कुटुंब कल्याण कार्यक्रम
प्रस्तावना –
राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असून यासाठीचे अनुदान राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरसीएच पीआयपीमधून देण्यात येते.
उददेश –
सद्यस्थितीत राज्याने एस.आर.एस. २०२० नुसार १.५ इतका एकुण जननदर साध्य केलेला आहे. पुढे येणाऱ्या वर्षात एकुण जननदराची ही पातळी कायम ठेवण्याचे उदिदष्ट आहे.
अंमलबजावणी पध्दती –
केंद्रशासनाच्या पुढे दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
- लाभार्थीने स्वेच्छेने कुटुंब नियोजन पध्दत स्विकारणे.
- समाजाच्या गरजेनुसार सेवा देणे.
- जोडप्याला त्यांच्या इच्छेनुसार हवी तेव्हा अपत्य प्राप्ती.
आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत लाभार्थ्यांचे संतती नियमनाच्या उपलब्ध पध्दतींविषयी समुपदेशन केले जाते.त्यानुसार लाभार्थी उपलब्ध पध्दतींमधून योग्य पध्दतीची निवड करतो.सद्या केंद्रशासन प्रसूती पश्चात कुटुंब नियोजन सेवांवर अत्याधिक भर देत आहे.
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पध्दती व तात्पुरत्या पध्दती असे दोन प्रकार आहेत. कायमच्या पध्दतीमध्ये पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. स्त्री शस्त्रकियेमध्ये टाक्याच्या व बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तात्पुरत्या पध्दतीमध्ये तांबी, गर्भ निरोधक गोळया व निरोध याचा वापर केला जातो.
लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी राज्याने दिनांक ०९ मे, २००० च्या शासन निर्णयानुसार छोटे कुटुंब या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. छोटे कुटुंब म्हणजे दोन अपत्यांपर्यंतचे कुटुंब.
छोटे कुटुंब संकल्पना स्वीकारणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत.
- दि.१.५.२००१ पासून छोटे कुटुंब असणाऱ्या राज्य शासन व निमशासकिय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
- राज्य शासनाच्या विविध योजनांखाली मिळणाऱ्या सबसीडींसाठी फक्त छोटे कुटुंब असणाऱ्या जोडप्यांना पात्र ठरवण्यात येत आहे.
- शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीमध्ये देखील छोटया कुटुंब संकल्पनेचा समावेश करण्यात आलेला आहे.
- वैद्यकीय देखभाल नियमानुसार मिळणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या परिपूर्तीसाठीही हीच छोटे कुटुंबाची अट लागू केलेली आहे.
- सार्वत्रिक निवडणुकींसाठी उमेदवाराची पात्रता ठरवताना दोन अपत्यांपर्यतचे छोटे कुटुंब असणे ही अट लागू केलेली आहे.
- प्रचलित कायदे व नियम जसे बालविवाह कायदा, गर्भलिंगनिदान कायदा, जन्म व मृत्यु नोंदणीकरण कायदा इ.कायदयांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.
- राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या घरबांधणी अग्रीम, वाहन अग्रीम इत्यादीसाठी छोटया कुटुंबाचा अवलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राथम्य देण्याबाबत निर्णय झालेला आहे.
- राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या स्वग्राम व रजा प्रवास या सवलतीसाठी दोन अपत्यापर्यंतच्या जोडप्यांनाच लागू केलेली आहे.
- दोनच जिवंत अपत्ये असणाऱ्या अनुसूचित नवबौध्द व आदिवासी शेतक-यांना सहकारी साखर कारखान्यांचे सभासदत्वासाठी अर्थसहाय्य देण्याबाबत निर्णय झालेला आहे.
सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था
राज्यात राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रे, ग्रामिण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि मानांकित (Accredited)खाजगी आरोग्य संस्था यांचे मार्फत केली जाते. या सर्व केंद्रामध्ये गर्भनिरोधक गोळया व निरोध वाटपाच्या सुविधा उपलब्ध आहेत.या केंद्रांकडून तांबी बसविण्याच्या सुविधाही पुरविल्या जातात. ज्या ठिकाणी शस्त्रक्रियागृहे चालुस्थितीत आहेत अशा संस्थामध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत.जास्तीत जास्त शस्त्रक्रियागृहे चालु स्थितीत राहण्याच्या दृष्टीने व जास्तीत जास्त सर्जनांचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
मनुष्यबळ
कार्यक्रमाची अंमलबजावणी परिणामकारक व सुलभतेने होण्याकरिता वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना कुटुंब नियोजनाच्या पध्दतींबाबत नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येते. वैद्यकिय अधिकारी यांना पुरुष आणि स्त्री शस्त्रक्रियांच्या पध्दतींबाबत प्रशिक्षण देण्यात येते. स्त्री शस्त्रक्रियेच्या प्राशिक्षणामध्ये टाका व बिनटाक्याच्या पध्दतींचा समावेश होतो. ए.एन.एम, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांना तांबी बसविणेबाबत प्रशिक्षण देण्यात येते. इतरही पध्दतीसाठी वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते.
कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अ. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या लाभार्थींना द्यावयाचा मोबदला –
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शासन परिपत्रक क्रमांक कुनिश-२००७/प्र.क्र.१९७/०७/कु.क.१, दिनांक २० डिसेंबर, २००७ अन्वये कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यावर लाभार्थीस द्यावयाच्या मोबदल्याचा व इतर बाबींचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
- शासकीय आरोग्य संस्थेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर
अ.क्र. | लाभार्थी | लाभार्थ्यांस मिळणारा मोबदला
(रु.) |
प्रवर्तकास मिळणारा मोबदला
(रु.) |
औषध व मलमपट्टी (रु.) | इतर | एकुण
(रु.) |
सर्जनची फी,भुलतज्ञ फी–शिबीर व्यवस्थापन इ. (रु.) | ||||||
१ | पुरुष नसबंदी(सर्व लाभार्थ्यांसाठी) | ११०० | २०० | ५० | १५० | १५०० ’ |
२ | स्त्री नसबंदी (फक्त बीपीएल/एससी/ एसटी लाभार्थ्यांसाठी) | ६०० | १५० | १०० | १५० | १००० |
३ | स्त्री नसबंदी (फक्त दारिद्रय रेषेवरील लाभार्थ्यांसाठी) | २५० | १५० | १०० | १५० | ६५० |
केंद्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मोबदल्या बरोबर राज्य शासनाकडून पुरुष नसबंदी लाभार्थ्यांसाठी रु.३५१/- असा एकूण रु.११००~ रु.३५१‘ रु.१४५१/- एवढा मोबदला देण्यात येतो.
- मानांकित केलेल्या खाजगी व्यावसायिक/स्वयंसेवी संस्थेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास सदरहू संस्थांना मिळणारे अनुज्ञेय अनुदान
अ.क्र. | लाभार्थी | संस्थांना द्यावयाची रक्कम (रु.) | लाभार्थी(रु.) |
१ | पुरुष नसबंदी (सर्व लाभार्थ्यांसाठी) | १३०० | २०० |
२ | स्त्री नसबंदी (फक्त बीपीएल/एससी/एसटी लाभार्थ्यांसाठी) | १३५० | १५० |
क) आर.सी.एच.पी.आय.पी.अंतर्गत इतर योजना –
- पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करणे.
- स्त्री शस्त्रक्रिया आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया स्वीकर्त्यांस आर्थिक मोबदला देणे.
- खाजगी मानांकित (Accridiated) संस्थांच्या चालकांचे कुटुंब कल्याण कार्यक्रम व कुटुंब कल्याण विमा योजनेविषयी संवेदीकरण (Sensitization)करण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन करणे.
- कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लाभार्थी व शस्त्रक्रिया करणारे सर्जन यांच्या वाहतुकीकरीता करावयाचा खर्च,
- लॅप्रोस्कोप दुरुस्ती
- कुटुंब नियोजन नुकसान भरपाई योजना
- जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलै साजरा करणे.
ड) इतर योजना
१) आशा कार्यकर्तीदवारे लाभार्थ्यांची दारी संततिनियमन साधनांचे वाटप
२) प्रसूतीपश्चात तांबी बसविणे
३) मनुष्यबळास प्रशिक्षण
ई) न्यूअर कॉन्ट्रासेप्टीव
राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमात पाळणा लांबविण्यासाठी इतर तोंडावाटे घ्यावयाच्या गोळयाचा समावेश
ज्या माता प्रसूत होतात त्या माता भविष्यामध्ये पाळणा लांबविण्याच्या पध्दती अवलंबविण्यासाठी इच्छुक असतात. सदयपरिस्थितीमध्ये कुटुंब नियोजन नसबंदी शस्त्रक्रिया अथवा प्रसूतीपश्चात तांबी हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये माता बालकाला स्तनपान करीत असतात यावेळी स्तनपानावर परिणाम न होईल आणि त्याचबरोबर जी साधने मातेसाठी सुरक्षित असतील अशा बहुविध पर्यायाची उपलब्धता असणे ही कुटुंब नियोजन कार्यक्रमाची निकड आहे त्या अनुषंगाने
- i) प्रोजेस्टइन ओन्ली पिल्स या गर्भनिरोधक गोळया गरोदर मातांना प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये बाळाला स्तनपान करत असताना घेण्यासाठीचा सुरक्षित पर्याय उपलब्ध आहे.
- ii) सेंटक्रोमान या संप्रेरक नसलेल्या गर्भनिरोधक गोळया आठवडयातून एकदा स्तनपान करीत असलेल्या मातांसाठी सुरक्षित पर्याय आहेत. पीओपी, सेंटक्रोमान, इंजेक्टेबल डिंपा या गर्भनिरोधक साधनांचा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व सेवा महाराष्ट्रातील सर्व शासकिय संस्थांमधून उपलब्ध करुन देण्यात येतात.
राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत डिंपाचा समावेश –
इंजेक्टेबल डिंपा हे प्रोजेस्ट्रोजेन या संप्रेरकाचा समावेश असलेले गर्भनिरोधक इंजेक्शन ज्याचा परिणाम ३ महिन्याच्या कालावधीसाठी राहू शकतो हा एक पर्याय स्तनपान करणाऱ्या मातांना व इतरही मातांसाठी सुरक्षित पर्याय आहे. पीओपी, सेंटक्रोमान, इंजेक्टेबल डिंपा या गर्भनिरोधक साधनांचा राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात आलेला आहे.
अंमलबजावणी स्थिती खालीलप्रमाणे-
- इंजेक्टेबल MPA याचा शुभारंभ १० जुलै २०१७ रोजी करण्यात आला असून, सदर सेवा ही सर्व जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या सर्व संस्थांमधून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या नंतर ही सेवा च्भ्ब् समअमस पासून सर्व संस्थांमधून ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
- सेन्टक्रोमन (छाया) या गोळयांचा शुभारंभ दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजी करण्यात आला.
- या नवीन पध्दतीचा जास्तीजास्त अवलंब होण्यासाठी राज्यस्तरावरुन विशेष भर देण्यात येते.
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत झालेले काम
वर्ष | शस्त्रक्रिया | तांबी (कॉपर टी) | |||||||
अपेक्षीत
पातळी |
पुरुष | स्त्री | एकुण | ‚ | पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची टक्केवारी (एकुण
शस्त्रक्रियेच्या तुलनेत) |
अपेक्षीत
पातळी |
साध्य | ‚ | |
२०२१-२२ | ५६५००० | ७४३८ | २७४३०० | २८१७३८ | ५० | २.६ | ४९०००० | ४२२३६९ | ८६ |
२०२२-२३ | ५६५००० | ९५११ | ३७०७२४ | ३८०२३५ | ६७ | २.५ | ४९०००० | ४७८३६१ | ९८ |
२०२३-२४ | ५१०००० | ६२७८ | २९६७७४ | ३०३०८२ | ५९ | १.५ | ४९०००० | ४४३५४७ | ९० |
२०२४-२५
(फेब्रुवारी २०२5) |
510000 | 7093 | 261060 | 268153 | 53 | 2.7 | 490000 | 435501 | 89 |
PPIUCD कार्यक्रमांतर्गत झालेले काम | |||
वर्ष | PPIUCD मध्ये प्रशिक्षीत असलेल्यांची संख्या | संस्थेमध्ये बसविलेल्या एकुण PPIUCD ची | |
वैदयकिय अधिकारी | स्टाफ नर्सेस (SN/LHV/ANM) | ||
२०२१-२२ | ४२१ | १३२२ | १४२०६१ |
२०२२-२३ | २०२ | ७७९ | १९२६८३ |
२०२३-२४ | ५०१ | ७७० | १६७८५४ |
२०२४-२५(फेब्रुवारी २०२5) | 188 | 371 | 155057 |
वर्ष | गर्भनिरोधक गोळया | निरोध वाटप | ||
अपेक्षीत पातळी | साध्य | % | ||
२०२१-२२ | ३७५००० | २४६८६० | ६६ | २७५५४२ |
२०२२-२३ | ३७५००० | २६३९६३ | ७० | २९६३१८ |
२०२३-२४ | ३७५००० | २४२२३३ | ६५ | ३०७८४१ |
२०२४-२५
(फेब्रुवारी २०२5) |
375000 | 221256 | 59 | 290146 |
इंजेक्शदवारे देण्यात येणारे गर्भनिरोधक साधन – अंतरा व सेंटक्रोमन आठवडी गर्मनिरोधक गोळया (लाभार्थींची संख्या)
मात्रा | २०२२-२३ | २०२३-२४ | २०२४-२५
( फेब्रुवारी २०२४) |
पहिला डोस | ४६५२४ | ६१८९५ | 35447 |
दुसरा डोस | २१७६६ | ३२३२८ | 18284 |
तिसरा डोस | ११४७८ | २१३११ | 12686 |
चौथा डोस | ८३३४ | १९३३४ | 12234 |
सेंटक्रोमन आठवडी गर्मनिरोधक गोळया | ३८२६१९ | १३४८६८ | 263202 |
आशा कार्यकर्तीदवारे लाभार्थ्यांची दारी वाटप करण्यात आलेल्या संततिनियमन साधनांचाअहवाल
वर्ष | कंडोम | तोंडाद्वारे घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया | आपत्कालीन गर्भनिरोधक गोळया |
२०२१-२२ | ४०३४८२७ | १४९५१०२ | १३९०५७ |
२०२२-२३ | ४०५३६२७ | ८७३७०७ | ५१६०० |
२०२३-२४ | २४४८२७८ | १२९८३४५ | १५८७४५ |
२०२४-२५ (डिसेंबर २०२४) | 2026666 | 583313 | 28146 |
एकूणजन्मदर-राज्याच्या जन्मदरामध्ये वर्षनिहाय झालेली घट
वर्ष | जन्मदर |
२०१० | १७.१ |
२०११ | १६.७ |
२०१२ | १६.६ |
२०१३ | १६.५ |
२०१४ | १६.५ |
२०१५ | १६.३ |
२०१६ | १५.९ |
२०१७ | १५.७ |
२०१८ | १५.६ |
२०१९ | १५.३ |
२०२० | १५.० |
स्त्रोत – एसआरएस |
निव्वळ प्रजनन दर (TFR) –राज्याच्या निव्वळ प्रजनन दरामध्ये झालेली घट
वर्ष | निव्वळ प्रजनन दर(TFR) |
१९९२-९३ | २.८६ |
१९९८-९९ | २.५२ |
२००५-०६ | २.११ |
२००८-०९ | १.९ |
२०१०-११ | १.८ |
२०१३ | १.८ |
२०१४ | १.८ |
२०१५ | १.८ |
२०१६ | १.८ |
२०१७ | १.७ |
२०१८ | १.७ |
२०१९ | १.६ |
२०२० | १.५ (एसआरएस २०२०) |
स्त्रोत -एनएफएचएस, एसआरएस लोकसख्ंया वाढीचा दर
जनगणनेनूसार राज्याच्या दशवार्षकीय लोकसंख्या वाढीच्या दरात झालेली घट .
वर्ष | लोकसंख्या वाढीचा दर |
1951-1961
|
23-60 |
1961-1971 | 27-45 |
1971-1981 | 24-54 |
1981-1991 | 25-73 |
1991-2001 | 22-73 |
2001-2011 | 15-99 |
स्त्रोत – भारताची जणगणना
लाभार्थी:
महिला/पुरुष
फायदे:
लोकसंख्या वाढीवर नियंत्र आणण्यासाठी राज्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो
अर्ज कसा करावा
कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना