी विविध आरोग्य विषयक संदेश देखील प्रिंट करण्यात आले आहेत.
    2. आरोग्य पत्रिका : राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागातर्फे सन १९८२ मध्ये सुरु करण्यात आलेले आरोग्य शिक्षणासाठीचे मासिक.
    3. महाआरोग्य संवाद वेबसाईट आणि ब्लॉग : QR code च्या माध्यमातून ३० पेक्षा अधिक आरोग्य कार्यक्रमांची माहिती सहजरित्या जनसामन्यांपर्यंत पोहचवणे – सन २०१९ पासून UNICEF च्या सहकार्याने सुरु करण्यात आले.
    4. IEC bureau तर्फे समाजमाध्यमे : Instagram, Twitter, Facebook / Meta च्या माध्यमातून जनजागृती करणे – सन २०१९ पासून UNICEF च्या सहकार्याने सुरु करण्यात आले.
    5. प्रथम श्रेणीत काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि मीडिया ऑफिसर्स यांचे क्षमता बांधणीचे आणि संवाद प्रक्रिये विषयीचे प्रशिक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर कार्यशाळेचे आयोजन (ऑनलाईन आणि ऑफलाईन)
    6. आरोग्य दिवसांविषयी जनजागृतीसाठी आरोग्य दिनदर्शिका : प्रतिबंधात्मक उपाय योजना याविषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य दिन साजरे करणे – सन २०१९ पासून UNICEF च्या सहकार्याने सुरु करण्यात आले.
    7. महा-आरोग्य फिल्म फेस्टिवल – आरोग्य समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी चित्रपट आणि सार्वजनिक संपर्क तंत्रज्ञानाद्वारे नवीन पिढीला नवीन कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि कला आणि हस्तकलेचा आदर वाढवण्यासाठी याची सुरुवात सन २०२२ मध्ये करण्यात आली.
    8. शैक्षणिक विद्यापीठां समवेत उपक्रम – आरोग्य IEC विकसित करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संशोधन, सहयोग आणि योगदान देण्यासाठी नॉन-पेड फेलोशिप ऑफर केली जाते. तसेच, सामाजिक वर्तणूक बदल अभ्यासक्र तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले गेले.
    9. महा-आरोग्य फिल्म फेस्टिवल – आरोग्य समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी चित्रपट आणि सार्वजनिक संपर्क तंत्रज्ञानाद्वारे नवीन पिढीला नवीन कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करून लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि कला आणि हस्तकलेचा आदर वाढवण्यासाठी याची सुरुवात सन २०२२ मध्ये करण्यात आली.
    10. शैक्षणिक विद्यापीठां समवेत उपक्रम – आरोग्य IEC विकसित करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संशोधन, सहयोग आणि योगदान देण्यासाठी नॉन-पेड फेलोशिप ऑफर केली जाते. तसेच, सामाजिक वर्तणूक बदल अभ्यासक्र तयार करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले गेले.
    11. आदिवासी विभागात जनगृती करण्यासाठी उपक्रम – आदिवासी विभागात आरोग्य विषयी जनजागृती घडविण्यासाठी स्थानिक भाषेत (कोरकू) IEC तयार करण्यात आली, जसे कि, रुग्णालयीन प्रसूती, अनिमिया मुक्त भारत, नियमित लसीकरण, कुटुंब नियोजन, NTCP – तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, आणि RNTCP – TB.
    12. Facebook / Meta तर्फे संशोधन करून सादर करण्यात आलेली केस स्टडी ‘‘MahaArogyaIECBureau Government of Maharashtra’ हि ‘meta global case studies’ समाविष्ट करण्यात आली. – महाराष्ट्र शासनातर्फे कोविड १९ साठी उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली असून , सदर campaign च्या माध्यमातून १७ मिलियन लोकांपर्यंत पोहचण्यात यश आले.

     

    1. डेटा पुनर्रचना करण्यासाठी राज्य IEC ई-वेअरहाऊस विकास उपक्रम – 250 ऑडिओ आणि व्हिडिओ फाइल्स, ३० पेक्षा अधिक आरोग्य कार्यक्रमांसाठी क्रिएटिव्ह साहित्य.

     

    आरोग्य शिक्षण शासकीय योजनांचे संदेश प्रसारण साहित्य –

    • विविध आरोग्य कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी घडीपत्रिका, स्टिकर्स, व्हीडीओ फिल्म, टि.व्ही स्पॅाट, पोस्टर्स, फोल्डर्स, होर्डीग, हॅन्डबील.
    • जन्मनोंदणी, लसीकरण, स्तनपान, पोषणआहार, धुम्रपान व तंबाखुचे दुष्परिणाम व किटकजन्य रोग इ. यांच्या घडीपत्रिका.
    • महाराष्ट्र आरोग्य पत्रिका मासिक प्रकाशन
    • पी.व्ही.सी.स्टिकर्स व बॅनर्स
    • फिलप बुक व फिलप चार्ट.
    • गुटका, तंबाखु, स्वाईन फल्यू, प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य, सिकल सेल इ. राष्‍ट्रीय आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत आजारावरील माहितीचे टी.व्ही.स्पॅाट निर्मिती.
    • विविध आजारासंबंधी माहिती  ऑाडिओ व व्हिडिओ सी.डी.
    • आरोग्य प्रदर्शनासाठी उपयुक्त डिस्प्ले, विविध आरोग्य संदेशाचे डिस्प्ले बोर्ड व भित्ती पत्रके.
    • विविध आरोग्य योजनावरील सनपॅक सीटस्  पोस्‍टर्स, आणि फोल्डर्स. लॅमिनेशन पॅनल्स.
    • होर्डिंग्‍ज, सॅमिनेटेड पॅनल द्वारे विविध आरोग्‍य कार्यक्रमांचे संदेश
    • परिवर्तन एक्सप्रेस’ सारख्या फिरत्या वाहनाद्वारे आरोग्य उपक्रमाविषयी जनजागृती.
    • राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध योजनाविषयी मास मिडीया व मिड मिडीया द्वारे जनजागृती.
    • टि.व्ही.स्पॉट व रेडिओ जिंगल निर्मिती.
    • पीसीपीएनडीटी संबंधी  मधुरा हा माहितीपट
    • केंद्र शासन व आयईसी ब्‍युरो, पुणे याद्वारे स्थानिक भाषेत लोककला कार्यक्रम, प्रदर्शने, माहितीपट, आरोग्य मेळे, आंतरव्यक्ती  संवाद मेळावे, मुद्रीत साहित्य निर्मिती

     

    महत्‍वाचे आरोग्‍य दिवस

     

    अ.क्र. महिना दिवस/ कालावधी आरोग्‍य दिन (Health Days)
    1 जानेवारी १२ जानेवारी राष्‍ट्रीय युवा दिन National Youth Day
    ३० जानेवारी कुष्‍ठरोग निवारण दिन World Leprosy Eradication Day
    ३० जानेवारी ते
    १३ फेब्रुवारी
    कुष्‍ठरोग निवारण पंधरवाडा (स्‍पर्श अभियान) Leprosy Eradication Fortnight (Sparsh Campaign)
    2 फेब्रुवारी ४ फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस World Cancer Day
    १० फेब्रुवारी राष्‍ट्रीय जंतनाशक दिन National De-worming Day
    ११ फेब्रुवारी जागतिक रुग्‍ण दिन व जागतिक युनानी दिन World Patient Day & World Unani Day
    १२ फेब्रुवारी प्रजनन आरोग्य जागरुकता दिन Sexual Reproductive Health Awareness Day
    3 मार्च ८ मार्च जागतिक महिला दिन व धुम्रपान विरोधी दिन International Women’s Day & No Smoking Day
    १० मार्च गर्भधारणेतील मधुमेह जागरुकता दिवस National GDM Awareness Day
    १२ ते १८ मार्च जागतिक काचबिंदु सप्‍ताह World Glaucoma Week
    १६ मार्च गोवर लसीकरण दिन Measles Immunization Day
    मार्च दुसरा गुरुवार जागतिक मुत्रपिंड दिन World Kidney Day
    २० मार्च जागतिक मौखिक आरोग्‍य दिन World Oral Health Day
    २१ मार्च जागतिक डाऊन सिंड्रोम दिन World Down Syndrome Day
    २२ मार्च जागतिक जल दिन World Water Day
    २३ मार्च जागतिक हवामान दिन World Weather Day
    २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन World TB Day
    4 एप्रिल १ ते ७ एप्रिल अंधत्‍व प्रतिबंध सप्‍ताह Blindness Prevention Week
    २ एप्रिल जागतिक अॅटिझम (Autism) जनजागृती दिन World Autism Awareness Day
    ७ एप्रिल जागतिक आरोग्‍य दिन World Health Day
    १४ एप्रिल आयुषमान भारत – आरोग्‍यवर्धिणी केंद्र दिन Ayushman Bharat – Health and Wellness Centre Day
    १७ एप्रिल जागतिक हेमोफिलीया दिन World Haemophilia Day
    १९ एप्रिल जागतिक यकृत दिन World Liver Day
    २२ एप्रिल पृथ्‍वी दिन Earth Day
    २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन World Malaria Day
    २४- ३० एप्रिल जागतिक लसीकरण सप्‍ताह World Immunization Week
    5 मे १ मे जागतिक कामगार दिन World Workers’ Day
    ३ मे जागतिक दमा दिन World Asthma Day
    ५ मे जागतिक प्रसविका दिन World Midwifery Day
    ८ मे जागतिक रेडक्रॉस दिन व जागतिक थॅलेसेमिया दिन World Red Cross Day & World Thalassaemia Day
    मे चा दुसरा रविवार मातृत्‍व दिन Mother’s Day
    १२ मे जागतिक परिचारिका दिन व जागतिक दीर्घकालीन थकवा जागरूकता दिवस World Nurses Day & World Chronic Fatigue Syndrome Awareness Day
    १४ मे जागतिक उच्‍च रक्‍तदाब दिन World Hypertension Day
    १५ मे जागतिक कुटुंब दिन World Family Day
    १६ मे राष्‍ट्रीय डेंग्‍यु दिन National Dengue Day
    १९ मे जागतिक फॅमिली डॉक्‍टर दिन World Family Doctor Day
    २५ मे जागतिक मल्‍टीपल स्क्लेरोसिस दिन World Multiple Sclerosis Day
    २८ मे आंतरराष्‍ट्रीय महिला आरोग्‍य दिन व मासिक पाळी स्‍वच्‍छता दिन  International Women’s Health Day & Menstrual Hygiene Day
    २८ मे ते ८ जुन अतिसार नियंत्रण पंधरवाडा Intensified Diarrhoea Control Fortnight
    ३१ मे जागतिक तंबाखु विरोधी दिन World Anti-Tobacco Day
    १ ते ३० जुन हिवताप प्रतिरोध महिना / जनजागरण अभियान Malaria Prevention Month / Awareness Campaign
    6 जुन ५ जुन जागतिक पर्यावरण दिन व राष्‍ट्रीय फायलेरिया विरोधी दिन World Environment Day & National Anti-Filaria Day
    ८ जुन जागतिक ब्रेन टयुमर दिन World Brain Tumor Day
    १० ते १६ जुन दृष्‍टीदान सप्‍ताह Eye Donation Week
    १४ जुन जागतिक रक्‍तदाता दिन World Donor Day
    १५ जुन जागतिक वृद्ध अत्याचार विरोधी दिन World Elder Abuse Awareness Day
    १८ जुन ऑटिस्टिक गौरव दिन Autistic Pride Day
    १९ जुन जागतिक सिकलसेल दिन World Sickle cell Day
    २१ जुन आंतरराष्‍ट्रीय योग दिन International Day of Yoga
    २६ जुन जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन International Day against Drug Abuse and Illicit Trafficking
    २९ जुन राष्‍ट्रीय संख्‍याशास्‍त्र दिन National Statistics Day
    7 जुलै १ जुलै राष्‍ट्रीय डॉक्‍टर दिन National Doctor’s Day
    ६ जुलै जागतिक प्राणीजन्‍य रोग दिन World Zoonotic Disease day
    ११ जुलै जागतिक लोकसंख्‍या दिन World Population Day
    २८ जुलै जागतिक कावीळ दिन World Hepatitis Day
    २९ जुलै क्षारसंजीवनी दिन ORS Day
    8 ऑगस्‍ट ६ ऑगस्‍ट जागतिक हिरोशिमा दिन World Hiroshima Day
    १ ते ७ ऑगस्‍ट स्‍तनपान सप्‍ताह Breast Feeding Awareness Week
    १० ऑगस्‍ट राष्‍ट्रीय जंतनाशक दिन National De-worming Day
    १२ ते २५ ऑगस्‍ट जागतिक युवा पंधरवाडा World Youth Fortnight
    १५ ऑगस्‍ट स्‍वतंत्रता दिन Independence Day
    २० ऑगस्‍ट जागतिक डास दिन World Mosquito Day
    २५ ऑगस्‍ट ते ८ सप्‍टेंबर राष्‍ट्रीय नेत्रदान पंधरवाडा National Eye Donation Fortnight
    9 सप्‍टेंबर पोषाहार महिना Nutrition Month
    ५ सप्‍टेंबर प्रशिक्षण दिन / राष्‍ट्रीय शिक्षक दिन व मज्‍जारज्‍जु (पाठीचा कणा)   दुखापत दिन Training Day / National Teacher’s Day & Spinal Cord Injury Day
    ८ सप्‍टेंबर जागतिक साक्षरता दिन World Literacy Day
    १० सप्‍टेंबर जागतिक आत्‍महत्‍या प्रतिबंध दिन World Suicide Prevention Day
    १६ सप्‍टेंबर जागतिक ओझोन दिन व जागतिक अस्थिमज्जा दाता दिन World Ozone Day & World Marrow Donor Day
    २१ सप्‍टेंबर जागतिक अल्‍झायमर दिन World Alzheimer Day
    २५ सप्‍टेंबर जागतिक औषधनिर्माता दिन World Pharmacist Day
    २८ सप्‍टेंबर जागतिक रेबीज दिन World Rabies Day
     २९ सप्‍टेंबर जागतिक हृदय दिन World Heart Day
    सप्‍टेंबर शेवटचा रविवार जागतिक कर्णबधीरता दिन World Day of Deaf
    10 ऑक्‍टोबर स्तनाचा कर्करोग जागरुकता महिना Breast Cancer Awareness Month
    १ ऑक्‍टोबर रक्‍तदान दिन व जेष्‍ठ नागरिक दिन व जागतिक शाकाहार दिन Blood Donation Day & Senior Citizen Day & World Vegetarian Day
    २ ऑक्‍टोबर स्‍वच्‍छता दिन व राष्‍ट्रीय व्‍यसनाधीनता प्रतिरोध दिन Cleanliness Day & National Anti Drug Addiction Day
    ऑक्‍टोबर महिन्‍याचा पहिला बुधवार जागतिक सेरेब्रल पाल्‍सी दिन World Cerebral Palsy Day
    ९ ऑक्‍टोबर जागतिक दृष्‍टी दिन World Sight Day
    १० ऑक्‍टोबर मानसिक आरोग्‍य दिन Mental Health Day
    ११ ऑक्‍टोबर आंतराष्‍ट्रीय बालिका दिन International Girl Child Day
    १२ ऑक्‍टोबर जागतिक संधीवात दिन World Arthritis Day
    १३ ऑक्‍टोबर जागतिक थ्रोम्बोसिस दिन World Thrombosis Day
    १५ ऑक्‍टोबर जागतिक हाताची स्‍वच्‍छता जागरुकता दिन Global Hand washing Day
    १६ ऑक्‍टोबर जागतिक अन्‍न दिन व जागतिक बधीरीकरण दिन World Food Day & World Anesthesia Day
    १७ ऑक्‍टोबर जागतिक आघात दिन World Trauma Day
    १८ ऑक्‍टोबर जागतिक रजोनिवृत्‍ती दिन World Menopause Day
    २० ऑक्‍टोबर जागतिक अस्‍थी विदीर्णता दिन World Osteoporosis Day
    २१ ऑक्‍टोबर जागतिक आयोडिन न्‍युनता विकार नियंत्रण दिन World Iodine Deficiency Disorder Control Day
    २४ ऑक्‍टोबर जागतिक पोलिओ दिन World Polio Day
    २६ ऑक्‍टोबर जागतिक स्‍थुलता दिन World Obesity Day
    २९ ऑक्‍टोबर जागतिक पक्षाघात दिन World Stroke Day
    ३० ऑक्‍टोबर जागतिक काटकसर दिन World Thrift Day
    11 नोव्‍हेंबर ७ नोव्‍हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस National Cancer Awareness Day
    १० नोव्‍हेंबर जागतिक लसीकरण दिन World Immunization Day
    १२ नोव्‍हेंबर जागतिक न्‍युमोनिया दिन World Pneumonia Day
    १३ – १९ नोव्‍हेंबर जागतिक प्रतिजैविके जागरुकता दिन World Antibiotic Awareness Week
    १४ नोव्‍हेंबर बाल दिन व जागतिक मधुमेह दिन Children’s Day & World Diabetes Day
    १७ नोव्‍हेंबर राष्‍ट्रीय अपस्‍मार दिन व जागतिक अपु-या दिवसांची प्रसुती दिन National Epilepsy Day & World Prematurity Day
    १९ नोव्‍हेंबर जागतिक दीर्घकालीन श्‍वासावरोध विकार दिन व जागतिक शौचालय दिन World COPD Day & World Toilet Day 2015
    १५- २१ नोव्‍हेंबर नवजात बालक काळजी सप्‍ताह New Born Care Week
    12 डिसेंबर १ डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंध दिन World AIDS Prevention Day
    २ डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन / राष्‍ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन National Pollution Prevention Day
    ३ डिसेंबर जागतिक अपंग / दिव्‍यांग दिन World Handicap Day
    ९ डिसेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिन World Patient Safety Day
    ११ ते १७ डिसेंबर सिकलसेल जनजागृती सप्‍ताह Sickle cell Disease Awareness Week
    १२ डिसेंबर सार्वत्रिक आरोग्‍य उपलब्‍धता दिन Universal Health Coverage Day

     

    सार्वजनिक आरोग्य विभागाचे IEC साहित्य :-    

     ब्लॉग

    महा आरोग्य संवाद या वेबसाईटवर टाकण्यात आलेले सर्व बातम्या येथे उपलब्ध https://mahaarogyasamvadiec.in/blogs/

     सार्वजनिक आरोग्य विभाग याविषयी संपूर्ण माहिती महा आरोग्य संवाद या वेबसाईटवर उपलब्ध आहे – https://mahaarogyasamvadiec.in/about-us/

     आरोग्य शिक्षण साहित्य महा आरोग्य संवाद या वेबसाईटवर उपलब्ध – https://mahaarogyasamvadiec.in/e-iec-sbcc/

     आरोग्य ई-पुस्तिका महा आरोग्य संवाद या वेबसाईटवर उपलब्ध – https://mahaarogyasamvadiec.in/e-book/

     सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेले आरोग्य पत्रिका महा आरोग्य संवाद या वेबसाईटवर उपलब्ध – https://mahaarogyasamvadiec.in/arogya-patrika/

    लाभार्थी:

    People

    फायदे:

    आरोग्य शिक्षण व शासकीय योजनांचे संदेश प्रसारण उपक्रमाचे योग्य प्राधान्यक्रमाने नियोजन

    अर्ज कसा करावा

    https://mahaarogyasamvadiec.in/about-us/